ई फेरफार साठी ई लर्निंग कोर्स तयार करणे बाबत
प्रारूप आदेश क्र.रा.भू.-४ /रा.स./ मा. सु. क्रं.प्रारूप /२०२०
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक. ७.२.२०२०
प्रति,
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी (सर्व)
विषय – ई फेरफार साठी ई लर्निंग कोर्स तयार करणे बाबत
डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील सर्व अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण झाले असून सन २०१५-१६ पासून ऑनलाईन फेरफार व ऑनलाईन ७/१२ जतन करण्याची कार्यवाही सुरु आहे. राज्यात सुमारे २ कोटी ५२ लक्ष गाव नमुना न. ७/१२ संगणकीकृत केले असून सुमारे ८० लक्ष फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेतले आहेत. या कामासाठी तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी , उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई असे १५००० पेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी काम करत आहेत. या कामकाजामध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी यांना ई फेरफार प्रणाली व अन्य अनुषंगिक प्रणाली चा वापर करावा लागतो त्यासाठी या सर्व कर्मचारी व अधिकारी यांची क्षमाताबांधणी करणेसाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. तथापि सर्वच कर्मचारी व अधिकारी यांना नियमित प्रशिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येवू शकतात ह्याचा विचार करून जमाबंदी आयुक्त कार्यालय यशदा पुणे संस्थेच्या सहकार्याने ई लर्निंग कोर्स तयार करीत आहे . हा ई लर्निंग चा कोर्स तयार करून घेण्यासाठी ई फेरफार प्रणाली मध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश करून एका अभ्यासगटाची निर्मिती करणे आवश्यक आहे त्यासाठी खालील अनुभवी व अभ्यासू क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांची समिती तयार करणेत येत आहे.
अ.न.
|
अधिकारी / कर्मचारी यांचे नाव
|
पदनाम
|
जिल्हा
|
अर्ज
| ||||
१
|
श्री रामदास जगताप
|
उप जिल्हाधिकारी
|
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
|
सातारा
| ||||
२.
|
श्रीमती मोहनमाला नाझीरकर
|
नायब तहसीलदार
|
|
नागपूर
| ||||
३.
|
डॉ. गणेश देसाई
|
अव्वल कारकून
|
विभागीय समन्वयक , औरंगाबाद विभाग
|
जालना
|
४ .
|
श्री शशिकांत सानप
| तलाठी |
रायगड
| ||||
५
|
श्री सचिन जगताप
|
मंडळ अधिकारी
| जळगाव | ||||
६
|
श्री जे डी बंगाळे
|
मंडळ अधिकारी
|
जळगाव
| ||||
७
| श्री. विपिन उगलमुगले |
तलाठी
| कोल्हापूर |
४ .
|
श्री पंडित चव्हाण
| तलाठी |
सांगली
| ||||
५
|
श्री श्याम जोशी
|
मंडळ अधिकारी
| वाशीम | ||||
६
|
श्री हेमंत नायकवडी
|
मंडळ अधिकारी
|
पुणे
| ||||
७
| श्री. अमोल रामशेट्टे |
तलाठी
| लातूर |
४ .
|
श्री. मोहसीन शेख
| मंडळ अधिकारी |
कर्जत
| ||||
५
|
श्री शिवानंद वाकदकर
|
तलाठी
| |||||
६
| श्री कामराज चौधरी |
तलाठी
|
अकोला
| ||||
७
| श्री. रोहित पथक |
तलाठी
| रत्नागिरी |
वरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या ई लर्निंग कोर्स साठी आवश्यात तो अभ्यासक्रम निश्चित करावा. त्याच्या परिणामकारक उपयोगासाठी सर्वसमावेशक सर्व कायदेशीर व तांत्रिक माहिती चा समावेश या कोर्स मध्ये करण्यात यावा व प्रत्येक विषयाचे बहु पर्यायी प्रशसंचिका तयार करावी. या साठी यशदा पुणे या संस्थेच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे आवश्यक ते सहाय्य घ्यावे.
कृपया या कमिटी साठी काम करण्यास तयार आलेल्या कर्मचारी अधिकारी यांनी सहमती दर्शवावी ही विनंती
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
Comments