रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बिनशेती आदेशा प्रमाणे फेरफार घेण्याच्या सुविधा - मार्गदर्शक सूचना क्रमांक १८०

 

                                     

                                                             महाराष्ट्र शासन

                                                          महसूल वन विभाग

                             जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य

                   दूसरा तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१

----------------------------------------------------------------------------------------------------

दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०                                       Email ID : dlrmah.mah@nic.in    

                                                                                             Web site :  https://mahabhumi.gov.in

----------------------------------------------------------------------------------------------------

क्र.रा.भू...का./ मा.सु. १८०/२०२०                           दिनांक : १२.१०.२०२०

 

          विषय बिनशेती आदेशा प्रमाणे फेरफार घेण्याच्या सुविधा

          

                    डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत सुरु असलेल्या ई-फेरफार प्रणालीत सध्या संपूर्ण राज्यात ऑनलाईन फेरफार घेण्यात येतात. ऑनलाईन फेरफार घेण्याची कार्यपद्धती व त्यातील बारकावे तसेच काय करावे ? काय करू नये ? ह्याची परिपूर्ण कार्यपद्धती सर्व वापरकर्ते व पर्यवेक्षनीय अधिकारी यांना माहित असणे आवश्यक आहे म्हणूनच या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

                  कोणत्याही सक्षम महसूल अधिकाऱ्याने शेत जमिनीचे बिनशेती क्षेत्रात रुपांतर करावयाचे बिनशेती आदेश दिल्यास त्याची ऑनलाईन ई-फेरफार प्रणालीत फेरफार घेण्याची कार्यपद्धती काय असावी? तसेच  याबाबत लक्षात घ्यावयाचे बारकावे समजून घेणे आवश्यक आहेत . त्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देणेत येत आहेत.

१.       ई-फेरफार प्रणालीत संगणकीकृत ७/१२ जतन करताना शेती व बिनशेती चे ७/१२ स्वतंत्र असावेत तसेच शेतीचे ७/१२ चे क्षेत्राचे एकक हे.आ.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्राचे ७/१२ चे एकक आर चौ.मी. असावे असे निश्चित केले आहे.

२.       कोणत्याही परिस्थितीत बिनशेती क्षेत्र त्याच शेतीच्या क्षेत्राच्या ७/१२ मध्ये नमूद केलेले असू नये.

३.       कोणत्याही बिनशेती क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र फक्त बिनशेती या रकान्यात नमूद असावे ते जिरायत, बागायत, तरी, वरकस अथवा पोट खराब या रकान्यात नमूद असू नये.

४.      बिनशेती आकार या रकान्यात सध्या त्या क्षेत्राला लागू असलेला बिनशेती आकार नमूद करावा . (या साठी जर क्षेत्र नागरेतर क्षेत्रात असेल तर प्रति चौ.मी. ५ पैसे किंवा १० पैसे प्रमाण दर असेल आणि नागरी भागात म्हणजेच नगरपरिषद, महापालिका क्षेत्रात असेल तर जिल्हाधिकारी यांनी अधिसूचित केलेल्या प्रमाण दराप्रमाणे असेल)

५.      कोणतेही क्षेत्र बिनशेती म्हणून नमूद केल्यास त्याचा अन्य तपशील जसे कि ज्या कारणासाठी परवानगी दिली आहे ते प्रयोजन ( रहिवास , वाणिज्य, औद्योगिक, शैक्षणिक इत्यादी)  आणि अटीशर्ती ७/१२ चे इतर हक्कात नमूद कराव्यात.

६.      कोणताही ७/१२ बिनशेती साठी निवडला नसेल तर त्याचे क्षेत्र चौ.मी., चौरस फुट  किंवा हे.आर.चौ.मी. मध्ये नमूद करू नये .

