रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नियंत्रित सत्ता प्रकारातील अथवा भोगवटादार वर्ग-२ ने धारण केलेल्या मिळकतींचे दस्त नोंदणी व फेरफार बाबत परिपत्रक .

 

वाचा:- 1)  महाराष्ट्रजमीनमहसुलअधिनियम १९६६ चेकलम२९

             2) महाराष्ट्रजमीनमहसुलअधिकारअभिलेखनोंदवहया (तयारकरणेवसुस्थितीतठेवणे) नियम,१९७१

              3)  याकार्यालयाकडीलपरिपत्रकक्रमांक. दिनांक१७//२०१५

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्र.रा.भू...का./नियंत्रित सत्ता प्रकार/२०२०

      जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख

        महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय,

        पुणे. दिनांक    /०२/२०२०

 

परिपत्रक-

 

 

                       विषय:- नियंत्रित सत्ता प्रकारातील अथवा भोगवटादार वर्ग- ने धारण केलेल्या

                                  मिळकतींचे दस्त नोंदणी फेरफार बाबत.

 

                              शासनाचे दिनांक १७/३/२०१२ चे शासन परिपत्रकाप्रमाणे गा..नं. () मध्ये सुधारणा करण्यात येऊन धारण जमीनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध विचारात घेवुन भोगवटदार वर्ग चे ते १४ असे उप प्रकार करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे हस्तलिखीत गा..नं. () तयार करुन वापरात आणला असेल अशी अपेक्षा आहे.  त्यानंतर ७/१२ संगणकीकरणामध्ये देखील गा..नं. () मधील भोगवटादार वर्ग ने धारण केलेल्या मिळकतीच्या तसेच गा..नं. () मध्ये नसलेल्या मिळकती दस्त नोंदणीसाठी हस्तांतरणाचे संबंधी फेरफार घेण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत.  राज्यात सध्या सुरु असलेल्या - फेरफार प्रणालीतुन अशा सर्व नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमीनीवरील जमीनीच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवलेले आहे.  त्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

 

                           संगणकीकरणा मध्ये  गा.न.नं.  () मधील भोगवटादार वर्ग ने धारण केलेल्या मिळकतीच्या आणि गा..नं.  () मध्ये नसलेल्या  परंतु वर्ग १ ने धारण केलेल्या मुळच्या आदिवासींच्या जमिनी व वर्ग १ ने धारण केलेल्या कुळ कायदा कलम ६३ (१) (अ) प्रमाणे खऱ्याखुऱ्या औदोगिक वापरासाठी खरेदी केलेल्या मात्र हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या   मिळकती  तसेच सरकार वसरकारी पट्टेदार म्हणून धारण केलेल्या मिळकतींचे हस्तांतरण दस्त नोंदणीसाठी व हस्तांतरणाचे संबंधी फेरफार घेण्यासाठी  ई-फेरफार प्रणाली मध्ये प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.

 

          1.भोगवटादारवर्ग१नेधारणकेलेल्याजमिनी-

 

.नं.

प्रकार

तपशिल

1

2

3

1.

उप प्रकार -1

आदिवाशी खातेदार ची वर्ग १ ची जमीन

2.

उप प्रकार -2

मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी

 

२.  भोगवटादार वर्ग २  ने धारण केलेल्या जमिनी-

 

.क्रं.

प्रकार

तपशिल

1

2

3

1

उप प्रकार 1

कुळ कायदाच्या जमीनी (१)

2

उप प्रकार 2

इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुण) (२)

3

उप प्रकार 3

भूमीहीन/शेतमजुर/स्वातंत्र सैनीकयांना वाटप जमीनी (३)

4

उप प्रकार 4

गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक संस्था यांना वाटप जमीनी (४)

5

उप प्रकार 5

कायद्या अंतर्गत वाटप जमीनी/शेत जमीन कमाल धारणा (५)

6

उप प्रकार 6

म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीनी (६)

7

उप प्रकार 7

देवस्थान इनाम जमीनी (७)

8

उप प्रकार 8

आदिवासी खातेदारांच्या जमीनी (८)

9

उप प्रकार 9

पुर्नवसन कायद्या अंतर्गत वाटप जमीनी (९)

