रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तलाठी साजे व महसूल मंडळे तयार करून प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यात दुरुस्ती करणेची व त्याप्रमाणे चलन तयार करून नक्कल फी बँकेत जमा करणे बाबत. मार्गदर्शक सूचना क्र. 160 दि . 27.5.2020


महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (.राज्य) , पुणे
दूसरा व तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, विधान भवन समोर, कॅम्प, पुणे १.
दूरध्वनी क्र. ०२०-२६१३७११०                  Email ID : statecordinatormahaferfar@gmail.com         
                                                                                     Web site:  https://mahabhumi.gov.in            
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.अ.का./रा.स./मा.सू./१६०/२०२०                                              दिनांक:   .५.२०२०


  प्रति,
          उप  जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).

         विषय  UC  मध्ये तलाठी साजे व महसूल मंडळे तयार करून प्रमाणपत्र 
                दिल्यानंतर त्यात दुरुस्ती करणेची व त्याप्रमाणे चलन तयार करून
                नक्कल फी बँकेत जमा करणे बाबत.

         संदर्भ -  महसूल व वन विभाग, पत्र क्रमांक-संकीर्ण 2018/प्र.क्र.57/म-10 दि.26/4/2018

महोदय ,

                   ई फेरफार प्रणाली मध्ये युझर क्रिएशन (UC)  मध्ये तत्कालीन DBA  तथा सध्याचे नायब तहसीलदार (ई-फेरफार) यांनी आपल्या तालुक्यातील सर्व अधिसूचित तलाठी साजा व महसूल मंडळे जिल्ह्याधिकारी यांचे अंतिम अधिसूचने प्रमाणे व सध्या अस्तित्वात असले प्रमाणे तयार करणे अपेक्षित आहे तथापि शासन मंजूर तलाठी साजा पुनर्रचने प्रमाणे काही ठिकाणी नवीन साजे तयार करणेत आले आहेत व काही ठिकाणी तसे झालेले नाही या बाबत शासनाचे सर्व जिल्हाधीकारी यांना उद्देशून लिहिलेले संदर्भीय दि. २६.४.२०१८ चे पत्राचे अवलोकन होण्यास विनंती आहे.



१)      तलाठी साजे व महसूल मंडळे दुरुस्तीची सुविधा -
        या पत्रातील या बाबतचे शासनाचे निर्देश विचारात घेवून उचित कार्यवाही त्याचवेळी होणे अपेक्षित होते मात्र तसे ज्याठिकाणी कार्यवाही झाली नसेल त्यांना त्याप्रमाणे तलाठी साजे व महसूल मंडळे दुरुस्त करणेसाठी सुविधा सर्व नायब तहसिलदार (ई-फेरफार) (पूर्वीचे डी.बी.ए.) यांना उपलब्ध करून दिली आहे. ज्या ठिकाणी नायब तहसीलदार यांनी अशी दुरुस्ती करून ऑनलाईन प्रमाणपत्र यापूर्वीच दिले असेल मात्र अजून त्यात काही सुधारणा करावयाची असेल तर साजे व मंडळ घोषणेसाठी दुबार उपलब्ध करणे ही नवीन सुविधा दिली आहे. या पूर्वी साजे व मंडळे तयार करताना काही नोंदी चुकीच्या झाल्याचे आढळून येत आहे. साझाचे किंवा मंडळाचे नाव हे त्यातील समाविष्ट गावा व्यतिरिक्त इतर नाव देता येत नव्हते वा मंडळाचे नाव बदलता येत नव्हतेतसेच अनावधानाने काही साजे किंवा मंडळे चुकून तयार झाली असतील तर त्यात दुरुस्ती अथवा नष्ट करता येत नव्हती परंतु या सर्व अडचणी दूर करून USER CREATION मधून नायब तहसीलदार यांना  सर्व साजे व मंडळे दुरुस्त करता येतील अशी सुधारणा करणेत आली आहे.
     १.      कोणताही साजा / मंडळ  नष्ट करता येईल.
     २.      कोणत्याची साजाचे / मंडळाचे  नाव बदलता येईल.
     ३.      कोणत्याही साजात / मंडळात  नवीन गाव समाविष्ट करता अथवा वगळता येईल.
     ४.      कोत्याही साजा / मंडळाचे नाव नव्याने दुरुस्त करता येईल. 
          त्याप्रमाणे सर्व नायब तहसीलदार (ई फेरफार) यांना विनंती करणेत येते किआपल्या तालुक्यातील सर्व साजे व मंडळ दुरुस्ती करून ते योग्य असल्याचे  नायब तहसीलदार यांनी प्रमाणपत्र द्यावयाचे आहे हे काम पूर्ण झाल्या शिवाय तालुक्यातील कोणत्याही गावाचे DDM आज्ञावली मध्ये चलन काढता येणार नाही. हे प्रमाणपत्र ऑनलाईन मध्ये देताच DDM  मधे चलन तयार करता ये.

