OCU मधून पीक पाहणी नोंदी करतानाच नमुना १२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा व कार्यपद्धती बाबत
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे -०१
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११० Email ID :statecordinatormahaferfar@gmail.com
Web site : https://mahabhumi.gov.in
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र.रा.भू.अ.आ.का.४/रा.स. /मा.सु. क्र. १८१ /२०२० दिनांक : १७.१०.२०२०
प्रति ,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
विषय – ई फेरफार प्रणालीतील OCU मधून पीक पाहणी नोंदी करतानाच नमुना १२
डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा व कार्यपद्धती बाबत .
महोदय ,
महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम १९७१ मधील नियम ३० चे अवलोकन होण्यास विनंती आहे. या प्रमाणे गाव नमुना १२ (पिकांची नोंदवही ) मध्ये शेतातील पिकांच्या नोंदी घेण्याची कार्यपद्धती नमूद आहे तथापि राज्यातील संगणकीकृत व डिजिटल स्वाक्षरीत गा.न.नं. ७/१२ चे अवलोकन करता अनेक सातबारा मध्ये पिकांच्या नोंदी अद्यावत नसल्याचे दिसून येते त्यासाठी OCU मधून पीक पाहणी नोंदी करतानाच नमुना १२ डिजिटल स्वाक्षरीत करण्याची सुविधा देणे आवश्यक असल्याने आज दिनांक १७.१०.२०२० पासून राज्यातील सर्व तलाठी यांना ocu मधून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे . त्या बाबत सर्व समावेशक सूचना क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांना देणे आवश्यक असल्याने या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने ई -फेरफार प्रकल्प अंतर्गत ONLINECROP UPDATON ( OCU) मधून पिक पाहणी नोंदी हंगाम निहाय नमुना १२ मध्ये अद्यावत केल्या जातात. OCU मध्ये यापुर्वी पिकांची यादी तालुका निहाय ठेवण्यात आली होती. संपुर्ण राज्यात पिकांच्या यादीमध्ये समानता आणण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तालयाचे आणि चारही कृषी विद्यापीठांचे
संशोधन संचालक यांचे
मदतीने राज्यात एकाच
सर्वसमावेशक पिकांची यादी
निश्चित करण्यात आली
आहे
तसेच महाराष्ट्र जमून महसूल
नियमपुस्तिका खंड ४ मधील तरतुदी
प्रमाणे जलसिंचनाची साधने व
लागवडीस उपलब्ध नसलेल्या
क्षेत्राचा तपशील दर्शविणारी
यादी निश्चित करून
ती राज्यभरात दिनांक २७.८.२०१९ पासून OCU मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या तारखेनंतर पिक पाहणी नोंदी अद्यावत करण्यापुर्वी प्रत्येक तालुक्याचे नायब तहसिलदार ई-फेरफार तथा DBA यांनी तालुक्यात घेतल्या जाणऱ्या पिकाची नावे या यादीमधून निवडणे आवश्यक आहे. त्यानंतरच तलाठी यांना या नवीन यादी प्रमाणे पिकांच्या नोंदी नमुना १२ मध्ये घेता येतील अशी सुविधा आत्ताच्या प्रणालीत आहे. त्यानुसार चालू वर्षाच्या पिक पाहणीच्या नोंदी OCU मधून करता येईल तथापि सर्व तलाठी यांनी मागणी विचारात घेवून गत वर्षाची पीक पाहणी कॉपी करण्याची सुविधा OCU Backlog या नाशिक टेस्ट साईटवर चालू वर्षासाठी उपयोगात आणता येते. तथापि
या प्रमाणे सन
२०१९-२० या महसूल वर्षासाठी
पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत
केल्या नसल्यास सन
२०१०-२१ या महसूल वर्षाच्या
पीक पाहणी च्या
नोंदी अद्यावत करता
येणार नाहीत.
