रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अभिनंदन , जळगाव जिल्हा फेरफार निर्गती मध्ये प्रथम क्रमांकावर

 

अभिनंदन , जळगाव जिल्हा फेरफार निर्गती मध्ये प्रथम क्रमांकावर


                      दिनांक १.१०.२०२० रोजी मा. महसूल मंत्री महोदयांनी सर्व विभागीय आयुक्त व जमाबंदी आयुक्त यांच्या बैठकीत ई फेरफार प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी अहमदनगर जिल्हा ३४ व्यास्थानी होता त्यामध्ये सर्वाधिक ८६००० फेरफार नोंदी प्रलंबित होत्या त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याच दिवशी मा. विभागीय आयुक्त नाशिक यांनी सर्व तहसीदार व प्रांत अधिकारी यांना सूचना देवून तीन दिवसात निर्गती वाढविण्याचे निर्देश दिले असता नाशिक विभागात त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत असून १.१०.२०२० ते १२.१०.२०२० या बारा दिवसात नाशिक विभागात सर्वाधिक म्हणजेच  १.१० लाख  फेरफार निर्गत झाले असून त्यापैकी  ५९,७६६  इतके सर्वाधिक फेरफार अहमदनगर जिल्ह्यात निर्गत झाले असून या विभागातील जळगाव जिल्हा फेरफार निगतीमध्ये प्रथम स्थानी आला आहे त्याबद्दल टीम जळगाव चे मनपूर्वक अभिनंदन .
                  दिनांक १ ऑक्टोबर रोजी राज्यात ५.३९ लक्ष फेरफार प्रलंबित होते त्यामध्ये १ ऑक्टो ते १२ ऑक्टो २०२० या १२ दिवसात १.३१ लक्ष नवीन फेरफार दाखल करून घेण्यात आले तर २.०७ लक्ष फेरफार निर्गत करण्यात आले आहेत तरी अद्याप ४.६२ लक्ष फेरफार निगत होण्यावर प्रलंबित असून त्यापैकी सुमारे १७ हजार फेरफार विवादग्रस्त / तक्रार फेरफार म्हणून सुनावणी वर आहेत . सदरचे प्रलंबित फेरफार पैकी निर्गत करण्यास पत्र असले सर्व फेरफार वेळेत निर्गत करून घेण्याचे  निर्देश महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर साहेब व जमाबंदी आयुक्यांत यांनी  सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.  
 
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक 
ई-फेरफार प्रकल्प 

दि. १३,१०.२०२०

Comments

Archive

Contact Form

Send