रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सुधारित विनास्वाक्षरीत गाव नमुना नं ७/१२ माहितीची मोबाईलॲप वरून वापरकर्ता स्वीकृती चाचणी अहवाल (UAT) सादर करणे बाबत


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १.
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०               Email ID : statecordinatormahaferfar@gmaail.com                                                                                                                Web site: https://mahabhumi.gov.in            
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक: क्र.रा.भू.अ.का.४/रा.स./ मोबाईलॲप UAT/२०२०                                        दिनांक:   २०..२०२०


प्रति,
   मा. डी.डी.ई. तथा उप जिल्हाधिकारी,
   पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नांदेड, अकोला व नागपूर

                                         
                                विषय :- सुधारित विनास्वाक्षरीत गाव नमुना नं ७/१२ माहितीची मोबाईलॲप
                     वरून वापरकर्ता स्वीकृती चाचणी अहवाल (UAT) सादर करणे बाबत

            


महोदय,

                               
                     दिनांक ३.२.२०२० च्या शासन निर्णयान्वये  शासनाने गाव नमुना नं ७/१२ व ८(अ) मध्ये वरच्या 
बाजूला मध्यभागी  महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क टाकण्यास
 मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे विहित गाव नमुना नं.७/१२ मध्ये यथोचित बदल करणेत आला आहे
 त्याचवेळी सध्याचा गाव नमुना नं.७/१२ मध्ये कालानुरूप काही बदल करून तो सामान्य 
माणसाला समजण्यासाठी अधिकसोपा होण्यासाठी विनास्वाक्षरीत संगणकीकृत ७/१२  मध्ये खालीलप्रमाणे 
बदल करण्यात आले आहेत. ते भूलेख संकेतस्थळावरून जनतेला गाव नमुना ७/१२ ची माहिती म्हणून 
उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. सदरची गाव नमुना ७/१२ ची माहिती मोबाईल अप्प वर देखील 
उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांनी ई मॲपहाभूमी हे मोबाईल 
ॲप विकसित केले आहे त्याचे सर्वांगाने टेस्टिंग होणे आवश्यक आहे.

१.       गाव नमुना नं.७ माहितीमध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अ+ब) दर्शविण्यात येईल.
२.       नमुना ७ माहिती मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे.
३.       खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे तो आता नमुना ७ माहिती मध्ये खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल. व त्यासोबत त्याचा खातेप्रकार देखील दर्शविण्यात येईल.
४.       नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या, आत्ता  ती कमी केलेली नावे व नोंदी नमुना ७ च्या माहिती मध्ये कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून (strike through) खोडून दर्शविण्यात येतील.
५.       कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
६.       कोणत्याही नमुना ७ च्या माहिती मध्ये या ७/१२ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकाण्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन समाविष्ट रकान्यात दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
७.       या नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ च्या माहितीवर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.
८.       नमुना ७ च्या माहिती मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेद लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
९.       नमुना १२ मध्ये ज्या रकान्यात कोणतीही माहिती नाही असे मिश्रणाचा संकेतांक, अजलसिंचीत व जलसिंचीत हे तीन रकाने दर्शविण्यात येणार नाहीत.
१०.    बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने  या क्षेत्रासाठी गाव नमुना नं १२  ची आवश्यकता नाही  अशी सूचना छापण्यात येईल.

               वरील प्रमाणे सर्व सुधारणासह गाव नमुना ७/१२ ची माहिती फक्त माहितीसाठी
 जनतेला या मोबाईल ॲप द्वारे मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोबाईल ॲप 
वरील या सुधारित गाव नमुना ७/१२ ची माहिती चे आपले जिल्ह्यातील खाली नमूद केलेल्या
 तालुक्यात  टेस्टिंग करून वापरकर्ता स्वीकृती चाचणी अहवाल (UAT) आपले अभिप्रायासह इकडे तातडीने सादर करावा.



अ.न.
विभाग
जिल्हा
तालुका
UAT क्षेत्र
१.
पुणे
पुणे
खेड
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे
२.
नाशिक
नाशिक
सिन्नर
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे
३.
कोंकण
सिंधुदुर्ग
कणकवली
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे
४.
औरंगाबाद
नांदेड
नांदेड
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे
५.
अमरावती
अकोला
मुर्तीजापूर
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे
६.
नागपूर
नागपूर
नागपूर (ग्रामीण)
दोन शहरी व तीन ग्रामीण क्षेत्रातील गावे

या साठीचा मोबाईल ॲप चा apk या सोबत पाठविण्यात येत आहे. सदरचे ॲप android मोबाईल वर 
 install करून सदरचे टेस्टिंग तलाठी / मंडळ अधिकारी यांनी करावयाचे आहे. या ॲप मधून
 डाऊनलोड झालेल्या ७/१२ माहितीची पडताळणी भूलेख संकेतस्थळावरील (https://bhulekh.mahabhumi.gov.in ) विनास्वाक्षरीत गाव नमुना नं.७/१२ शी पडताळणी करून त्यातील सर्व माहिती अचूकरीत्या या ७/१२ च्या माहिती नमुन्यात आली आहे ह्याची खात्री करून गाव निहाय वापरकर्ता स्वीकृती चाचणी अहवाल (UAT) आपले अभिप्रायासह आठ दिवसात इकडे पाठवावेत ही विनंती .


        सूचना -  सदरच्या बदलासाठी अद्याप शासनाची मान्यता प्राप्त नसल्याने मोबाईल ॲप चा apk फक्त 
                 टेस्टिंग साठी वापरावा .

                                                                आपला विश्वासू








                                                                     (रामदास जगताप)
                                                            राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
                                                           जमाबंदी आयुक्त कार्यालय, म.रा., पुणे


प्रत ,
     तहसीलदार / नायब तहसीलदार (ई-फेरफार)
     खेड, सिन्नर, कणकवली, नांदेड, मुर्तीजापुर, नागपूर (ग्रामीण)   यांना माहितीसाठी व उचित कार्यवाही साठी.










          मोबाईल ॲप वापरकर्ता स्वीकृती चाचणी अहवाल (UAT Report) तालुका -    जिल्हा.-
अ.न.
बाब
तलाठी यांचे अभिप्राय
मंडळ अधिकारी / ना.तह.यांचे अभिप्राय
१.
गाव व तालुका


२.
किती स.नं./गट नं. चेक केले ?


३.
भूलेख वरील ७/१२ प्रमाणे सर्व माहिती या मध्ये आली का ?


४.
७/१२ ची माहिती डाऊनलोड होण्यास किती वेळ लागला ?


५.
मोबाईल ॲप मध्ये काही सुधारणा आवश्यक वाटतात काय ?


६.





Comments

Archive

Contact Form

Send