10

उप प्रकार 10

भाडे पट्ट्याने दिलेल्या शासकीय जमीनी (१०)

11

उप प्रकार 11

भूदान व ग्रामदाण अंतर्गत दिलेल्या जमीनी (११)

12

उप प्रकार 12

वन व सिलिंग कायदा अंतर्गत चौकशीवर प्रलंबित जमीनी (१२)

13

उप प्रकार 13

भूमीधारी हक्काने प्राप्त झालेल्या  जमीनी (१३)

14

उप प्रकार 14

सिलिंग कायदया अंतर्गत सुट दिलेल्या जमीनी (१४)

 

   २.       सरकार भूधारणा असलेल्या जमिनी -

   ३.       सरकारी पट्टेदार म्हणून धारण केलेल्या जमिनी-

 

                     राज्यात सध्या सुरु असलेल्या -फेरफार प्रणालीतुन वरील प्रमाणे  सर्व नियंत्रित सत्ताप्रकाराच्या जमीनी वरील जमीनीच्याहस्तांतरणावर नियंत्रण ठेवलेले आहे. त्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात  येत  आहेत.         

 

१.        चावडीवाचनाच्यावेळीप्रत्येकगावासाठीनियुक्तकेलेल्यामहसूलपालकअधिकाऱ्यानेतहसिलदारयांनीप्रमाणीतकेलेलाहस्तलिखीत गा..नं.() (सुधारीत) प्रमाणेसर्वनोंदीसंगणकीकृत७/१२ मध्येघेण्यातआल्याचेसंगणकीकृतगा..नं.  () तपासुनप्रमाणितकेले असतील अशी अपेक्षा आहे.

२.       वरील प्रमाणे जमीन हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या भोगवटदार वर्ग (गा.न.नं. क) समवेत सरकार, सरकारी पट्टेदार म्हणून धारण  केलेल्या  जमीन मिळकतीभोगवटदार वर्ग मधील अ) आदिवासी खातेदाराने धारण केलेले वर्ग -१  च्यामिळकती आणि ) कुळकायदा कलम ६३(१अअन्वये खऱ्याखुऱ्याऔदयोगिकवापरासाठीखरेदीकेलेल्यामिळकती दुय्यम निबंधक यांचेकडे दस्त नोंदणीसाठी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत.

३.       दुय्यम निबंधक यांची जबाबदारी- अशा ७/१२ वर सदरची मिळकत प्रतिबंधीत सत्ताप्रकारमध्येअसलेनेदस्तनोंदणीकरतानाजिल्हास्थरावर  उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. व तालुकास्थरावर तहसीलदार यांचेशीसंपर्क साधावा असा मेसेज आल्यास संबंधीत दुय्यम निबंधक यांनी संभाव्य  खरेदी करणार /  विक्री व्यवहार करणाऱ्यांनातहसिलदारयांचेशीसंपर्कसाधणेबाबतकळवावे. या बाबत दुय्यम निबंधक यांनी त्यांचेकडे दस्त नोंदनिशी संबंधित दस्त लेखनिक  किंवा वकील यांना या बाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.

४.       अशाबाबतीलसक्षम अधिकाऱ्यांचे परवानगीआदेश पाहून अथवाशेतीकारणासाठीहस्तांतरकरणेसाठीअथवाजमीनतारणठेवण्यासाठी  परवानगीचीगरजनाहीह्याचीखात्रीकरूनतहसिलदारहस्तांतरणासाठीसदरचासर्व्हेनं./ गटनं. आज्ञावलीतुनयुजरक्रेयेशन (UC) मधूनआपल्याBiometric लॉगीननेतात्पुरताखुला (UNBLOCK)करूनदेतील. याबाबतची नोंदवही दिनांक १०.३.२०१६रोजीच्यापत्रातनमुदकेल्याप्रमाणे असेल जिल्हास्थरावरवतालुकास्थरावरठेवणेतयावीवसदरच्यापत्रातीलसुचनाडी.डी.ईवतहसिलदारयांनालागूराहतील.