पिकांच्या नोंदी केल्यानंता त्या साठवा करतानाच त्या माहितीसह हा गाव नमुना १२ डिजिटल स्वाक्षरीत होईल त्यासाठी DSDप्रणालीत जावून हा ७/१२ पुन्हा डिजिटल स्वाक्षरीत करावा लागणार नाही फक्त DSD करतानाच्या दोन/ तीन स्टेप्स याच वेळी साठवा करताना केल्या जातील व त्यामुळे अद्यावत पीक पाहणीसह चा अद्यावत ७/१२ DDM मध्ये व महाभूमी पोर्टलवर उपलब्ध होईल.
गत वर्षासाठी वापरलेले पिकांचे संकेतांक (Crop List & Code)व सध्याचे पिकांचे संकेतांक यामध्ये तफावत असल्याने सध्या OCU Backlog हा पर्याय बंद ठेवला होता. परंतु तलाठी संवर्गाची मागणी व प्रत्येक सर्वे नंबरची OCU मधून पिक पाहणी अद्यावत करणे हे काम अत्यंत श्रमाचे व वेळखाऊ असल्याकारणाने शक्य तेवढे गत वर्षासाठी वापरलेले पिकांचे संकेतांक (Crop List & Code)व सध्याचे पिकांचे संकेतांक जुळवून सदर data आपणाला खालील जिल्ह्यांसाठी https://mahaferfarnas.enlightcloud.com/ocu_backlog/ या URL वर कॉपी करण्यासाठी उपलब्ध करून देणेत आलेला आहे. यात संकेतांक जुळविलेल्या पिकांची माहितीच कॉपी होईल आणि उर्वरित पिकांची माहिती आपणाला OCU या प्रणालीत जावून भरायची आहे.त्याकरिता OCU Backlog या प्रणालीत data कॉपी करून झाल्यानंतर पीक पाहणी अंतीम करणे (कन्फर्म करणे) हा पर्याय वापरू नका अन्यथा त्यानंतरअशा कायम केलेल्या सर्व्हे नं. वरील पिकांच्या नोंदी तलाठी यांना पुन्हा बदलता येणार नाहीत. त्यामुळे पिक पाहणीच्या नोंदी अंतीम करण्यापूर्वी त्या योग्य असलेची खात्री तलाठी यांनी करावी व त्यानंतरच पिकांची माहिती तलाठी यांनी कन्फर्म करावी .आज अखेर पुणे विभागातील सर्व जिल्हे आणि धुळे वगळून अन्य सर्व जिल्ह्यांना OCU backlog उपलब्ध करून देणेत आलेले आहे.
पीक पाहणीच्या
नोंदी हंगाम निहाय अद्यावत करताना खालील प्रमाणे काळजी घ्यावी.
१.
पिकांच्या
नोंदी ज्या त्या हंगामा मध्येच अद्यावत करण्यात याव्यात.
२.
पिकांच्या
नोंदी कायम केल्यानंतर त्यात तलाठी यांना पुन्हा बदल करता येत नाही अथवा या नोंदी
नष्ट देखील करता येणार नाहीत मात्र
कोणत्याही पिकाची नोंद चूकली असल्याची
भोगवटादाराच्या लेखी विनंती वरून मंडळ अधिकारी यांना त्या त्या हंगामात
पंचा समक्ष पाहणी करून भेटीचा दिनांक नमूद करून एकधा कोणत्याही पिकांमध्ये एकदा
बदल मंडळ अधिकारी यांना करता येईल व त्याचा अहवाल तहसीलदार यांना उपलब्ध होईल.
३.
पीक
पाहणी करताना मिश्र पिके व निर्भेळ पिके त्या त्या रकान्यात भरावित तसेच पीक
बागायती असल्यास क्षेत्र जल सिंचित आणि जिरायत असल्यास अजल सिंचित या रकान्यातच
नमूद करावे.
४.
