डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेख -PROPOSAL
विषय - डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास
(गा.न.नं. ७/१२, गा.न.नं.
८अ, गा.न.नं.६) कायदेशीर वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली प्राधिकारी व
अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत...
संदर्भ - १. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम
१४८-अ
२. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार
अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे
व सुस्थितीत ठेवणे) नियम , १९७१ .
३. माहिती व तंत्रज्ञान कायदा , २०००
प्रस्तावना -
महाराष्ट्र
जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड चार) मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम
पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे. त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली
लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या यांचे
नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे.
या विभागाचा शासन निर्णय क्रमांक रा.भू.अ.२०१३/प्र.क्र.३२/ल-१, दिनांक
२३ जानेवारी, २०१३ अन्वये ई-फेरफार हा ऑनलाईन म्युटेशनचा कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली
आहे. त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांचे मार्फत
“ई-फेरफार”
ही आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. सदर
आज्ञावलीव्दारे राज्यभरात ऑनलाईन
फेरफार घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक
: सीएलआर-१००३/प्र.क्र.४७/ल-१ सेल, दि. ३ डिसेंबर २००५ अन्वये या संगणकीकृत अधिकार अभिलेखांना कायदेशीर वैधता
देण्यात आली आहे.
राज्य शासनाने या विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक
: रा.भू.अ.आ.का.२०१६ /प्र.क्र.१८०/ल-१, दिनांक ११ जुलै, २०१७ अन्वये हस्तलिखित ७/१२ चे वितरण दिनांक ३१ जुलै, २०१७ पासून पूर्णतः बंद करून ऑनलाईन फेरफार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार, राज्यात
शासनाने महाभूमी (https://mahabhumi.gov.in) या संकेत स्थळावर अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं. ७/१२, गा.न.नं. ८अ, गा.न.नं.६ चे उतारे डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेले आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ चे कलम १४८-अ मध्ये, योग्य ते साठवणूकीचे यंत्र
वापरुन अधिकार अभिलेख ठेवणे याविषयीची तरतूद आहे. तसेच, माहिती व तंत्रज्ञान
अधिनियम,२००० च्या कलम ४, ५, ६, ७ आणि ८ मध्ये “कोणतेही सार्वजनिक
दस्तऐवजाचे डिजीटल / इलेक्ट्रानिक पध्दतीने जतन केले जात असलेले डिजीटल स्वाक्षरीत
डेटाबेस आधारित अभिलेख हे जणु काही मुळ अभिलेखाची सत्यप्रत समजणे विधिवत आहे ” या
विषयीच्या तरतूदी आहेत.
या बाबी विचारात घेवून, “डिजीटल
स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास ( गा.न.नं. ७/१२, गा.न.नं. ८अ, गा.न.नं.६ ) कायदेशीर
वैधता देण्यासंदर्भात क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी आणि संबंधित सक्षम
प्राधिकारी यांना दिशानिर्देश देणे आवश्यक आहे म्हणून खलील प्रमाणे शासन परिपत्रक
निर्गमित होण्यास विनंती आहे.
शासन परिपत्रक –
माहिती व तंत्रज्ञान अधिनियम,२००० च्या
कलम ४, ५, ६, ७ आणि ८ आणि महाराष्ट्र जमीन
महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन
महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम,१९७१ मधील
तरतूदीनुसार, प्राप्त अधिकारात क्षेत्रीय महसूली यंत्रणा व प्राधिकारी आणि संबंधित
सक्षम प्राधिकारी यांना खालीलप्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहेत :-
1.
शासनाच्या महाभूमी
पोर्टलवर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरून उपलब्ध होणारे डिजिटल
स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नं. ७/१२, गाव नमुना नं. ८अ आणि
गाव नमुना नं.६ या उताऱ्यांवर दर्शविलेल्या क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी
पडताळणी क्रमांकाचे आधारे त्याची वैधता पडताळणी करणे शक्य आहे, असे अधिकार अभिलेख सर्व कायदेशीर व शासकीय/निमशासकीय
कामकाजासाठी वैध राहतील.
2. अशा डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव
नमुना नं.७/१२, गाव नमुना नं.८अ आणि गाव नमुना नं.६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही
अधिकारी यांचे स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही.
वरील प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित झाल्यास डिजिटल
स्वाक्षरीत अभिलेख वितरण व वापरास कायदेशीर वैधता मिळेल व जनमानसातील वापराचे
प्रमाण वाढेल सबब शासन परिपत्रक निर्गमित होण्यास विनंती आहे.
We hope so, sir
ReplyDelete