सरकार भूधारणा असलेल्या स.न.साठी उप प्रकार निवडून वर्गवारी करणे
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ रा.स./मा.सु./१४०/२०२०
दिनांक : ०९/०४/२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा
डी.डी.ई.(सर्व)
विषय – सरकार भूधारणा असलेल्या
स.न.साठी उप प्रकार निवडून वर्गवारी करणे.
महोदय,
DILMRP अंतर्गत सुरु असलेल्या ई
फेरफार प्रणाली सरकार भूधारणा असलेल्या स.नं. साठी देखील उप प्रकार असून ते निवडणे
आवश्यक आहे. सरकार भूधारणे मध्ये १. सरकार स्वतः व २. सार्वजनिक सुविधा व मार्गाधीकार असे दोन उप प्रकार प्रणालीत समाविष्ट आहेत. या पैकी एक योग्य उप प्रकार निवडणे आवश्यक आहे.
तलाठी लॉगीन ने कलम १५५ च्या
दुरुस्ती सुविधा मध्ये “ आदेशाने सरकार भूधारणा असलेल्या परंतु निरंक उपभूधारणा असलेल्या सर्व्हे क्रमांकांची दुरुस्ती” हा नवीन पर्याय देण्यात आलेला असून त्यातून तलाठी यांनी सरकार भूधारणा असलेल्या स.नं. साठी १. सरकार स्वतः व २. सार्वजनिक सुविधा व मार्गाधीकार यापैकी योग्य उप प्रकार निवडणे आवश्यक आहे. त्यास तहसीलदार यांनी मान्यता दिल्या नंतरच फेरफार मंजुरी
नंतर हे स.नं. योग्य सरकार भूधारणा असल्याचे समजण्यात येईल. असे झाले तरच असे सर्वे नं. तहसीलदार
यांना आदेश व दस्त ऐवजाचे फेरफार घेण्यासाठी तात्पुरते खुले (UNBLOK) करण्यासाठी
उपलब्ध होतील.
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
Comments