ई- फेरफार प्रणालीतील अडचणींची सोडवणूक करण्यासाठी समस्या निराकरण ही नवीन सुविधा वापरणे बाबत मार्गदर्शक सूचना क्र. १४४ दिनांक २४.४.२०२०
महाराष्ट्र
शासन
महसूल
व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य
)
,
पुणे
दूसरा व तिसरा मजला ,
नवीन प्रशासकीय इमारत , विधान भवन समोर ,
कॅम्प ,
पुणे 1
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ मा.सु. १४४ / २०२० दिनांक : २४/०४/२०२०
मार्गदर्शक सूचना क्र. १४४
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.(सर्व).
विषय – ई- फेरफार प्रणालीतील अडचणींची सोडवणूक करण्यासाठी समस्या निराकरण ही नवीन
सुविधा वापरणे बाबत
महोदय,
ई फेरफार प्रणालीत काम करताना सर्व फेरफार
घेण्याचे व निर्गतीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे. ई फेरफार प्रणालीत
घेतेले जाणारे अनोंदणीकृत फेरफार नोंदविण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज खातेदार /
बँका / वित्तीय संस्था व विविध सहकारी सोसायट्या यांना तलाठी यांचेकडे ऑनलाईन दाखल
करता यावेत यासाठी दि.१ ऑगस्ट, २०१९ पासुन शासनाकडून ई हक्क प्रणाली विकसित करून
क्षेत्रीय स्थरावर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. तसेच नोंदणीकृत दस्तांची
माहिती दुय्यम निबंधक यांचेकडून थेट तलाठी यांना ऑनलाईन प्राप्त होत असते त्या
अंतर्गत नोंदणीकृत फेरफार तयार होतात तसेच संगणकीकृत ७/१२ तील विसंगती व त्रुटी
दूर करण्यासाठी कलम १५५ अंतर्गत आदेशाने दुरुस्ती करण्यासाठी देखिल अनेक पर्याय
तलाठी यांना उपलब्ध करून दिले आहेत त्यातील दुरुस्त्यांना तहसीलदार यांनी ऑनलाईन
मान्यता दिल्या नंतर तहसीलदार यांनी “परिशिष्ट क” मधील आदेश स्वाक्षरीत करून
दिलेल्या आदेशाचे अवलोकन करून मंडळ अधिकारी या दुरुस्त्या मंजूर करतात तथापि हे
कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सध्या तालुका हेल्प डेस्क, तालुका
मास्टर ट्रेनर्स, जिल्हा हेल्प डेस्क, जिल्हा मास्टर ट्रेनर्स व राज्यस्थरावरील विभागीय
हेल्प डेस्क यांची मदत घेतली जाते. कोणतीही अडचण सोडविण्यासाठी दूरध्वनी संदेश
व्हाटसप (WHATAS APP) , ई मेल, Any Desk Remote यांची मदत घेतली जाते तसेच राज्य समन्वयक
यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, User Manuals, PPTs यांचाही आधार घेतला
जातो. परंतु तलाठी मंडळ अधिकारी स्थरावर ई फेरफार प्रणालीत रात्र आणि दिवस चालणारे
कामकाज व त्यांची मोठी संख्या तसेच अपूर्ण तांत्रिक मनुष्यबळ ह्याचा विचार करून
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून तलाठी मंडळ अधिकारी यांना समस्या निराकरण
ही ऑनलाईन सुविधा दि. २०.४.२०२० पासून उपलब्ध करून दिली आहे.
समस्या निराकरण ही सुविधा तलाठी व मंडळ
अधिकारी यांना ई फेरफार प्रणालीत उपलब्ध आहे. या सुविधे मध्ये वेळोवेळी जादा
पर्याय उपलब्ध होणार आहेत. जमाबंदी आयुक्त कार्यालयातील हेल्प डेस्क / विभागीय
समन्वयक यांना तलाठी मंडळ अधिकारी यांचे कडून प्राप्त झालेल्या समस्यांची छाननी
केल्यानंतर व Deta Anlysis केले नंतर त्यावर उपाययोजना सुचविल्या जातात किंवा Any
Desk द्वारे रिमोट घेवून अडचणी सोडविल्या जातात. मात्र प्राप्त अडचणी सारख्याच
प्रकारच्या असल्यास त्यावर सर्वसाधारण तांत्रिक सूचना/ उपाय ( Common Technical Solutions)
समस्या निराकरण (Reported Issues Solution) मध्ये देणेत येणार आहेत. ही सुविधा गाव निहाय, फेरफार निहाय व
स.नं. निहाय या तीन पर्यायामध्ये उपलब्ध असेल. या मध्ये आज रोजी खालील सुविधा
उपलब्ध आहेत.
