संगणकीकृत अधिकार अभिलेखांची ऑनलाईन सुविधा बँकांना उपलब्ध करून देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (म.राज्य ) , पुणे
दूसरा व तिसरा मजला , नवीन प्रशासकीय
इमारत , विधान भवन समोर , कॅम्प , पुणे 1
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक : क्र.रा.भू.4/ वेब पोर्टल
/ MOU/ ११ /२०२० दिनांक : १७/०३/२०२०
प्रति,
मा.
निमंत्रक
राज्य स्तरीय
बँकर्स कमिटी,
C/o
बँक ऑफ महाराष्ट्र,
लोकमंगल ,
शिवाजीनगर, पुणे
5
विषय
- संगणकीकृत अधिकार
अभिलेखांची ऑनलाईन सुविधा
बँकांना उपलब्ध करून
देण्याबाबत.
संदर्भ - राज्यस्तरीय बँकर्स
कमिटी सभा क्र. १४६, दि.
२५/२/२०२० मधील मा. मुख्य सचिव
महोदयांच्या सुचना.
महोदय,
राज्यस्तरीय
बँकर्स समितीच्या दि.२५/२/२०२० रोजीच्या बैठक क्र. १४६ ,
मध्ये मा.
मुख्य सचिव महोदयांनी महसूल विभागाने
विकसित केलेली संगणकीकृत अधिकार
अभिलेखांची ऑनलाईन सेवा राज्यातील सर्व बँकांना
उपलब्ध करून देण्याचे
निर्देश दिले असून
येत्या ३१मे,२०२० पर्यंत
सर्व बँकांनी जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांचे
समवेत आवश्यक तो सामंजस करार
करून या सुविधांचा
वापर सुरू करणे
आवश्यक आहे.
त्याची कार्यपद्धती खालील
प्रमाणे असेल.
१. संगणकीकृत अधिकार
अभिलेख ची राज्यातील
सद्यस्थिती -
केंद्र
शासनाच्या डिजीटल इंडिया
लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन
प्रोग्रॅम (DILRMP) अंतर्गत राज्यातील
संगणकीकृत केलेल्या अधिकार
अभिलेखांचे प्रमाणीकर
अंतीम टप्प्यात असून
राज्यातील २.५२ कोटी
गा. न
.नं. ७/१२
पैकी २.४६ कोटी
गा. न
.नं. ७/१२ डिजीटल
स्वाक्षरीत करणेत आले आहेत ते सर्व सार्वजनिक संकेतस्थळावर
(https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/dslr/
) सामान्य जनतेला नक्कल
फी र.रू.
१५/- प्रति ७/१२ ऑनलाईन
भरून डाउॅनलोड करण्यासाठी
उपलब्ध आहेत.
तसेच राज्यातील सर्वच
अधिकर अभिलेख संगणकीकृत
झाले असून विनास्वाक्षरीत गा.न.नं.
७/१२ व ८अ (खातेउतारा)
फक्त पाहण्यासाठी विनामुल्य भूलेख या
संकेतस्थळावर (https://bhulekh.mahabhumi.gov.in ) उपलब्ध आहेत. सदरचे विनास्वाक्षरीत
(View Only water mark असलेले) सातबारा
तलाठी यांनी स्वाक्षरीत केले असले
तरी बँकांनी ते स्विकारू नयेत.
२.
संगणकीकृत अधिकार अभिलेखांची वैधता –
राज्यातील
संगणकीकृत ७/१२ व खाते उतारे यांची अचूकता
साध्य करण्यासाठी
Verification and Validation चे कामकाज अंतिम
टप्प्यात आले असून
९७% पेक्षा जास्त
गा.न.नं.
७/१२ ची अचकूता साध्य
केली असून सदरचा
सर्व सातबारा चा डेटाबेस
डिजीटल स्वाक्षरीत स्वरूपात
सर्व बँकांना ऑनलाईन
वेब सर्व्हिस व्दारे
उपलब्ध करून देणे
प्रस्तावित आहे
. संगणकीकृत अधिकार अभिलेख्यांना कायदेशीर वैधता देण्यासाठी महाराष्ट्र जमीन
महसूल अधिनियम १९६६ व जमीन महसूल नियामामध्ये योग्य त्या सुधारणा करणेत आल्या आहेत.
३.
वेब सर्विस व वेब पोर्टल ची सुविधा –
सदरचे संगणकीकृत अधिकार अभिलेख सर्व बँकांना ऑनलाईन उपलब्ध
करून देण्यासाठी त्या बँकेने सोबतच्या नमुन्यात
जोडलेला नमुना सामंजस्य
करार ( form 1- Draft MOU for web service integration) जमाबंदी आयुक्त
आणि संचालक भूमी
अभिलेख (म.
राज्य) पुणे यांचे
सोबत स्वाक्षरीत करणे
आवश्यक आहे.
