रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सरकार भूधारणा असलेले ७/१२ तहसीलदार लोगिन ला unblock करणेसाठी का दिसत नाहीत ?



नमस्कार मित्रांनो ,


विषय - सरकार भूधारणा असलेले ७/१२ तहसीलदार लोगिन ला unblock करणेसाठी का दिसत नाहीत ?



    आपल्या ई फेरफार प्रणाली मध्ये १. भोगवटादार वर १ , भोगवटादार वर्ग २ , ३. सरकार व ४.  सरकारी पट्टेदार अश्या चार भूधारणा आहेत

त्यापैकी सरकार भूदाराणा असलेल्या जमिनी मुळच्या सरकार च्या असून त्यात दोन उप प्रकार आहेत १. सरकार स्वतः व २.सार्वजनिक मार्गाधीकार व सुविधाधिकार असे दोन उप प्रकार आहेत त्यापैकी एक उप प्रकार नोंदविणे  आवश्यक होता मात्र काही ठिकाणी या पैकी एकाही उप प्रकार निवडला नाही तेथे असे सातबारा तहसीलदार यांना unblock करून देण्यासाठी उपलब्ध होत नाहीत . त्याव्हे दुरुस्ती साठी कलम १५५ अन्वये दुरुस्ती  मध्ये
आदेशाने सरकार भूधारणा असलेल्या परंतु निरंक उपभूधारणा असलेल्या सर्व्हे क्रमांकांची दुरुस्ती”  हा एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे .


या साठी तलाठी यांनी कलम १५५ च्या दुरुस्त्या मधून आदेशाने सरकार भूधारणा असलेल्या परंतु निरंक उपभूधारणा असलेल्या सर्व्हे क्रमांकांची दुरुस्ती”  हा पर्याय निवडून माहिती भरावी व योग्य उप प्रकार निवडावा 

जर जमीन सरकार स्वतः च्या धारणेत असेल तर उप प्रकार निवडावा मात्र जर जमीन सार्वजनिक मार्गाधीकार व सुविधाधिकार  तलाव , तळे , बारव , विहीर , म्हसणवटा , कब्रस्थान , स्मशानभूमी , गाईरान , गुरचरण , कोंडवाडा , खळवाडी , वाट , सडक , परडी जमीन  ) साठी वापरात असेल तर २ उप प्रकार निवडावा .


तलाठी यांनी पाठविलेल्या विनंतीची तहसीलदार यांनी खात्री करून त्यास user creation मध्ये कलाम १५५ चे  फेरफार घेण्याची परवानगी”  मधून मान्यता द्यावी

त्या नंतर तलाठी यांनी अनोंदणीकृत नवीन फेरफार नोंद घेणे” 
मधून नोंद घेवून मंडळ अधिकारी यांनी परिशिष्ट क मधील आदेश पाहून प्रमाणित करावी . त्यानंतर असे सरकार भूधारणा असलेले ७/१२ फक्त  आदेशाने व दस्त ऐवजाने  फेरफार घेण्यासाठी उपलब्ध करून देता येतील .


या साठीचे user manual सोबत पाठवले आहे त्याचे अवलोकन व्हावे .

आपला

रामदास जगताप 
राज्यसमन्वयक 
दिनांक २२.३.२०२० 

Comments

Archive

Contact Form

Send