रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणाली मध्ये दि १०.६.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा


ई फेरफार प्रणाली मध्ये दि १०.६.२०२० पासून दिलेल्या नवीन सुविधा


        लॉक डाऊन च्या काळात विकसित केलेल्या अनेक नवीन सुविधा आज रिलीज केल्या आहेत .
१.    एका पेक्षा जास्त गावातील जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणी एकाच दस्ताने नोंदणीकृत करणेची सुविधा व वेगवेगळ्या गावचे फेरफार क्रमांक SRO कळविणे तसेच दस्त नोंदणीची माहिती ज्या त्या गावचे तलाठी यांचेकडे ऑनलाईन पाठविणेची सुविधा.
२.    आय सरिता मधील दस्त नोंदणीच्या PDE साठी ७/१२ व ८अ ची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणेची सुविधा व त्यात दस्त नोंदणीच्या वेळी चेकिंग करणेची सुविधा.
३.    आय सरिता मध्ये ७/१२  वरील सर्व खाता क्रमांक निवडण्याची सोय – त्यामुळे आत्ता खाता क्रमांक निवडून दस्त नोंदणी करता येईल.
४.    कोणताही ७/१२ महत्वाच्या दुरुस्तीसाठी तहसीलदार यांनी राखीव ठेवण्याची सुविधा / मार्किंग ची सुविधा.
५.    फक्त माहितीसाठी असलेल्या गाव नमुना ७ व १२ ची माहिती मोबाईल वर उपलब्ध करून देण्यासाठी चा नमुना तयार केला आहे.  लवकरच मोबाईल aap उपलब्ध होणार.
६.     चालू फेरफार क्रमांका पेक्षा मोठे फेरफार क्रमांक कायम करणेसाठी नवीन फेरफार सुविधा (कलम १५५ अंतर्गत एक नवी सुविधा).
७.    बिनशेती आदेश रद्द झाल्यास पुन्हा जिरायत बागायत व पोटखराब असे क्षेत्र ७/१२ वर नमूद करण्याची सुविधा.
८.     आदेशाने जुना /१२ बंद नवीन पोट हिस्सा तयार करण्यासाठी केलेले काम रद्द करणे हा नवीन पर्याय आदेशाने जुना /१२ बंद नवीन पोट हिस्सा तयार करणे साठी केलेले चुकीचे काम रद्द करून पुन्हा नवीन ७/१२ तयार करणेसाठी उपलब्ध करणे.
९.    तलाठी स्थरावरील चुकीचे झालेले किंवा तहसीलदार यांनी नामंजूर केलेले खाता दुरुस्तीचे काम रद्द करण्याची सुविधा.
१०.        कलम १५५ च्या आदेशाने अहवाल ची दुरुस्ती करणे मधून नमुना ७ वरील क्षेत्र दुरुस्तीची सुविधा बंद करून त्यात फक्त खातेदाराचे क्षेत्र दुरुस्त करता येईल तर नामुंना ७ वरील क्षेत्र दुरुस्तीसाठी आदेशाने /१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती करणे हा पर्याय  तहसीलदार यांचे मान्यतेने वापरावा.
११.        या पूर्वीचे काही फेरफार साठी DSD केले नसेल तर चालू फेरफार मंजुरी नंतर DSD आपोआप होत नव्हते आत्ता या पूर्वीचा मंजूर फेरफार नंतर ७/१२ DSD केला नसला तरी सध्याचा फेरफार प्रमाणित करताना आपोआप ७/१२ DSD होईल अशी सुविधा दिली आहे.
१२.        बंद केलेल्या ७/१२ साठीचे सर्व ODC अहवाल वगळले आहेत त्यामुळे आत्ता बंद केलेले ७/१२ DSD साठी प्रलंबित असल्याचे दाखविले जाणार नाही.
१३.        समस्या निराकरण (RIS) मध्ये खालील नवीन सुविधा दिल्या आहेत .
1)      फेरफार प्रमाणित करण्यास असलेल्या dashboard मध्ये फेरफार क्रमांक दिसून येतो
 परन्तु फेरफार निवडल्या नंतर प्रमाणित करण्यास सर्वे दिसत नाही.
     2)  १५५ मंडळ अधिकारी प्रमाणीकरण (फेरफार निहाय) mis मध्ये प्रलंबित दिसतात
     3)  या फेरफार मधील सर्वे वर नविन फेरफार घेताना सदर फेरफार चे मंडळ अधिकारी
    यांचे मार्फत कन्फर्मेशन बाकी आहे असा मेसेज येत आहे.
       4)  प्रमाणीकरण डॅशबोर्ड त्रुटी
१४. कलम १५५ ने फेरफार रजिस्टर दुरुस्ती सुविधे मध्ये तहसीलदार यांनी दुरुस्ती अमान्य केल्यास पुन्हा नव्याने फेरफार दुरुस्तीसाठी काम करता येईल.
१५. तलाठी साजे व महसूल मंडळे तयार करून नायब तहसीलदार ई फेरफार यांनी प्रमाणपत्र देण्याची सुविधा – त्याचे शिवाय DDM मध्ये चलन तयार होणार नाही.
१६. VAN द्वारे बँक ऑफ बडोदा मध्ये भरलेल्या चलनाचे ऑनलाइन ताळमेळ अहवाल (Reconciliation) तलाठी व वरिष्ठ अधिकारी यांना उपलब्ध.
१७. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे जुने संकेतस्थळ    ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/DSLR) बंद करून https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/) हे नवीन संकेतस्थळ ESDS क्लाऊड वर सुरु केले आहे.
१८. आय सरिता प्रणालीतून होणारे आदलाबदल दस्त आता थेट तलाठी कडे ऑनलाईन येतील. त्यासाठी नवीन टेम्प्लेट फेरफार तयार केला आहे.
१९. आय सरिता प्रणालीतून होणारे वाटणीपत्र आता थेट तलाठी कडे ऑनलाईन येतील. त्यासाठी नवीन टेम्प्लेट फेरफार तयार केला आहे.
२०. आय सरिता प्रणालीतून होणारे भाडेपट्टा दस्त आता थेट तलाठी कडे ऑनलाईन येतील. त्यासाठी नवीन टेम्प्लेट फेरफार तयार केला आहे.


आपला

रामदास जगताप
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
दि.१०.६.२०२०

Comments

  1. नमस्कार साहेब, माझ्या वयक्तिक ७/१२ मध्ये गेली दोन वर्षांपासून पोकळीस्त फेरफार नंबर उतारा ७ च्या खाली दर्शीवीत आहे. याबद्दल मा.तलाठी भाऊसाहेब यांना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, सदरचे फेरफार हे सरकारी ७/१२,८अ चेसॉफ्टवेअर सिस्टम मुळे आपोआप फेरफार नंबर ७/१२ मध्ये समाविष्ट होत आहेत. परंतु त्याची फेरफार रजिस्टर मध्ये नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरची नोंद आपोआप सदरच्या ७/१२ मधून निघून जाते. परंतू गेली दोन वर्षांपासून सदरचे पोकलिस्त फेरफार नंबर माझ्या उताऱ्यात अद्याप कमी झालेले नाही. कृपया या संदर्भात खुलासा केल्यास खूप आभारी असेल.धन्यवाद..!!

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send