रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेरफार प्रमाणित केल्या नंतर ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत का उपलब्ध होत नाही ? त्यासाठी तलाठी यांनी काय करावे ?



नमस्कार मित्रांनो

आजचा विषय - फेरफार प्रमाणित केल्या नंतर ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत का उपलब्ध होत नाही ? त्यासाठी तलाठी यांनी काय करावे ? 



                   फेरफार प्रमाणित केल्या नंतर ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत का उपलब्ध होत नाही ?   या प्रश्नाचे उत्तर मला काही अनुभवी व जाणकार तलाठी फोन करून विचारतात म्हणून ह्याचा खुलासा करत आहे . 


              आपल्या ई फेरफार प्रणालीत तलाठी फेरफार घेतात व मंडळ अधिकारी मंजूर / नामंजूर करतात व त्याचा ७/१२ वर अंमल देखील मंडळ अधिकारीच देतात म्हणुन  तर फेरफार प्रमाणित केल्या नंतर प्रत्येक ७/१२ पाहून मंडळ अधिकारी यांना फेरफार योग्यरीत्या प्रमाणित झाला  असे नमूद करावे लागते .


           प्रथम   आपल्या ई फेरफार प्रणालीतील डिजिटल स्वाक्षरीत (DSD) चे काम कसे चालते ते समजून घेवू 

१.  सन २०१८ मध्ये एप्रिल महिन्यात आपण प्रथम ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करून pdf करावयाचे काम DSP module द्वारे सुरु केले दिनांक १ मे , २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वितरण  सेवेचा शुभारंभ देखील केला या मध्ये  या वेळी आपण सुमारे ३५ लाख ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत pdf  स्वरूपात तयार केले  होते मात्र त्याची ( प्रत्येक ७/१२ ची ) साईज २०० ते ३०० KB  झाल्याने त्या साठवणे व वितरीत कारणे साठी सिस्टीम वर लोड येवू लागल्याने २८ मे , २०१८ ला आपल्या २९ जिल्ह्यांचे सर्वर बंद पडले.  त्यानंतर १० / १५ दिवसानंतर ते सर्वर  पुन्हा सुरु झाले नंतर मात्र आपण ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत pdf न करता डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी DSP module बंद करून DSD module चा वापर सुरु केला . दरम्यानचे काळात राज्यभरात सुमारे २४ लाख डिजिटल स्वाक्षरीत pdf ७/१२ जनतेने मोफत डाऊनलोड करून वापरले देखील  होते . 

२. SDS मध्ये आपण ७/१२ ची pdf तयार न करता डेटाबेस स्वाक्षरीत करून ठेवतो व डाऊनलोड केल्यानंतर pdf स्वरूपात दाखवतो त्यामुळे त्याची  (डिजिटल ७/१२ ) डेटाबेस साईज १० ते २० KB  असते त्यामुळे सिस्टीम वर जास्त लोड येत नाही. अशा ७/१२ वर QR CODE व १६ अंकी पडताळणी क्रमांक देखील प्रिंट केला जातो. 

३. DSD करताना आपण ७/१२ ची पहिली मूळ प्रत डिजिटल स्वाक्षरीत करताना गाव नमुना ७ व १२ एकत्रित DSD करतो त्यानंतर मात्र फक्त फेरफार मंजूर/ नामंजूर झाले नंतर गाव नमुना ७ डिजिटल स्वाक्षरीत करतो व पीक पाहणी अद्यावत करून त्या ७/१२ वरील पीक पाहणी पूर्ण झाल्याची घोषणा केल्यानंतर असे ७/१२ पीक पाहणी पश्च्यात मध्ये डिजिटल स्वाक्षरी साठी तलाठी यांना उपलब्ध राहतील म्हणजे थोडक्यात कोणत्याही स.नं./ गट नं. चा पहिला ७/१२ तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीचा असेल व त्या नंतर प्रत्येक फेरफार निर्गती नटरा बदल  होणारा गाव  नमुना ७ मंडळ अधिकारी यांचे डिजिटल स्वाक्षरीचा  असेल व गाव नमुना १२ हा तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीचा असेल मात्र गाव नमुना ७/१२ एकत्रितच खातेदार यांना डिजिटल स्वाक्षरीचा उपलब्ध होईल व या वर तो नमुना ७ किंवा १२ कोणी डिजिटल स्वाक्षरीत केला आहे  ?  त्याचे नाव ७/१२ वर प्रिंट केले जात नाही मात्र त्याची नाव निहाय नोंद सिस्टीम मध्ये असते . 
                            प्रथम DSD करताना साधारणता जून २०१९ पर्यंत ठराविक चेक लावूनच ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत केला जात होता मात्र जुलै २०१९ च्या सुरुवाती पासून आपण ODC अहवाल १ ते ४१ पैकी अत्यंत महत्वाचे २६ अहवाल निरंक असतील तरच तो ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करता येईल अशी सोय लागू केली त्यामुळे त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत झालेले ७/१२ अचूक झाले नंतरच DSD करता येतात त्यामुळे काम स्लो झाले असले तरी कामात अचूकता आली आहे .

