रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीकपाहणी - काही शंका समाधान

 ई पीकपाहणी - काही शंका समाधान 


ई-पीक पाहणी ॲपद्वारे  शेतकरी यांनी आपले शेतातील पीक पेरा स्वताहून तलाठी यांना कळविण्यासाठी   शेतकरी यांना सक्षम करणाऱ्या ई पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दि १३ ऑगस्ट २०२१ पासून 

हस्ते दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी झाली . 

सर्व महसूल कृषी अधिकारी व कर्मचारी यांना सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण प्रबोधन व प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक उप जिल्हाधिकारी व सह जिल्हा समन्वयक कृषी अधिकारी आणि कृषी व महसूल विभागाचे प्रत्येकी दोन अधिकारी / कर्मचारी यांना यासाठी चे सविस्तर प्रशिक्षण विभागीय आयुक्त स्तरावर जमाबंदी  आयुक्त  यांचे कार्यालयामार्फत देण्यात आले आहे 


प्रशिक्षण प्रबोधन आणि प्रचार प्रसिद्धी साठी डेमो आप काह्लील लिंक वर उपलब्ध करून दिले आहे 

https://epeek.mahabhumi.gov.in/demo/app_download

 प्रत्यक्ष पीक पेरा शेतकरी यांनी नोंदविण्यासाठी ई पेक पाहणी हे मोबाईल आप गुगल प्ले स्टोअर वर उपब्ध करून देण्यात आले आहे. 

शेतकरी यांनी  भरलेली माहिती तलाठी स्तरावर मान्यता देण्यासाठी आपल्या जिल्हायचे नियमित URL वर EPEEK हे नवीन MODULE उपलब्ध करून दिले आहे 

       त्यामध्येच दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत 

१)       ई-पीक(शेतकऱ्याकडून आलेली) पीकपहाणी

२)       तलाठी स्थरावरची पीकपहाणी

आपले जिल्ह्याची लिंक पहा व त्याप्रमाणे कामकाज सुरु करावे 


https://mahaferfarpune.enlightcloud.com/epeek/

https://mahaferfar1.enlightcloud.com/epeek/

https://mahaferfar.enlightcloud.com/epeek/

आता आपल्या जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सर्व महसूल व कृषी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण झाले असेल व आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या वाडी वस्तीवर जावून ई पीक पाहणी मोबाईल ॲप मध्ये खातेदार नोंदणी पीक पेरा कसा अपलोड करायचा ह्याचे प्रबोधन करत असाल त्यासाठी डेमो ॲप वापरावे तलाठी / कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांचे प्रशिक्षणासाठी डेमो ॲप वापरावे डेमो ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा ( प्रशिक्षणासाठी गुगल प्ले स्टोअर वरील ॲपकोणीही वापरू नये ) 

प्रशिक्षणासाठी  डेमो ॲप - https://epeek.mahabhumi.gov.in/demo/app_download

प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर शेतकरी यांना नियमित ॲप कसे वापरावे ह्याचे देखील प्रशिक्षण द्यावे एका पिकाची नोंद त्यांचेच मोबाईल द्वारे भरून दाखवावी किंवा भरून घ्यावी त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरील ई पीक पाहणी मोबाईल ॲप वापरावे किंवा खालील लिंक वरून ॲपडाऊनलोड करून वापरावे . 

प्रत्यक्ष ई पीक पाहणी भरण्यासाठी चे ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek किंवा https://epeek.mahabhumi.gov.in/aap_download/ ही लिंक वापरा , 

पायलट तालुक्यातील सर्व खातेदार यांनी देखील जुने मोबाईल ॲप uninstall करून गुगल प्ले स्टोअर वरून नवीन मोबाईल ॲपडाऊनलोड करूनच खरीप हंगामाची पीक पाहणी अपलोड करावी . १५ ऑगस्ट ते १५ सप्टे २०२१ या कालावधीत जास्तीजास्त पीक पेरा ई पीक पाहणी मोबाईल ॲप मधून अपलोड करून घ्या व त्यास तलाठी यांनी ई पीक मधून मान्यता द्यावी १६ सप्टे ते ३० सप्टे २०२१ या कालावधीत तलाठी यांना उर्वरित खातेदार यांची खरीप हंगामाची पीक पाहणी ई पीक मधून अपलोड करावे लागेल हे लक्षात घ्यावे 

आपल्या जिल्ह्याचे नियमित लिंक वर epeek module उपलब्ध करून दिले आहे 

https://mahaferfarpune.enlightcloud.com/epeek/

https://mahaferfar1.enlightcloud.com/epeek/

https://mahaferfar.enlightcloud.com/epeek/

सर्व तलाठी व कृषी सहय्यक यांनी या लिंक समजून घेवूनच कामकाज करावे 

आज पासून दोन्ही ॲप मध्ये नवीन OTP/SMS गेटवे देण्यात आला असून आता सर्व वापरकर्ते यांना MHLAND या आयडी वरून OTP येईल. 20 पायलट तालुक्यांतील पिकांचे १५.८.२०२१ पूर्वीचे जुने  फोटो लवकरच पुन्हा दिसायला लागतील.  ई पीक पाहणीच्या प्रगती तपासण्यासाठी लवकरच एक dashboard उपलब्ध करून दिला जाईल . 


आपला 

रामदास जगताप 

उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प 

दि 20.८.२०२१



Comments

  1. सर सावकाराच्या नावावर असलेल्या परंतु तेच क्षेत्र शेतकरी वहिवाट करत असेल त्या शेतकऱ्यांनी काय करावे इ पिकपहणी आपमध्ये त्याबाबत फॉर्म न.14 बाबत मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  2. नमस्कार सर, आमची गावात इतर कसवटी योग्य जागा आहेत त्यातील एका सामाईक जागेत माझे घर,झाडे, विहीर अशी वहिवाट आहे.तशी नोंद पूर्वीचे ७/१२ मध्ये आहे. परंतु या एपिक पाहणी नोंदिमध्ये जमिनीचे क्षेत्र विभागून आलेलं अत्यल्प क्षेत्र त्यामध्ये माझे घर, विहीर, झाडे यांची नोंद करणे अशक्य होत आहे. एकूणच माझी वहिवाट व epik नोंद यात तफावत येत आहे. तरी यावर उपाय सुचवा.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send