सातबारा केंव्हाही आणि कुठेही
सातबारा केंव्हाही आणि कुठेही -
राज्यातील सातबारा संगणकीकरणामुळे
अनेक गोष्टी सोप्या झाल्यात, खातेदारा व सामान्य नागरिकांना ज्या प्रमाणे आता
सातबारा घेण्यासाठी फक्त तलाठी कार्यालय हा एकमेव पर्याय राहिलेला नाही. कोणीही सातबारा केंव्हाही आणि कोठूनही प्राप्त करून घेवू शकतो तसेच
दस्त नोंदणी, पीक विमा योजना, महा डीबीटी, बॅंका, पतसंस्था, सोसायट्या, सिडको,
महाउर्जा, पीएमआरडीए, आधारभूत किंमतीवर धान व कापूस खरेदी योजना यांना देखीलडिजिटल
सातबारा लिंक झाला असल्याने अनेक गैरप्रकारांना आळा बसला आहे.
१.
बँक पोर्टल – सामान्य शेतकरी किंवा
बिगर शेतकरी खातेदाराला कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक सातबारा आता
बँकेला लिंक केला आहे त्यासाठी महसूल विभागाने बँक पोर्टल (https://g2b.mahabhumi.gov.in ) विकसित केले असून त्याचा लाभ सर्व
बँकांनी घेण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव मा. अजोय मेहता यांनी राज्य स्थरीय बँकर्स
कमिटीच्या बैठकीत फेब्रु.२०२० मध्ये केले होते त्या पद्धतीने राज्यातील १० जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँक आणि २० अन्य प्रमुख राष्ट्रीय, मर्चंट, नागरी व खाजगी बँका यांनी जमाबंदी आयुक्त
कार्यालायासोबत सामंजस्य करार करून डिजिटल सातबारा, खाते उतारा व फेरफार नोंदवह्या
ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेतल्या आहेत त्यामुळे शेतकरी यांना कर्ज प्रकरणासाठी
अद्यावत सातबारा तलाठी कार्यालयातून उपलब्ध करून घेवून तो पुन्हा बँकेत सादर
करण्याची गरज आता राहिली नाही. बॅंका आता असे कर्ज मंजुरी करताना किंवा नुतनीकरण
करताना संबंधित खातेदाराचा अद्यावत सातबारा थेट बँक पोर्टल वरून डाऊनलोड करून घेवू
शकतात ही एक मोठी सुविधा बँकांसाठी उपलब्ध झाली असून सातबारात खाडाखोड करून/परस्पर
बदल करून कर्ज प्रकरणी सादर केल्यास होणारी बँकांची फसवणूक टळली असून शेतकरी यांना
देखील सातबारा द्यावा लागत नसल्याने त्याचाही वेळ, श्रम व पैसा वाचला आहे.
२.
वेब पोर्टल- शेतकरी यांना
कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा व खाते उतारा आवश्यक असतो आणि तो
आता प्रत्येक वेळी तलाठी यांना न मागता अद्यावत सातबारा शासनाच्या कोणत्याही
विभागाला आवश्यक असल्यास त्यांना तो सातबारा च्या वेब पोर्टल वरून थेट ऑनलाईन
पद्धतीने उपलब्ध करून दिला जाईल अशी सुविधा महसूल विभागाचे वतीने विकसित केली आहे
. त्यासाठी कोणत्याही विभागाला सातबारा व खाते उतारा आवश्यक असल्यास त्यांना ही सेवा उपलब्ध करून
घेण्यासाठी त्या विभागाने जमाबंदी आयुक्त कार्यालया सोबत एक सामंजस्य करार
करावा लागतो त्यानंतर लगेचच अशी वेब सर्व्हिस संबंधित विभागाला उपलब्ध करून दिली
जाते. आज अखेर प्रधानमंत्री पीक विमा योजना, नानाजी देशमुख स्पर्धाक्षम कृषी
प्रकल्प योजना (POCRA), अन्न व नागरी पुरवठा विभागाची आधारभूत किमतीवर धान खरेदी
योजना , कॉटन कार्पोरेशन ची आधारभूत किमतीवर कापूस खरेदी योजना, महाराष्ट्र सिडको, कृषी विभागाच्या थेट
लाभाच्या योजना (MAHA-DBT), महाउर्जा यांना डिजिटल सातबारा लिंक करून देण्यात आला
असून लाखो सातबारा या साठी दरमहा वापरले जातात त्यामुळे एकूणच कामकाजामध्ये
पारदर्शकता, गतिमानता आणि सुलभता आली असून शासनाच्या करोडो रुपयांची बचत होवू
लागली आहे.
