रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ई- पीक पाहणी’ प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘ई- पीक पाहणी’ प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत 


        मुंबई, दि. 22 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात 'माझी शेती, माझा सात बारा, मीच नोंदविणार,माझा पीक फेरा, या विषयावर  ई –पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक, श्री.रामदास जगताप यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर  गुरूवार 23 आणि शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.



        ई-पीक पाहणी हा प्रकल्प नेमका काय,ई -पीक पाहणीचे फायदे,ई-पीक पाहणीचे राज्यभर अंमलबजावणीचे टप्पे,राज्यातील शेतक-यांचा या योजनेला लाभत असलेला प्रतिसाद, शेतक-यांमध्ये करण्यात येत असलेली  जनजागृती,आगामी विविध योजना, उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा ई-पीक पाहणीसाठी करण्यात येत असलेला वापर आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. जगताप यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

Comments

Archive

Contact Form

Send