मंडळ अधिकारी यांनी OCU मधून पीक पाहणीच्या नोंद दुरुस्त करणे बाबत .
मार्गदर्शक
सूचना क्रमांक – १२२
क्र. रा.भू.अ.आ.का./कक्ष४ /रा.स./ मा.सु. /१२२ /२०२०
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख
महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे कार्यालय
दि. १०.१.२०२०
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी. डी. ई सर्व
विषय :- मंडळ अधिकारी
यांनी OCU मधून पीक पाहणीच्या नोंद दुरुस्त करणे बाबत .
महोदय ,
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण (DILRMP ) अंतर्गत
ई -फेरफार प्रकल्प अंमलबजावणीत गाव नमुना नं १२ मध्ये पिकांच्या नोंदी अद्यावत
करणेबाबत OCU (Online Crop Updation module ) चा वापर करणेत येत आहे .पीक
पाहणीच्या नोंदी गाव नमुना १२ मध्ये अचूक
अद्यावत होण्याच्या प्रक्रिये साठी OCU मध्ये काही
मूलभूत बदल करण्यात आले आहेत .
१) गाव नमुना १२ मध्ये
एकदा अंतिम केलेली पिकांची नोंद तलाठी यांना बदलता येणार नाही .
२) OCU मधून
तलाठी यांनी पिकांची नोंद घेऊन काम संपल्याची घोषणा केल्यानंतर तलाठी स्तरावर बदल
करता येणार नाही तर मंडळ अधिकारी लॉगिन ने OCU मध्ये फक्त
एकदा पिकांची नोंद बदलता येईल . त्यासाठी मंडलाधिकारी यांना OCU मध्ये लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले असून कोणत्याही स. नं / गट नं
मध्ये पिकांची नोंद चुकल्याची लेखी विनंती मंडळ अधिकारी यांना
प्राप्त झाल्यास खातेदाराला आगाऊ सूचना देऊन गावातील पंचाचे समक्ष स्थळ पाहणी करून मंडळ अधिकारी यांनी पिकांची नोंद बदलणे साठी आवश्यक असल्याची खात्री केल्यास तसा
पंचनामा करण्यात येईल व त्याप्रमाणे स्थळपाहणीचा दिनांक, पंचांची
नावे , व पिकांची नोंद बदलण्याचे कारण नमूद करून मंडळ
अधिकारी OCU मधून एकदा पिकांची नोंद व क्षेत्र बदलू शकतील
अशी सुविधा OCU मध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात अली
आहे . तथापि मंडळ अधिकारी शेतात पीक उभे असताना अथवा पीक काढणी /कापणी झाल्यानंतर लगेच पाहणी
करून निर्णय घेणे आवश्यक असेल .
३) मंडळ अधिकारी यांनी गाव निहाय व स. नं निहाय बदल केलेल्या पीक पाहणीच्या नोंदीचा एक स्वतंत्र अहवाल नायब
तहसीलदार (ई -फेरफार ) व तहसीलदार यांचे लॉगिन ला उपलब्ध होईल .
सोबत मंडलाधिकारी यांनी पीक पाहणीच्या नोंदी बदलण्याची कार्यपद्धती विषद
करणारे User Mannual सोबत जोडले आहे .
सदरच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात
ही विनंती
आपला
(रामदास जगताप)
राज्य
समन्वयक, ई फेरफार
प्रकल्प
जमाबंदी आयुक्त
कार्यालय , पुणे
प्रत,
उपयुक्त (महसूल) ( सर्व ) यांस माहिती साठी
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व)
Comments