रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी - प्रबोधन २

 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, 


पीक पेरणी क्षेत्र भरण्या संबंधी महत्वाच्या सूचना 

" माझी शेती माझा सातबारा 

मीच नोंदविणार माझा पीक पेरा "


कोकण विभागामध्ये खरीप हंगामाध्ये निर्भेळ पीक वर्गातील भात पिक क्षेत्राचे मोठया प्रमाणात पीक घेतले जाते  प्रत्यक्ष पीक पेरणी/भात लावणी केलेले क्षेत्र शेतकरी भरतील. क्षेत्र भरताना हे. आर स्वरुपात शेतातील लावणी केलेले भाताचे क्षेत्र भरावे.

20 गुंठे भात पीक क्षेत्र असल्यास 0.2000 असे भरावे (हे. आर चौ.मी एकक) तर 5 गुंठे असल्यास 0.0500 असे भरावे.

हेक्टर. नंतर एकदाचा पाँइट दयावा.(उदा: 01.1000)

पीकांचे क्षेत्र भरताना सातबारा वरील एकुण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र भरता येणार नाही.

सामाईक खातेदारांपैकी कोणत्याही एका खातेदाराने पुर्ण पेरणी क्षेत्र भरले तरी देखील माहिती भरली जाईल किंवा  खातेदारांच्या वहिवाटी पुरते देखील क्षेत्र भरता येईल.

पिकाच्या नोंदीबाबत किंवा ॲपबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या गावातील तलाठी अथवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करा किंवा ०२०-२५ ७१२ ७१२ या क्रमांकावर कॉल करून माहिती घेऊ शकता.

शासनाच्या नवीन धोरणासंबंधी वेळोवेळी अपडेटेड माहिती मिळविण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. @ https://bit.ly/3zqoIiz

आपला,

रामदास जगताप

उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, पुणे.


#ई-पीक पाहणी #पीक पेरणी क्षेत्र #निर्भेळ पीक वर्ग #भात पिक क्षेत्र

Comments

Archive

Contact Form

Send