७.      जर बिनशेती क्षेत्राचे रेखांकन मंजूर करून त्याचे भूखंड पडले नसतील आणि संपूर्ण क्षेत्र बिनशेती केले असेल तरी (उदा. औद्योगिक बिनशेती, शैक्षणिक बिनशेती, पेट्रोलपंप इत्यादी. ) त्याचे ७/१२ वरील एकूण क्षेत्र व खातेदाराचे नावासमोरील क्षेत्र आर.चौ.मी. मध्येच नमूद करावे. कदाचित यामुळे जास्त मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ODC अहवाल ३१ मध्ये येतील परंतु ते क्षेत्र व एकक योग्य असल्याची खात्री करून असे ७/१२ तहसीलदार यांनी एकदा कन्फर्म / कायम केल्यास पुन्हा ते या अहवालात केंव्हाही दिसणार नाहीत.

८.      बिनशेती आदेशाने रेखांकन मंजूर केले असल्यास उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या  बिनशेती क.जा.प. प्रमाणे सर्व भूखंड तसेच खुले क्षेत्र, सुविधा क्षेत्र आणि रेखांकानातील रस्त्याखालील क्षेत्राचे देखील स्वतंत्र ७/१२ तयार करणे आवश्यक आहेत.

९.      जर कोणताही बिनशेती आदेश रेखांकन मंजुरी शिवाय ७/१२ वरील संपूर्ण क्षेत्राचे बिनशेती मध्ये रुपांतरीत करीत असल्यास सामान्य फेरफार मधून बिनशेती आदेश या फेरफार प्रकारातून फेरफार नोंदविण्यात यावा. या फेरफार मधून फक्त जिरायत, बागायत, तरी, वरकस अथवा पोट खराब क्षेत्रामधून बिनशेती क्षेत्रामध्ये रुपांतरीत करता येते व त्याचे एकक आणि बिनशेती आकार बदलता येतो. या मधून क्षेत्र कमी किंवा जास्त करता येणार नाही अथवा खातेदाराच्या नावात बदल करता येणार नाही मात्र ७/१२ चे इतर हक्कात हवी ती माहिती नमूद करता येते.

१०.  जर कोणताही बिनशेती आदेश रेखांकन मंजुरीसह ७/१२ वरील संपूर्ण क्षेत्राचे बिनशेती मध्ये रुपांतरीत करीत असल्यास अथवा कोणत्याही ७/१२ तील अंशात क्षेत्र बिनशेती होते व काही क्षेत्र शेती कडेच राहणार असल्यास उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या बिनशेती क.जा.प. प्रमाणे जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्से तयार करणे या फेरफार प्रकारातून फेरफार नोंदविण्यात यावा. या फेरफारामधून जुना शेती चा ७/१२ बंद करून मंजूर रेखांकानाप्रमाणे सर्व भूखंड तसेच खुले क्षेत्र, सुविधा क्षेत्र आणि रेखांकानातील रस्त्याखालील क्षेत्राचे देखील स्वतंत्र पोट हिस्से तयार करता करावेत मात्र जितक्या क्षेत्राचा (एकक हे.आर.चौ.मी.)  ७/१२ बंद केला आहे तितक्याच क्षेत्राचे (एकक आर.चौ,मी.) पोट हिस्से तयार करता येतील. या फेरफार प्रकारात नवीनच ७/१२ तयार होणार असल्याने त्यातील सर्व मजकूर नव्याने नमूद करता येईल. आदेशाने जुना ७/१२ बंद नविन पोट हिस्सा तयार करणे फेरफार ने सरकार अथवा सरकारी पट्टेदार सर्वे बंद होत असल्यास, किंवा नविन तयार होत असल्यास फेरफार तयार करणेस तहसीलदार यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

११.    कोणत्याही ७/१२ वरील क्षेत्रात चूक झाली असल्यास ( ODC अहवाल १) ती दुरुस्त करण्यासाठी कलम १५५ च्या आदेशाने /१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे या फेरफार प्रकारातून फक्त क्षेत्र दुरुस्त करता येईल.

१२.   कोणत्याही ७/१२ वरील एकक नमूद करण्यात चूक झाली असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी कलम १५५ च्या आदेशाने /१२ वरील क्षेत्राचे एकक दुरुस्ती करणे या फेरफार प्रकारातून फक्त एकक दुरुस्त करता येईल.

