नामंजूर करावयाच्या फेरफारासाठी नवीन सुविधा.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ रा.स./मा.सु./ १३९ /२०२० दिनांक : ०९/०४/२०२०
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा
डी.डी.ई.(सर्व)
विषय – नामंजूर करावयाच्या फेरफारासाठी नवीन सुविधा.
महोदय,
DILMRP अंतर्गत सुरु असलेल्या ई
फेरफार प्रणाली मध्ये मंडळ अधिकारी यांनी फेरफार नामंजूर करताना प्रत्येक स.नं.निवडून
फेरफार नामंजूर करावा लागत होता त्यासाठी फेरफार नामंजूर करावयाची कार्यवाही एकाचवेळी
करण्याची सुविधा देणे बाबत विनंती करण्यात आली होती.
मंडळ अधिकारी लोगिन ने गाव निवडून मुख्य
dashboard वर नामंजूर करावयाचे फेरफार हा पर्याय वापरून एकाचवेळी नामंजूर
करण्यासाठी उपलब्ध फेरफार क्रमांक निवडून नामंजुरी कार्यवाही करता येईल त्यासाठी
पडताळणी सूची मध्ये योग्य तो शेरा नमूद करून फेरफार एकाच वेळी नामंजूर करता येईल.
सदरच्या सर्व सूचना सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायाब तहसीलदार व तहसीलदार
यांचे निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती.
आपला ,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
Comments