महाभूमी पोर्टल - एक कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेखांचे ऑनलाईन वितरण – १६ कोटी चा महसूल जमा
महाभूमी पोर्टल - एक कोटी डिजिटल स्वाक्षरीत अभिलेखांचे ऑनलाईन वितरण
– १६ कोटी चा महसूल जमा
मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब मंत्री महसूल व आदरणीय डॉ नितीन करीर सर यांचे निर्देशांप्रमाणे व जमाबंदी
आयुक्त मा. निरंजन सुधांशू सर यांचे नेतृताखाली
सुरु असलेला महाभूमी प्रकल्प आता मूर्त रूप घेत आहे. महाभूमी प्रकल्पा अंतर्गत ई-फेरफार,
ई-मिळकत पत्रिका, ई-मोजणी, ई-अभिलेख, ई-नकाशा, असे अनेक प्रकल्प सुरु आहेत
त्यामध्ये पूर्णत्वाला आलेला ई फेरफार प्रकल्प म्हणजे महसूल विभागातील डिजिटल
क्रांतीचा आरंभ आहे असे म्हणावे लागेल.
महाभूमी पोर्टल – महाभूमी
पोर्टल म्हणजे महसूल विभागाच्या ऑनलाईन सुविधा सामान्य जनतेला उपलब्ध करून देणारे
व्यासपीठ होय. या मध्ये डिजिटल सातबारा, ई अभिलेख, महाभूनाकाषा , ई हक्क, आपली
चावडी व भूलेख अशा अनेक सुविधा आहेत.
डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख मिळविण्यासाठी – https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
या पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सप्टे. २०१९ पासून , डिजिटल
स्वाक्षरीत खाते उतारा (८अ) १ ऑगस्ट २०२० पासून आणि डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका
२१ जानेवारी, २०२१ पासून उपलब्ध करून दिले आहेत.
डिजिटल स्वाक्षरीत
सातबारा ब खाते उतारे यांना कायदेशीर वैधता दिली असून ते कोणत्याही कायदेशीर,
शासकीय व निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात यावेत असे शासकीय धोरण दिनांक
२३.०९.२०२० च्या शासन परिपत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे.
दिनांक १५ जुलै अखेर या
महाभूमी पोर्टल वरून खालील प्रमाणे डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख ऑनलाईन डाऊनलोड झाले
आहेत
डिजिटल स्वाक्षरीत सातबारा = ८०.३३ लक्ष (महसूल जमा = १२.०५ कोटी)
डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा = २०.८६ लक्ष (महसूल जमा =३.१२ कोटी)
डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका = ८० लक्ष (महसूलं जमा =८७ लक्ष)
एकूण वितरीत अभिलेख = १.०१ कोटी
एकूण जमा महसूल १६.०४ कोटी
डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड मध्ये पुणे जिल्हा (९.१२ लक्ष)
प्रथम क्रमांकावर असून सोलापूर जिल्हा (५.०२ लक्ष) द्वितीय क्रमांक व औरंगाबाद
जिल्हा (४.७२) तृतीय क्रमांकावर आहे.
डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा डाऊनलोड मध्ये नांदेड जिल्हा (२.३०
लक्ष) प्रथम क्रमांकावर असून पुणे जिल्हा
(२.२६ लक्ष) द्वितीय क्रमांकावर आणि औरंगाबाद जिल्हा (१.६७ लक्ष ) तृतीय
क्रमांकावर आहे.
डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका डाऊनलोड मध्ये मुंबई उपनगर जिल्हा (३३
हजार ) प्रथम क्रमांकावर असून कोल्हापूर जिल्हा ( १२ हजार) द्वितीय व पुणे जिल्हा
( ७ हजार) तृतीय क्रमांकावर आहे.
मह्भूमी पोर्टल हे राज्यातील जनतेच्या पसंतीला खरे उतरत असून कोरोना
सारख्या महामारीच्या कठीण काळात लाखो नागरिकांना दररोज चांगली सेवा देत आहे हे पाहून समाधान वाटते .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
दिनांक १५ जुलै २०२१
Comments