लॉकडाऊन च्या ३२ दिवसाच्या कालावधीतील वर्क फ्रॉम होम च्या कामकाजाचा आढावा
नमस्कार ,
लॉकडाऊन च्या ३२ दिवसाच्या कालावधीतील वर्क फ्रॉम होम च्या कामकाजाचा आढावा
कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे आज ३२ दिवसानंतर कार्यालयात जावून अत्यंत महत्वाच्या आढावा बैठका ( ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे ) व महत्वाच्या प्रस्तावाच्या फाईल निर्गत केल्या . पुणे शहर हद्दीतील कोरोनाची स्थिती अजूनही आटोक्यात येत नसल्याने पुणे येथिल लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविले असल्याने गेले ३२ दिवस वर्क फ्रोम होम सुरु आहे . तथापि दि. १८ एप्रिल च्या शासन आदेशाने १०% कार्यालयीन उपस्थिती पुण्यात पुन्हा ५% करावी लागली असली तरी दररोज जमाबंदी आयुक्त कार्यालयात काही ठराविक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून तातडीचे कामकाज करत आहेत.
तसे पाहता ई महाभूमी चे ई फेरफार , ई पीक पाहणी , ई चावडी , आपला ७/१२ , आपली चावडी , महाभूनकाशा , ई हक्क , बँकिंग चे वेब पोर्टल , ई मोजणी , ई मिळकत पत्रिका या तांत्रिक प्रकल्पांचे सर्व कामकाज वर्क फ्रोम होम ( घरूनच कामकाज ) च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरु आहे . त्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे सर्व तंत्रज्ञ व तांत्रिक मनुष्यबळ , आमचा हेल्प डेस्क व मी स्वता १००% घरून कामकाज करत असून त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स , any desk , ई मेल , whats app , call कॉन्फरन्स सारख्या तंत्रज्ञाचा वापर सर्वांकडून केला जात आहे तरीही काही महत्वाचे प्रस्थाव कार्यालयातील मूळ संचिका / कागदपत्र पाहूनच सादर करावे लागतात त्यासाठी आज ई महाभूमी ची टीम कार्यालयात sanitizer , mask , social distancing या सह सर्व तयारीनिशी हजर होती .
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे सर्व तंत्रज्ञ यांनी लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक टीम च्या कामाचा आढावा मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर केलां व कररार पद्धतीने कार्यरत असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाला वर्क फ्रोम होम साठी काही अडचणी आहेत का ? ह्याचाही आढावा घेनेत आला. पुण्याची सध्याची स्थिती अजून काही दिवसतरी सुधारण्याची चिन्ह दिसून येत नाहीत त्यामुळे सर्व तांत्रिक प्रकल्प लॉकडाऊन च्या काळात सुरळीत सुरु राहण्यासाठी मी देखील राज्य समन्वयक म्हणून रात्रीचा दिवस करून कामकाज करत आहेत व ई फेरफार , ई पीक पाहणी , आपला ७/१२ , आपली चावडी , महाभूनकाशा ,ई हक्क , ई मोजणी , ई मिळकत पत्रिका , बँकिंग पोर्टल , महाभूमी पोर्टल , भूलेख वरील विना स्वाक्षरीत ७/१२ , अभिलेख वितरण प्रणाली , बँक लिंकेज या सर्व टीम चे लॉकडाऊन काळातील कामकाज पाहून मा. जमाबंदी आयुक्त यांनी देखील समाधान व्यक्त केले तसेच या पुढील कालावधीत करावायाचे कामकाजाचे टार्गेट देण्यात आले . लॉकडाऊन च्या कालवधीत देखील काही जिल्हाय्तील तलाठी मदल अधिकारी वेळेत वेळ काढून ई फेरफार मध्ये कामकाज करत आहेत . त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम हेल्प डेस्क व सपोर्ट इंजिनिअर करत आहेत ..
.
ई महाभूमी मुळे मात्र महसूल विभागात ऑनलाईन कामकाजाची एक नवीन संस्कृती रुळत आहे व तीच पुढच्या काळात सर्वांना आत्मसात करावी लागेल तरच सामान्य जनतेला आपण खऱ्या अर्थाने न्याय देवू शकू असे मला वाटते . म्हणून तर या लॉकडाऊन च्या काळात देखील दरोज तीन ते चार हजार डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सामान्य जनता ऑनलाईन उपलब्ध करून घेत आहेत.
कोरोना लॉकडाऊन या कठीण काळात कामगार , मजूर , छोटे व्यावायिक व शहरात अथवा अन्य ठिकाणी अडकून पडलेले आपले बांधव यांना अन्न , पानी , निवारा , औषधे ,वैद्यकीय सुविधा , रेशन कार्डधारकांना धान्य वाटप अशा असंख्य जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखिल आपे मूळ कर्तव्य न
विसरणाऱ्या माझा महसूल योद्ध्यांचे मनपूर्वक अभिनंदन व या उद्धाच्या यशस्वितेसाठी हार्दिक शुहेछ्या .
आपला
रामदास जगताप
दि २४.४.२०२०
Comments