रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी - प्रबोधन३

 नमस्कार शेतकरी मित्रांनो,

“ ई पीक पाहणी ” ॲप वापरताना उध्दभवणार्‍या प्रश्नासंबंधी काही सूचना 

" माझी शेती माझा सातबारा 

मीच नोंदविणार माझा पीक पेरा "


मोबाईल  ॲप  स्थापित  करताना हँग होतो, ही समस्या कशी सोडवावी?

स्थापित करताना मोबाईलमध्ये चालू असलेले इतर ॲप बंद करावे .

मोबाईल पुन्हा बंद करून चालु करावा.

स्मार्ट मोबाईलवर नवीन अतिरिक्त खातेदार कसे नोंदवावे?

लॉगिन स्क्रीनवर नवीन खातेदार नोंदणी करा हा पर्याय उपलब्ध  आहे. यावर क्लिक करून सूचनांप्रमाणे नोंदणी करा. तथापि एका मोबाईल वरून २० नोदणी आणि पीक माहिती मिळवू शकता ही सुविधा महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलता येतो का?

नोंदणी पूर्वी  मोबाईल नंबर बदलणे शक्य आहे, नोंदणी नंतर नाही.

सांकेतांक विसरला किंवा मोबाईल वरून प्राप्त झालेला एस एम एस काढून टाकला असल्यास?

सर्व प्रथम रजिस्ट्रेंशन कधी केलं आहे ते विचारण्यात येईल. नंतर जिल्हा, तालुका, नाव, सर्वे नंबर, गट नंबर  विचारून सांकेतांक ई पीक पाहणी पोर्टल मधून शोधून देण्यात यावे. ४ अंकी पास कोड हा कायमस्वरूपी असल्यामुळे तो काळजीपूर्वक डायरीमध्ये लिहून ठेवावा.

मोबाइल मध्ये मराठीतून नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे?

ॲप  मध्ये मराठी मधून नाव नोंदवण्याची तयतूद आहे. गुगल प्ले स्टोअर वर जाऊन इंडिक कीबोर्ड (Indic Keyboard ) डाऊनलोड  करावा.

पिकाच्या नोंदीबाबत किंवा ॲपबाबत कोणतीही अडचण  असल्यास आपल्या गावातील तलाठी अथवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करा किंवा ०२०-२५ ७१२ ७१२ या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकता.

आपला,

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, पुणे

Comments

Archive

Contact Form

Send