याव्दारे करार केलेल्या बँकांना संगणकीकृत गा.न.नं.
७/१२ व गा.न.नं.
८अ
(खाते उतारा)
तसेच सन २०१५-१६ पासून पुढील
च्या ऑनलाईन झालेले फेरफार (गा.न.नं.
६ ) वेब सर्व्हिस
व्दारे उपलब्ध होऊ शकणार आहेत. तथापी सदरचे
सर्व्हर त सर्व्हर
जोडणीचे कामकाज होण्यासाठी
काही कालावधी लागणार
असेल तर बँकांना तात्पुरता स्वरूपात ( तीन महिन्यांसाठी) वेब पोर्टल
व्दारे देखील या सुविधा
User ID व Password
वापरून उपलब्ध
करून घेता येतील. त्यासाठी प्रत्येक
बँकेने वेब पोर्टल
साठीचा नमुना सामुजस्य
करार ( Form 2 - Draft MOU for web portal ) जमाबंदी आयुक्त
आणि संचालक भूमी
अभिलेख (म.राज्य)
पुणे यांचेशी स्वाक्षरीत
केला पाहीजे.
ही सुविधा वापरण्यासाठी
वेब पोर्टलचा प्रत्येक
बँकेसाठी Administrator यांना एक
User ID व एक
Password देण्यात येईल.
पहिल्या लॉगील नंतर
सदरचा पासवर्ड आपल्या
स्तरावर तात्काळ बदलने
आवश्यक असेल.
या पोर्टलमधून सोबतच्या User
Manual प्रमाणे Administrator ला त्यांचे
बँकेसाठी अन्य वापरकर्त्यासाठी
User ID व Password तयार करता
येतील. बँकेच्या
Administrator यांनी तयार केलेल्या
सर्व वापरकर्ते यांनी डाऊनलोड केलेल्या
गा.न.नं.
७/१२, ८अ व फेरफार
ची संख्या व जमा करावयाच्या
नक्कल फी चा अहवाल
(Reports) Administrator यांचे
लॉगीन ला उपलब्ध
होईल.
४.
सामंजस्य कररार करणे
–
सदरचे सामंजस्य करार शासनाचे
सोबत असल्याने केवळ २०० रु. Stamp Paper वापरून करणेत यावेत व या करारनाम्या सोबत
बँकेच्या वतीने १. प्रशासकीय (Administrator) काम पाहणारे एक अधिकारी , २.वित्तीय
बाबींचे ( नक्कल फी जमा करणे ) काम
पाहणारे एक अधिकारी व ३. तांत्रिक काम पाहणारे एक अधिकारी ( Technical head) यांचे
पूर्ण नाव , मोबाईल नंबर , ई मेल आयडी.या कार्यालयाला कळवावेत.
५.
नक्कल फी
ची रक्कम जमा
करणे.
वेब पोर्टलव्दारे
Download केलेल्या अधिकार अभिलेखांच्या
अहवाला प्रमाणे
प्रत्येक अभिलेख १०/- रु. प्रमाणे होणारी
नक्कल फी खालील
खाते नंबरवर
RTGS / NEFT अथवा Net Banking व्दारे भरून
त्याची Slip / Transaction ID पडताळणी साठी
बँकांनी स्वतः जवळ जतन करून ठेवावी व तसा लेखी अहवाल नक्कल शुल्क जमाबंदी आयुक्त
यांचे खात्यावर भरणेसाठी जबाबदार असणाऱ्या बँक अधिकारी यांनी तात्काळ स्वाक्षरीत
करून इकडे पाठवावी. करारनामा करून
देताना वितरीत जबाबदारी विश्चित
करून दिलेल्या अधिकाऱ्याने
डाऊनलोड अभिलेख जमा नक्कल फी चा ताळमेळ
घेऊन दरमहा अहवाल
help.mahabhumi@gov.in या ई
- मेलवर पाठवावा.
Bank Details -
Current Account No.
38306827364
IFSC.Code. No- SBIN0001904
Name - Settlement Commissioner and Director of Land Record ( Maharashtra
State) Pune
Bank – State Bank of India, Treasury
Branch, Pune-1.
वरील प्रमाणे मार्गदर्शक सुचना सर्व बँक प्रतिनिधी यांनी संबंधितांच्या निदर्शनास
आणाव्यात ही विनंती
सोबत.
1)
Form -1 Draft MOU for web services
2)
Form – 2 Draft MOU for web portal
3)
User manual
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे.
प्रत ,
मा. सहकार आयुक्त , महाराष्ट्र
राज्य , पुणे
आपणास
विनंती करणेत येते की सदरच्या सर्व सूचना सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ,
पतसंस्था , ग्रामीण बँका व अन्य वित्तीय संस्थेच्या निदर्शनास आणून देण्यात
याव्यात ही विनंती.
Comments