निर्भेळ
पिका खालील क्षेत्र निर्भेळ पीक रकान्यात नमूद करावे. ते पीक बागायती असल्यास
जलसिंचीत आणि जिरायत असल्यास अजलसिंचीत मध्येच नमूद करावे. .
५.
लवकरच
राज्यात ई चावडी प्रणालीची अंमलबजावणी सुरु होणार आहे त्यामध्ये बागायती पिकावर
रोहयो कर आणि नगदी पिकावर शिक्षण कर संगणकीय प्रणाली द्वारे निश्चित केला जाणार
असल्याने पिकांच्या नोंदी अचूक न केल्यास खातेदार निहाय शिक्षण कर व रोहयो कर आणि वाढीव
शिक्षण कर निश्चित करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
६.
प्रत्येक
जल सिंचित पिकासाठी सिंचनाचे साधन निवडणे आवश्यक आहे मात्र लागवडीस उपलब्ध नसलेले
क्षेत्र मध्ये कायम पड हे वार्षिक हंगामात नमूद करावे तर चालू पड ज्या त्या
हंगामात नमूद करावे.
७.
लागवडीस
उपलब्ध नसलेल्या क्षेत्राची नोंद त्याचे स्वरूप व क्षेत्र अचूक नमूद करावे
त्यांनतर उर्वरित क्षेत्रावरच पिकांच्या नोंदी घेता येतील.
८.
पिकांच्या
नोंदी घेताना लागवडी लायक क्षेत्र व पोट खराब वर्ग अ चे क्षेत्र या मर्यादेतच घेता
येतील.
९.
बिनशेती
च्या ७/१२ वर पिकांच्या नोंदी घेण्याची आवश्यकता नसल्याचे शासनाने सन १९९७ मध्येच
निर्देश दिले आहेत.
१०.
सन
२०२०-२१ मधील कोणत्याही हंगामासाठी पिकांच्या नोंदी कॉपी करताना त्यांचे संकेतांक
क्रमांक जुळलेले नाहीत त्या पिकांच्या नोंदी OCU मधून घेवूनच पिकांच्या नोंदी
साठवाव्यात.
११.
पिकांच्या
अचूक नोंदी करताना पिकांची माहिती शेतकऱ्याकडून लेखी प्राप्त करून घेवूनच अथवा SMS
मेसेज / whats APP यांची मदत घ्यावी.
१२.
ई
पीक पाहणी च्या पथदर्शी प्रकल्पात समाविष्ट तालुक्यांमधून ज्या खातेदारांची पीक पाहणी ची माहिती ई पीक
पाहणी च्या मोबाईल AAP द्वारे येणार नाही त्या खातेदारांच्या पिकांची माहिती तलाठी
यांनी OCU मधून भरणे आवश्यक असेल.
आपला विश्वासू
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
Sir dhule district la pikpahani copy suvidha Kenva denar?
ReplyDeleteLogin hot nahi.null reference error yet aahe
ReplyDeleteLogin होत नाही .null reference error येत आहे
ReplyDeleteनमस्ते सर ,वाशीम जील्यातून कारंजा तालुका मध्ये काही गावा मध्ये पेरे आपण दिलेल्या साईट वरून सर्व प्रक्रिया पूर्ण कारणही पेरे कॉपी होत नाही आहे .काही मध्ये होत आहे .असे का होत आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती .
ReplyDeleteDear sir
ReplyDeleteDSD hone ke bad bhi digital 7/12 correct print nahi ho raha hai.
Crop detils bhi correct bhi bai....
Aur use talathi edit bhi nahi kar sakate
Required solution
Dear sir
ReplyDeleteDSD hone ke bad bhi digital 7/12 correct print nahi ho raha hai.
Crop detils bhi correct bhi bai....
Aur use talathi edit bhi nahi kar sakate
Required solution
Dear sir
ReplyDeleteDSD hone ke bad bhi digital 7/12 correct print nahi ho raha hai.
Crop detils bhi correct bhi bai....
Aur use talathi edit bhi nahi kar sakate
Required solution