रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

एका तलाठी मित्राच्या प्रश्नांना माझी उत्तरे

 एका तलाठी मित्राच्या प्रश्नांना माझी उत्तरे  दि १७.८.२०२१ 

सन्माननीय ज्यांनी कोणी लिहिले त्यांचे साठी आदरपूर्वक ,


 सातबारा संगणीकृत झाला आता ई-पिक आल. ते ही पूर्ण होईल यात शंका नाही.पण 

१) ७/१२ वरून श्री,श्रीमती, सौ आपण आम्हाला काढायला लावलं व एस. आर. ओ. नी ते नव्याने टाकायला सुरुवात केली त्याच काय ? 

= तहसील स्तरावर दुय्यम निबंधक यांना अचूक डेटा एंट्री करने बाबत सूचना दया मार्गदर्शन करा नाहीतर डी डी ई यांनी जे डी आर यांचे सोबत बैठक घेवून अचूक डेटा एंट्री होईल ह्याची दक्षता घ्या 

 २ ) तुकडे बंदीच्या नियमांचे एस. आर. ओ. कडून सर्सास उल्लंघन होत आहे त्याच काय? 

= आता या बाबत परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक यांनी काढले आहे 

३)एस. आर. ओ. कडून चुकीचे दस्त नोंदणी केली जाते त्याचे काय?  -

=  त्यांची कायदेशीरता तापसुनाच फेरफार मंजूर करावेत किंवा नामंजूर केले जातात हे आपल्याला माहित असेलच 

 ४) नोंदणीकृत दस्तला  नमुना ९ ची नोटीस ची गरज नाही मग नमुना ९ चे नोटीसला फिफो का ? तसेच आदेशाच्या फेरफार ला नोटीस व फिफो का ? - 

= सर्व  बिगर आदेशाच्या फेरफार साठी हितसंबंधित यांना नोटिस बजावणे आवश्यक आहे, आदेशाचे फेरफार ची नोटिस तैयार करने आवश्यक आहे कारण त्यावेळी डेटा साइन केला जातो परंतु नोटिस बजावणे आवश्यक नाही 

  ५) ७/१२ बघितला पण प्रिंट काढली नाही तरी तलाठ्याला भुर्दंड का?  

= त्यासाठी विनाशुल्क सेवा आहे  हे आपल्याला माहित असेलच?  

६) शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्यासाठी सक्ती आहे का ? 

= होय . जबाबदारी आता शेतकऱ्यावर आहे शासन  निर्णय वाचा 

७) तसेच कोणतेही प्रॅक्टिकल ट्रेनिंग न देता ई पीक पाहणी मधे पीक पाहणी कालमर्यादेत अद्यावत करण्याची  सक्ती आहे की शर्यत आहे?
= सर्व जिल्ह्यातील  प्रत्येकी 4 मास्टर ट्रेनर्स व दोन जिल्हा समन्वयक यांना प्रशिक्षण दिले आहे त्यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले असेलच  नसल्यास आपले जिल्ह्याचे जिल्हा सामन्व्यय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधावा .

८)  फेरफार चे सर्व अधिकार तलाठ्यांकडून काढून एस.आर.ओ. ला प्रदान केले का?-
= फक्त डेटा एंट्री करनेचे अधिकार दुय्यम निबंधक यांना आहेत त्यात बदल तलाठी यांना करता येतो , 

फक्त तलाठ्याला नोटीस काढण्याचीच  जबाबदारी  शिल्लक राहीली का? 
= नाही नोटिस काढून बजावने आवश्यक आहे

  ९) ७/१२ modul मध्ये बदल केला जातो तेव्हा तलाठ्यांना विश्वासात घेतल्या जात नाही. योग्य प्रशिक्षण दिल्या जात नाही तसेच कोणतीही सूचना दिल्या जात नाही .
=  तलाठी मंडल अधिकारी समन्वय संघाने सूचविलेल्या स्थायी समिति सदस्यांसोबत लवकरच बैठक होईल 

१०) ई_चावडी वाचन तयार करून ७/१२ संबंधित सर्व  तलाठी गाव नमुने संगणीकृत होणार का ?
=   होय,  काम सुरु आहे    

११) तलाठ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून ७/१२ संगणीकृत modul यशस्वी केला त्यासाठी तलाठ्यांना एक वेतन वाढ मिळावी यासाठी आपण आपल्या विभागामार्फत शासनाकडे पाठपुरावा करावा ही विनंती. -
आम्ही प्रस्ताव पाठवला होता परंतु वित्त विभागाने मंजूरी दिली नाही हे तलाठी महासंघाच्या पदाधिकारी यांना माहित आहे . 

  मी काही लपवत नाही मी काही खोट बोलत नाही. माझा त्यात काही स्वार्थ नाही 
 मला शक्य ते मी सर्व तुमच्यासाठी करतो मी तुमच्या सोबत आहे ,       

    आपला                         

 रामदास जगताप
दि १७.८.२०२१ 

Comments

Archive

Contact Form

Send