३.
महाभूमी मोबाईल ॲप –सध्या
मोबाईल चे युग असून आत्ता अत्यंत सामान्य माणसाकडे देखील स्मार्ट फोन असतो त्याचा
उपयोग त्याला दररोजच्या दैनंदिन कामात होता.
महाराष्ट्रातील मोफत सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देणारे अनेक मोबाईल ॲप सध्या
उपलब्ध आहेत परतू त्याच्या सेवा अनेक वेळा सुरक्षिततेच्या दृष्टीने खंडित केल्या
जातात. महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टल च्या यशस्वी पदार्पणानंतर आत महसूल
विभागाचे महाभूमी हे अधिकृत android मोबाईल ॲप
देखील उपलब्ध झाले आहे. या द्वारे सातबारा ची माहिती, खाते उताऱ्याची माहिती,
डिजिटल सातबारा, डिजिटल खाते उतारा, डिजिटल स्वाक्षरीत सातबारा ची पडताळणी आणि
डिजिटल स्वाक्षरीत खाते उताऱ्याची पडताळणी अश्या सहा सेवा समान्य जनतेला उपलब्ध
झाल्या आहेत. त्यामुळे सातबाराच्या सर्व सुविधा सामान्य माणसाच्या हातात येतील यात
शंका नाही आणि मग खर्या अर्थाने शेतकरी म्हणेल ‘सातबारा माझ्या मुठीत’
४.
महाभूमी पोर्टल – महसूल विभागाच्या
ऑनलाईन सुविधा – महसूल विभागाच्या ई फेरफार प्रकल्पाती सर्व सुविधांचा लाभ
घेण्यासाठी समान्य नागरिकाला सोपे जावे म्हणून महाभूमी पोर्टल (https://mahabhumi.go.in ) विकसित करण्यात आले असून या पोर्टल
च्या आधारे कोणालाही महसूल विभागाच्या सर्व सशुल्क सेवा आणि निशुल्क सेवांचा लाभ
घेता येतो.
या मध्ये सध्या खालील अशा सहा
सुविधा उपलब्ध आहेत
१.डिजिटल स्वाक्षरीत/ सशुल्क सातबारा,
खाते उतारा व मिळकत पत्रिका – डिजिटल सातबारा
( https://digitalsatbara.mahabhumi.gov.i/dslr ),
२. तहसील कार्यालय व उप अधीक्षक
भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व जुने भूमी अभिलेख व दस्त ऐवज – ई अभिलेख (https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords ) ,
३. सुमारे ३७००० महसुली गावांचे
डिजिटल गाव नकाशे व सातबारा वरील भोगवटादाराची माहिती – महा- भूनकाशा (https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha ) ,
४. तलाठी कार्यालयात फेरफार
नोंदविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय – ई हक्क (https://pdeigr.maharashtra.gov.in ) ,
५. गावाचा डिजिटल नोटीसबोर्ड –
आपली चावडी (https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi ) ,
६. विनास्वक्षारीत / मोफत सातबारा
व खाते उतारा (https://bhulekh.mahabhumi.gov.in )
Very nice Initiative and progress till date. It was need of the hour.
ReplyDelete