७० बँकांनी केले डिजिटल सातबारा साठी सामंजस्य करार
नमस्कार मित्रांनो,
विषय - डिजिटल सातबारा फेरफार व खाते उतारे बँकांना ऑनलाईन उपलब्ध
करणे साठी महसूल विभागाने सुरु केले बँक पोर्टल
राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब आणि महसूल राज्य मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांचे नेतृत्वाखाली आणि महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अनेक ऑनलाईन सुविधांमुळे सामान्य माणसाच्या जमीन आणि सातबारा बाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.
राज्यातील ७० बँकांनी महसूल विभागा सोबत सामंजस्य करार केला असून त्यामुळे राज्यातील सुमारे साडे सहा हजार पेक्षा जास्त बँक शाखांमध्ये डिजिटल स्वाक्षरीत सातबारा खाते उतारा व फेरफार नोंदीच्या नकला उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे बँकांनी शेतकरी यांना पीक कर्ज वितरीत करण्यामध्ये सुलभता आली आहे कर्ज मंजुरी मध्ये सुलभता यावी या उद्दशाने बँकांसाठी सुरु केलेले वेब पोर्टल सध्या https://g2b.mahabhumi.gov.in/banking_application/ या लिंक वर उपलब्ध आहे .
या पोर्टल ची सेवा मिळण्यासाठी दि. २६.७.२०२१ अखेर खालील ७० बँकांनी / संस्थांनी सामंजस्य करार केले आहेत व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, खाते उतारा व फेरफार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेत आहेत . त्यांनी आज अखेर ९,००,००० अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून घेतले आहेत.
राज्यातील खालील बँकांनी जमाबंदी आयुक्त यांचेशी डिजिटल सातबारा फेरफार व खाते उतारे ऑनलाईन मिळण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत त्यांचे कडून दररोज साधारणता ६ ते ७ हजार डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख ऑनलाईन उपलब्ध होवू लागले आहेत ही एक क्रांतीच म्हणावी लागेल
१. महाराष्ट्र ग्रामीण बँक
२. बँक ऑफ महाराष्ट्र
३. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,
४. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
५. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
६. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
७. विदर्भ कोंकण ग्रामीण बँक
८. कोटक महिंद्रा बँक
९. एच.डी.एफ.सी. बँक
१०. आय.सी.आय.ई.आय. बँक
११. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१२. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१३. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
१४. पंजाब व सिंद बँक
१५. जनता सहकारी बँक सातारा
१६. स्टेट बँक ऑफ इंडिया
१७. बँक ऑफ इंडिया
१८. सिडको -(CIDCO) महाराष्ट्र
१९. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२०. आय डी बी आय बँक
२१. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२२. पंजाब नाशनल बँक
२३. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२४. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
२५. शिवदौलत सहकारी बँक, पाटण
२६. पी.डी. पाटील सहकारी बँक, कराड
२७. संगमनेर मर्चंट सहकारी बँक
२८. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
२९. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
३०. सुवर्णयुग सहकारी बँक
३१. वारणा सहकारी बँक
३२. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
३३. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
३४.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
३५. महाउर्जा ३६. ओरीएंटलं इन्सुरंस कंपनी
३७. माणदेशी महिला सहकारी बँक माण जि. सातारा
३८. प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक जालना
३९. विश्वास सहकारी बँक , नाशिक
४०. हुतात्मा सहकारी बँक वाळवा , सांगली
४१. कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँक , सातारा
४२. जनता अर्बन सहकारी बँक लि.वाई
४३. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , कोल्हापूर
४४. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , जळगाव
४५. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , बीड
४६. व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी , अहमदनगर
४७. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
४८. सोपानकाका सहकारी बँक सासवड
४९. विश्वेश्वर सहकारी बँक लि पुणे
५०. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
५१. कोल्हापूर अर्बन सहकारी बँक
५२. सांगली अर्बन सहकारी बँक
५३. सुंदरलाल सावजी अर्बन बँक
५४. कुरुन्दवाड अर्बन बँक
५५. दीनदयाल सहकारी बँक आंबेजोगाई
५६. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
५७. शिवाजी नागरी सहकारी बँक पैठण
५८. अभिनंदन नागरी सहकारी बँक
५९. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
६०. टीजेएसबी सहकारी बँक
६१. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,
६२. प्रेरणा सहकारी बँक पुणे
६३. गजाजन महाराज नागरी सहकारी बँक भोकरधन
६४. पाटण अर्बन सहकारी बँक पाटण
६५. पलूस सहकारी बँक
६६. साधना सहकारी बँक
६७. कराड अर्बन बँक
६९ जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक ,
७०. छत्रपती राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी
आपला विश्वासू
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
दि. २६.७ .२०२१
Comments