१३.   कोणत्याही शेतीच्या  /१२ वरील एकक नमूद करण्यात चूक झाली असल्यास जसे /१२ शेतीचा असेल एकक आर.चौ.मी.असल्यास त्यासाठी १५५ मधुन बिनशेती आदेश रद्द चा फेरफार घ्यावा.

१४.   जर /१२ बिनशेती असेल त्याचे एकक हे.आर चौ.मी. असल्यास अशा /१२ साठी अनोंदणीकृत मधुन हे.आर.चौ.मी. एकक असलेले NA /१२ आर.चौ.मी. एकक मध्ये सामाविष्ठ करणे हा पर्याय वापरावा.

१५.   कोणताही शेतीचा ७/१२ बिनशेती मध्ये रुपांतरीत करताना क्षेत्र अथवा एकक चुकले असल्यास टेम्प्लेट फेरफार प्रकारातून क्षेत्र दुरुस्ती आणि क्षेत्र दुरुस्ती (शेती) असे दोन फेरफार प्रकार आहेत त्यातून क्षेत्र पटीत कमी किंवा जास्त करता येईल ( फक्त दशांश दुरुस्ती)

१६.   बिनशेती चे ७/१२ चे एकक आर.चौ.मी. मध्ये नमूद असले तरी आकारबंद ( ODC अहवाल ३) मध्ये नेहमी क्षेत्र हे.आर.चौ.मी. मध्येच नमूद करणेत यावे.

१७.  कलम १५५ च्या आदेशाने /१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे या फेरफार प्रकारातून  ७/१२ वरील एकूण क्षेत्र आणि खातेदाराचे नावासमोरील क्षेत्रात बदल करता येतो. 

१८.   कृषिक /१२ चे क्षेत्र २० हेक्टर पेक्षा जास्त अथवा अकृषिक /१२ चे क्षेत्र ९९ आर पेक्षा जास्त असल्याने सर्व्हे क्रमांक निवडुन क्षेत्र एकक बरोबर असल्याचे खात्री करुन तहसीलदार यांची मान्यता घेणे अथवा चुकीचे असल्यास आदेशाने क्षेत्र दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

१९.   कोणताही  /१२ बंद करून पुन्हा त्याच .नं. चा नवीन /१२ -फेरफार प्रणालीत तयार करता येत नाही त्यामुळे उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी बिनशेती .जा.. तयार करताना तोच .नं. कमी क्षेत्र करून नमूद करू नये त्यासाठी मूळ .नं. बंद करून त्याचे ,, असे किंवा ,, असे पोट हिस्से तयार करून त्याप्रमाणे नकाशा अंतिम करावा तसेच .जा. तहसीलदार कार्यालयाकडे गाव वहिवाटीसाठी पाठवावे. असे नकाशे .जा.. अंतिम करताना मंजूर रेखांकानाप्रमाणे सर्व बिनशेती भूखंड तसेच खुले क्षेत्र, सुविधा क्षेत्र आणि रेखांकानातील रस्त्याखालील क्षेत्राचे देखील स्वतंत्र पोट हिस्से तयार करावेत व त्याचे क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये नमूद करावे आणि शेती क्षेत्राच्या पोट हिस्स्याचे एकक हे.आर चौ.मी.मध्येच ठेवावे. सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख हे या प्रमाणेच क.जा.प. तयार करतात का? ह्याची खात्री तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी. अन्यथा अशा क.जा.प.चा अंमल घेता येणार नाही हे लक्षात घ्यावे. जरूर तर यासाठी तालुका स्थरावर उप विभागीय अधिकारी यांनी तहसीलदार व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांची एकत्रित बैठक घ्यावी .

                               वरील प्रमाणे महत्वाच्या बाबी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती.

                                                                                                आपला विश्वासू


 

                                                                                                              (रामदास जगताप )

                                                                                        राज्य समन्वयक, - फेरफार प्रकल्प

                                                                                                     जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे

प्रत,

        मा. उप आयुक्त (महसूल) , विभागीय आयुक्त कार्यालय,(सर्व)        

 

 

Comments

Archive

Contact Form

Send