रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आजचे कामकाज दि.८.७.२०२१

नमस्कार मित्रांनो , राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीन विषयक आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केलेले महाभूमी पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. आज दि ८ जुलै २०२१ रोजी एका दिवसात सर्वोच्च ७८ हजार डिजिटल सातबारा व खाते उतारे डाऊनलोड झाले आहेत. आज एका दिवसात १. ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या दस्तांची संख्या – ४९३२ २. ऑनलाईन नोंदविलेल्या फेरफार संख्या – १२२२६ ३. ऑनलाईन निर्गत फेरफार ची संख्या – १०१८६ ४. नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – १११८९ ५. तलाठी स्थरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सात बारा व खाते उतारे- २,११,०२७ /- ६. पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाई ७/१२ व खाते उतारेची संख्या -२५ हजार ७. पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबारा ची संख्या – ३ लाख 20 हजार ८. भूलेख वरून विनाशुल्क / मोफत मिळविलेल्या सातबारा संख्या – ५ लाख ५४ हजार “ महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाला जनतेचा उस्पुर्त प्रतिसाद लाभत असून यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत.” रामदास जगताप उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक ८.७.२०२१

Comments

  1. सर , ज्या प्रमाणे 7/12 ,8 अ,प्रापर्टी कार्ड उतारा उपलब्ध झाला आहे त्याप्रमाणे नमुना न 6 फेरफार लवख
    कर उपलब्ध करुन द्या हि विनंती

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send