रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेरफार नोंदवून निर्गत करण्याची प्रक्रिया समजून घेताना

 फेरफार नोंदवून निर्गत करण्याची  प्रक्रिया समजून घेताना - -

-------------------------------------------------------------------------------------------------------


1) नोंद घालणे

2) नोटीस काढणे

3) नोटीस लागू करणे

4) नोटीस 15 दिवस हरकत कालावधी

5) 15 दिवस कालावधी पूर्ण झाल्या नंतर हरकत शेरा भरणे

6) मंडळ अधिकारी यांनी फेरफार  निर्गत करणे

*या 6 प्रक्रियेमधून फेरफार निर्गातीची  कार्यवाही होते.यात 5 प्रक्रिया तलाठी स्तरावर व 1 अंतिम प्रक्रिय मंडळ अधिकारी स्तरावर होतात. म्हणजे एकाद्या फेरफार ची  सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सरासरी 20 दिवस जातात. जर नोंदणीकृत नोंदी रजिस्टर ऑफिसला नोंदणीकृत होत असेल तरी  नोंदणीकृत नोंदींना नोटीस काढणे  आवश्यक आहे व  15 दिवस हरकत कालावधी हरकत शेरा ही प्रक्रिया काढून टाकणे उचित होणार नाही . असे केले तर नोंदणीकृत दस्त मध्ये काही बनावटपणा झाला असल्यास  तलाठी स्थरावर लक्षात येणार नाही आणि हरकत नोंदविण्याची संधी हितसंबंधितांना मिळणार नाही 

नोटीस बजावल्याची पोहोच तलाठी ई फेरफार मध्ये अपलोड करील हे पाहून  मंडळ अधिकारी फेरफार  निर्गत करेल या मुळे अनावश्यक कविलंब टळेल  .

----------------------------------------------------------------------------------------------------------

नोंदणीकृत नोंदणी म्हणजे काय?


        जे नोंदणीकृत दस्त दुय्यम निबंधक कार्यालयातून  नोंदणी होऊन येतात त्यांना नोंदणीकृत नोंदी म्हणतात.यात

*1) खरेदी *

2) हक्कसोडपत्र

3) बक्षीसपत्र

4) गहाणखत

5) ऋणमोचक दस्त

*6) भाडेपट्टा *

7) रजिस्टर वाटणीपत्र

इत्यादी प्रकारांचा समावेश होतो यात  खरेदी सोडता इतर प्रकारात अनेक गट असतात जसे एक फेरफार मध्ये 1 पासून 20 गट असू शकतात.

=========================================================

अनोंदनिकृत नोंदी-


1) वारसा

2) इकरार

3) बोजा

4) बोज कमी करणे

5) अ पा क कमी करणे

6) ए कु पू नोंद कमी करणे

7)  कलम 155 आदेश

8) आदेशाने खात्यात दुरुस्ती करणे

9) तहसीलदार स्तरा वरून होणाऱ्या विविध आदेशाच्या नोंदी.

==============================================================

यातील एकफेरफार अनेक गट ही फेरफार  मंजुरीची प्रक्रिया केवळ

1) बोजा नोंद करणे

2) वारसा

3) इकरार

या 3 फेरफार  मंजुरीसाठी  वेळखाऊ पणा टाळणारी ही मंजुरीची सुविधा उपलब्ध आहे. बाकीच्या फेरफार  मंजुरीसाठी गट निहाय मंजुरीची प्रक्रिया मंडळ अधिकारी यांना करावी लागते.

===============================================================

या शिवाय फेरफार  मंजूर करताना

1) तलाठी स्तर डाटा साइन

2) तलाठी स्तर फेरफार रजिस्टर साइन

3) तलाठी स्तर काम संपलेची घोषणा करून तहसीलदार यांची मान्यता घेणे

या प्रकारा मुळे फेरफार मंजुरी प्रक्रियेत वेळखाऊ पणा येतो. त्यासाठी फेरफार व नोटीस pdf स्वाक्षरीत करणे या पर्याय कमी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्या प्रमाणे सुधारणा लवकरच होईल 

========================================================================

आपल 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
दिनांक १३.३.२०२१ 

Comments

Archive

Contact Form

Send