२)      DDM प्रणालीतून चलन तयार करून नक्कल फी VAN खात्यावर जमा करणे.
                 सर्व नायब तहसिलदार (ई-फेरफार) यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या तालुक्यातील साजे व महसूल मंडळे दुरूस्ती चे काम आज पूर्ण करून ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यापूर्वी संदर्भीय शासन पत्राप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सक्षम अधिकारी यांचे लेखी आदेश प्राप्त करून घ्यावेत.  अशी कार्यवाही पूर्ण होताच प्रत्यक्ष पदभार हस्तांतराची कार्यवाही नवीन साजे निहाय पुर्ण करून घ्यावी. (कृपया साजातील गावे फोडून अतिरिक्त पदभार देवू नयेत.) दिनांक १ जून, २०२० पासून DDM प्रणालीत तयार होणारे माहे एप्रिल व मे २०२० चे चलन एकत्रित तयार होईल व ते चलन दुरुस्त साजे प्रमाणे व दिलेल्या पदभाराप्रमाणे तयार होईल त्यामुळे गरज पडल्यास DDM प्रणालीतील महिना निहाय व गावनिहाय नकलांचा गोषवारा पाहून नकला वितरण करणाऱ्या तलाठ्याने नवीन पदभार मिळालेल्या तलाठ्याकडे नक्कल फी ची ५ रुपये प्रमाणे होणारी रक्कम सुपूर्द करावी व चलन तयार करणारे  तलाठी यांनी सदरची रक्कम चलनामध्ये नमूद केलेल्या VAN खात्यावर  बँक ऑफ बडोदा / देना बँक / विजया बँकेच्या शाखेत जावून रोख जमा करावी अथवा VAN खात्यावर ऑनलाईन पद्धतीने तात्काळ जमा करावी.
     
             माहे मार्च २०२० चे चलना प्रमाणे पैसे VAN खात्यावर जमा केले नसल्यास माहे मार्च, एप्रिल व मे २०२० या तीन महिन्यांचे एकाच चलन १ जून नंतर तयार होईल तसेच कोणत्याही महिन्याचे अंशता / अपूर्ण  कालावधीचे चलन तयार होणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  मार्च २०२० नंतर VAN खात्यावर जमा केलेल्या नक्कल फी चे ऑनलाईन ताळमेळ पत्रक तहसिलदार , नायब तहसिलदार यांचेसह सर्व वरिष्ठ अधिकारी यांना त्यांचे लॉगिन ला उपलब्ध होईल त्यामुळे यापुढे नक्कल फी चा ताळमेळ घेण्याचे काम सोपे व अचूक होईल.

३)      फेब्रु,२०२० अखेरच्या नक्कल फी चा ताळमेळ घेणे बाबत –
     प्रत्येक तलाठी यांनी दरमहा भरवयाच्या नक्कल फी चा अहवाल DDM मध्ये व MIS मध्ये दिला आहे त्याप्रमाणे माहे फेब्रु. २०२० अखेरची संपूर्ण नक्कल फी सर्व तलाठी यांनी जमा केली आहे ह्याची खात्री करून त्याचे ताळमेळ पत्र सर्व तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांचे मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे दिनांक १५ जून २०२० पूर्वी पाठवावे ही विनंती .

                सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व तलाठीमंडल अधिकारी व नायब तहसिलदार (ई-फेरफार) यांचे निदर्शनास आणाव्यात. ही विनंती.
                                                             आपला विश्वासू,          
                                     
                                                                                                                                 स्वाक्षरी
                                                                                                                     (रामदास जगताप)
                                                                                          राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
                                जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत, उप विभागीय अधिकारी (सर्व)
प्रत, तहसिलदार (सर्व) यांना महितीसाठी

Comments

Archive

Contact Form

Send