५.       डी.डी.ई.तथा उप जिल्हाधिकारी यांची जबाबदारी -विभागीयआयुक्तवजिल्हास्थरावरहस्तांतरपरवानगीअथवातारणदेण्यासाठीचीपरवानगीआदेशदिलेल्यासर्वजमिनीचेसर्वेनं / गटनं चे आदेश पाहून संबंधित जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी तथा  डी. डी. ई यांनी असे प्रतीबंधीत स.नं./ग.नं. तात्काळ तात्पुरते खुले (unblock)करून द्यावेत. त्याच्या नोंदी नोंदी दिनांक १०.३.२०१६ रोजीच्या नमुन्यातील नोंदवहीत ठेवाव्यात.

६.       तहसीलदार यांची जबाबदारी -उप विभागीय अधिकारी  व तालुका  स्थरावर हस्तांतर परवानगी अथवा तारण देण्यासाठीची परवानगी आदेश दिलेल्या सर्व जमिनीचे सर्वे नं / गट नं  चे आदेश पाहून संबंधित तालुक्याचे तहसीलदार  यांनी आपले Biometric लॉगीनने असे गट न./ स.न. तात्काळ तात्पुरते खुले (unblock)करून द्यावेत व त्याच्या नोंदी दिनांक १०.३.२०१६  प्रमाणे विहीत केलेल्या नोंदवहीत ठेवाव्यात.  ज्या ठिकाणी अशा आदेशाची गरज नाही त्याची खात्री करून तहसीलदार तो सर्वे न / गट नं unblock करून देतील व तशी नोंद देखील नोंदवहीत ठेवतील .

७.      जमीन हस्तांतरणावर निर्बंध असणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणासाठी परवानगी देण्यास सक्षम असलेल्या अधिकाऱ्यानेपरवानगी आदेश देताना त्याची आदेशाची प्रत संबंधीत  उपजिल्हाधिकारी /(डी.डी.) व तहसिलदार व  संबंधीत दुय्यम निबंधक यांनी प्रतीलीपीत करावी. तसेच उपजिल्हाधिकारी/ तहसिलदार यांना या आदेशाप्रमाणे हस्तांतरणासाठी हा सर्व्हे नंबर / गट नं.  युजर क्रियेशन मॉडयुलमधून तात्पुरता खुला (Unblock) करावा असे निर्देश द्यावेत. असा UNBLOCK केलेला सर्व्हे नंबर / गट नंबर एक दस्त नोंदणी अथवा फेरफार घेईपर्यंतच unblock राहील.  त्यानंतर असा गट / सर्वे नं पुन्हा block होईल. या मुळे नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या जमिनींचे विनापरवाना हस्तांतर व शर्तभंग होण्यास प्रतिबंध बसेल .

८.       मंडळ अधिकारी यांची जबाबदारी - अशा पद्धतीने सर्वे नं / गट नं unblock केला तरी फेरफार मंजूर करताना आशा परवानगी आदेशाची खात्री करूनच मंडळ अधिकारी यांनी फेरफार निर्गत करावेत.

९.       सरकार ही  भूधारणा असलेल्या  गाव.न.नं. ७/१२  वर फक्त आदेश व दस्ताऐवज या फेरफार प्रकारातून तसेच जुना 7/12 बंद करून नविन पोटहिस्स तयार करणे हे फेरफार घेता येतील हयाची नोंद घ्यावी.

१०.    सदरच्या सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, डी डी ई व परवानगी देण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती

 

 

 

जमाबंदी आयुक्त यांचे मान्यतेने निगमित  दिनांक २.३.२०२० .

 

 

 

प्रत- मा.नोंदणी महानिरीक्षक व  मुद्रांक  नियंत्रक,  महाराष्ट्र राज्य, पुणेयांना माहितीसाठी सादर.

प्रतमा. जिल्हाधिकारी (सर्वयांना माहितीसाठी सादर.

प्रतमा.उपआयुक्त (महसूल) (सर्वयांना माहितीसाठी सादर.

प्रतमा.उपसंचालक भूमि अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी सादर.

प्रत-सह जिल्हा निबंधक, नोंदणी व मुद्रांक शुल्क माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रतउपविभागीय अधिकारी-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रत-जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख -(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रततहसिलदार-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रत -उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रत-दुय्यम निबंधक नोंदणी व शुल्क यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

Comments

Archive

Contact Form

Send