महसूल विभागाकडून तयार होत आहे स्वत:चे "महाभूमी ॲप '
कुठेही जाण्याची गरज नाही
आता सातबारा उतारा येणार आपल्या मुठीत
महसूल विभागाकडून स्वत:चे "महाभूमी ॲप ' तयार
सातबारा उतारा पाहायचा आहे.? यांची सत्यता तपासणी करावयाची आहे.?. एवढेच नव्हे तर तुम्ही जेथे असला तेथे तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा हवा आहे... मग काळजी करू नका. आता या सगळ्या गोष्टी आता तुमच्या हातात अर्थात मोबाईल मध्ये असणार आहेत. कारण महसूल विभागाने स्वत:चे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरून या सर्व गोष्टी करणे शक्य होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा ऑनलाइन करण्यावर महसूल विभागाने भर दिला आहे. यापूर्वीच ई-फेरफार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे . त्यायाच प्रकल्पात अनेव नाव नवीन ऑनलाईन सुविधा राज्यातील जनतेला महसूल विभाग उपलब्ध करून देत आहे.
ई फेरफार प्रकल्पांतर्गत ऑनलाइन सातबारा उतारा, फेरफार उतारा , आठ "अ' चा खाते उतारा आदी सुविधा ऑनलाइन पुरविल्या जातात. त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतार आणि १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा देखील उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील खात्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु या सर्व सुविधा वापरण्यासाठी महाभूमी पोर्टलवर जावे लागते त्यासाठी प्रत्येकाकडे संगणक किंवा LAPTOP असेलच असे नाही तसेच वेब साईट चे नाव लक्षात नसेल तरीही महसूल अभिलेख मिल्याण्यासाठी व या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महसूल विभागाने स्वताचे महाभूमी हे मोबाईल ॲप तयार करायचा निर्णय घेतला आहे . या ॲप च्या माध्यमातून या सुविधा आता नागरिकांच्या हातात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महसूल विभागाकडून तयार करण्यात येत असलेले हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सहा तालुक्यांतमध्ये टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिले आहे . त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यायचा समावेश आहे. या टेस्टिंग व्हर्जन मधील काही त्रुटी दूर करून लवकरच हे मोबाईल ॲप सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता सातबारा उतारा आता खऱ्या अर्थाने खातेदारांच्या मुठीत येईल.
--------
या ॲपचे काय फायदे -
1) विनास्वाक्षरीत सातबारा ची माहिती पाहण्यासाठी संगणकाची गरज नाही
2) प्रत्येकी 15 रुपये शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा व खाते उतारा मिळणार
3) सातबारा उताऱ्यावरील क़ूआर कोड स्कॅन करून काही क्षणात त्याची सत्यता पडताळणी करता येणार
4) लवकरच अन्य सुविधा देखील या ऍपवर उपलब्ध होणार
सध्या हे मोबाईल ॲप खेड (पुणे) , सिन्नर (नाशिक) , कनकवली ( सिंधुदुर्ग ) , नांदेड , मुर्तीजापुर (अकोला ) नागपूर ग्रामीण ( नागपूर ) या तालुक्यात टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिले आहे .
महत्वाचा संदेश -
महसूल विभागाकडून स्वत:चे ॲप तयार करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ते सहा तालुक्यां मध्ये टेस्टिंग साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पहिल्या टप्यात फक्त सातबारा व खाते उतार पाहणे व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतार शुल्क भरून काढता येणार आहे. लवकरच ई-रेकॉर्ड,ई-हक्क प्रणाली, आपली चावडी, डिजिटल भू-नकाशे आदी सुविधा देखील या ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे महसूल चे सर्व अभिलेख सामान्य माणसाच्या मुठीत उपलब्ध असतील असा शासनाचा प्रयत्न आहे.
रामदास जगताप (उपजिल्हाधिकारी तथा राज्याचे ई फेरफार प्रकल्प समन्वयक)
Comments