मे २०२१ अखेरचे ई फेरफार प्रणालीतील कामकाजाचा जिल्ह्यांचा गुणानुक्रम
नमस्कार मित्रांनो ,
मे २०२१ अखेरचे ई फेरफार प्रणालीतील कामकाजातील जिल्ह्यांचा गुणानुक्रम
१, फेरफार निर्गती - राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी प्रमाणात शिल्लक फेरफार असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाशीम प्रथम , धुळे द्वितीय , नंदुरबार तिसरा , आणि त्अयानंतर अनुक्रमे अहमदनगर , नाशिक, नंदुरबार , बुलढाणा जिल्हे सर्वोत्कृष्ट ठरले आहेत . ठाणे , परभणी , सिंधुदुर्ग , पालघर लातूर व औरंगाबाद जिल्ह्यात निर्गतीचे प्रमाण सर्वात कमी दिसून येते.
२. त्रुटीयुक्त विसंगत सातबारा - राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी नंदुरबार प्रथम , धुळे द्वितीय व गडचिरोली तृतीय क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे नाशिक यवतमाळ अहमदनगर व जळगाव जिल्हे सर्वोतृष्ट ठरले असून औरंगाबाद बीड सिंधुदुर्ग , रायगड रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात विसंगत सातबाराचे सर्वाधिक प्रमाण आहे. अजून या जिल्ह्यांना अधिक काळजीपूर्वक काम करावे लागेल.
३. डिजिटल स्वाक्षरीत सातबारा - राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक डिजिटल स्वाक्षरीत सातबारा तयार झाले असलेल्या जिल्ह्यात वाशीम-प्रथम क्रमांक अकोला- द्वितीय क्रमांक बुलढाणा- तृतीय क्रमांक , यवतमाळ व , अमरावती अग्रेसर असून सर्वात जास्त शिल्लक कामाचे प्रमाणामध्ये पुणे सोलापूर साताराकोल्हापूर व सांगली या सर्व पुणे विभागातील जिल्हे दिसून येतात
४. डिजिटल स्वाक्षरीत फेरफार नोंदवही - राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी फक्त नाशिक , रायगड , गोंदिया , सातारा सातारा , पुणे व , यवतमाळ या सात जिल्ह्यांनी काम पूर्ण केले आहे उर्वरीत जिल्ह्यांचे काम अध्याप पूर्ण झाले नाही
५. कलम १५५ च्या दुरुस्त्या - कलम १५५ अंतर्गत च्या आदेशाने आदेशाने राज्यातील सातारा जिल्हा (४ लक्ष ९९ हजार सातबारा दुरुस्ती ) प्रथम क्रमांकावर असून रत्नागिरी ( ४ लक्ष ६२ हजार सातबारा दुरुस्ती ) द्वितीय क्रमांक आणि सिंधुदुर्ग जिल्हा ( तीन लक्ष २९ हजार सातबारा दुरुस्ती ) तृतीय क्रमांकावर आहेत या जिल्ह्यांनी सर्वाधिक सात्बारातील विसंगती तहसीलदार यांचे आदेशाने दूर केल्या आहेत
वरील प्रगती अहवाल पाहून आपल्या कामात सुधारणा करावी
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार
दि १.६.२०२१
फार छान केले आहे सर फक्त आता 6 ड ऑनलाईन व डीजीटल सरोवर फास्ट करावा कारन दोन दोन दिवस ओपन होत नाही
ReplyDelete