४. कोणत्याही ७/१२ ची प्रथम नमुना  ७ व नमूना  १२ अशी एकत्र प्रत DSD तलाठ्याने केल्या शिवाय फेरफार निर्गती ( मंजूर / नामंजुरी)  नंतर तो नमुना ७ आपोआप DSD होणार नाही . तसेच जर कोणत्याही ७/१२ वरील फेरफार मंजुरी नंतर तो नमुना ७ डिजिटल स्वाक्षरीत झाला नसेल तर त्यानंतर चा फेरफार मंजूर केला तरी ७/१२ आपोआप डिजिटल स्वाक्षरीत होणार नाहीत. त्यामुळे तलाठी लोगिन ला DSD प्रणालीत तलाठी लोगिन ला फेरफार पश्च्यात डिजिटल स्वाक्षरी साठी शिल्लक ७/१२ DSD करावेत . त्यानंतर ही अडचण येणार नाही . 

५. कोणत्याही ७/१२ वरील प्रथम ७/१२ DSD झाला असेल तर त्यावर फेरफार मंजूर / नामंजूर करताना त्याचा नामुंना ७ आपोआप DSD करण्याची सोय आपण ऑक्टोबर / नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरु केले त्यामुळे त्यापूर्वी निर्गत झालेल्या फेरफारातील ७/१२ DSD साठी फेरफार पश्च्यात मध्ये उपलब्ध होतात . ज्या ७/१२ वर एखादा मंजूर / नामंजूर फेरफार होवून देखील तो  नमुना ७ डिजिटल स्वाक्षरीत केला नसेल तर या ७/१२ वर फेरफार निर्गत केला तरी तो नमुना ७ आपोआप मंडळ अधिकारी लोगिन ने DSD होणार नाही व असा ७/१२ तलाठी लोगिन ने DSD करणे आवश्यक आहे . म्हणून सर्व तलाठी यांनी आपल्या लोगिन ला DSD प्रणालीत फेरफार पश्चात डिजिटल स्वाक्षरीत करणेसाठी उपलब्ध असलेले ७/१२ तात्काळ डिजिटल स्वाक्षरीत करावेत ( ही संख्या राज्यात सुमारे २१ लाख असून त्याचा MIS आता दररोज ग्रुप वर पाठवला जात आहे . 

६. कोणत्याही ७/१२ वर हंगाम निहाय पीक पाहणी अद्यावत केल्या नंतर अशा गटांची यादि निवडून काम संपल्याची घोषणा केल्या नंतर असे सर्व ७/१२ नमुना १२ च्या पीक पाहणी पश्चात DSD साठी तलाठी लोगिन ला DSD प्रणालीत उपलब्ध आहेत असे सर्व ७/१२ DSD केले तरच ते सामान्य जनतेला महाभूमी पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ म्हणून ऑनलाईन उपलब्ध होतील . 


                 आपण या पद्धतीने ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत केले तरच ते सामान्य जनतेला करोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क न येता देखील आपण सामान्य माणसाला न्याय देवू शकतो . 

धन्यवाद 

आपण देखील करोना बाबत काळजी घ्या 
आपण वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम येनिव्हेर चा खरा आनंद घेवू शकतो . 


आपला 

रामदास जगताप 
राज्य समन्वयक 
दिनांक २१ मार्च २०२०  


Comments

Archive

Contact Form

Send