अ. तलाठी लॉगीनच्या सुविधा -
१) नवीन ७/१२ पूर्वतयारी – ई
फेरफार प्रणालीत नवीन ७/१२ तयार करताना त्याच नंबर चा ७/१२ प्रणालीत तयार व चालू असेल तर किंवा फेरफार घेवून बंद केला
असेल तरी त्याच नंबर चा ७/१२ तयार केलाजावू शकत नाही हे आपण सार्वजन जाणता आहात
तथापि काही ७/१२ अर्धवट तयार होवून तसेच प्रणालीत पडलेले असतील तर ते ७/१२ कोठेही
उपलब्ध होत नाहीत अथवा दुरुस्त देखील करता येत नाहीत त्यामुळे त्या नंबरचा नवीन
७/१२ देखील तयार होत नाही त्यावेळी हा पर्याय वापरून तो स.नं. नमूद केला असता असा
अर्धवट तयार झालेला Deta ची Deta Intigrety चेक करून ती माहिती नष्ट केली जाते व
त्याच नंबर चा नवीन ७/१२ तयार करता येतो. या पूर्वी ही सुविधा ODBA Tool मोडूल मध्ये
उपलब्ध होती आता ते मोडूल बंद झाले असल्याने ही समस्या आपल्याला येथून सोडविता
येईल. थोड्यात कोणताही नवीन ७/१२ तयार करताना काही अडचण येत असल्यास हा पर्याय
वापरावा.
२) १५५ त्रुटी –
कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधांचे मध्ये तलाठी यांनी दुरुस्त केलेले
सर्व ७/१२ साठी तहसीलदार यांनी मान्यता दिली नसल्यास अथवा काही ७/१२ वर दुबार
दुरुस्ती करावयाची असल्यास हा पर्याय वारावा त्यानंतर या स.न. वर पुन्हा क. १५५
अन्वये दुरुस्ती करता येईल.
३) नोटीस संबंधी त्रृटी- कोणतीही नोटीस तयार
करताना अथवा अनोंदणीकृत फेरफार घेताना अवतरण चिन्ह (‘ , ) किंवा डबल डयाश
(--) अनुज्ञेय नसल्याने नोटीस तयार करतां येत नसल्यास हा पर्याय वापरून तो फेरफार
क्रमांक नमूद केल्यास त्यातील अवतरण चिन्ह (‘ , ) किंवा डबल डयाश आपोआप निघून जाईल
व तोडीस तयार करता येईल.
४) कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त करणे त्रृटी- कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त करताना काही
अडचण आल्यास हा पर्याय वापरून तो स.न. नमूद केल्यास त्यावर कलम १५५ च्या आदेशाने
फेरफार रजिस्टर दुरुस्त करता येईल.
आ. मंडळ
अधिकारी लॉगीनच्या सुविधा -
१) प्रमाणीकरण डॅशबोर्ड त्रुटी- मंडळ अधिकारी यांना फेरफार प्रमाणित करताना काही फेरफार मंजूर
झाले आहेत तथापि ते डॅशबोर्डवरून निघून जात नाहीत असे दिसून आल्यास हा पर्याय
वापरावा व त्या फेरफार क्रमांकावर मंडळ अधिकारी यांचा शेरा भरलेला नसतो तो भरावा
त्यानंतर असे फेरफार डॅशबोर्ड वरून निघून जातील.
२) कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्त करणे त्रृटी- मंडळ अधिकारी लोगिनला कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर
दुरुस्त करणेचे फेरफार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध होत नसल्यास हा पर्याय वापरावा त्या
नंतर असे फेरफार मंडळ अधिकारी यांना प्रमाणीकरण करण्यासाठी उपलब्ध होतील.
समस्या निराकरण या
पर्यायामध्ये या पुढे देखील नाव नवीन सुविधा ऑनलाइन उपलब्ध होतील.
सोबत या बाबत चे USER
MANUAL जोडले आहे .
सदरच्या सर्व सूचना
सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे निदर्शनास आणून
द्याव्यात ही विनंती.
आपला स्नेहांकित,
XX
स्वाक्षरीत XX
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक ,
ई
फेरफार प्रकल
प्रत
,
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व) यांना महिती साठी व उचित
कार्यवाही साठी.
Sir samasya nirakarn chi suvidha vapartanna error yet ahe.
ReplyDelete