ई-फेरफार प्रणाली मध्ये १००% हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन झाले असल्याची खात्री करणेबाबत.
मार्गदर्शक सूचना क्रमांक – १२१
क्र.
रा.भू.अ.आ.का./कक्ष४ /रा.स./ मा.सु. /१२१/२०२०
जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अभिलेख
महाराष्ट्र
राज्य , पुणे यांचे कार्यालय
दि.
१०.१.२०२०
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी. डी. ई सर्व
विषय :- ई-फेरफार प्रणाली मध्ये
१००% हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन झाले असल्याची
खात्री करणेबाबत.
महोदय ,
डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा
अंतर्गत ई -फेरफार
प्रणालीमध्ये २०१५-२०१६ पासून ऑनलाईन ७/१२ व ऑनलाईन फेरफार ठेवण्याची कार्यवाही
सुरु केली आहे . आज अखेर आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १००% हस्तलिखित ७/१२
ऑनलाईन होणे अपेक्षित आहे तथापि काही ठिकाणी मूळ हस्तलिखित ७/१२ व पुस्तके दिवाणी
अथवा फौजदारी न्यायालयाचा CID ,CBI ACB च्या
ताब्यात असल्यामुळे अथवा अन्य
कारणामुळे
संपूर्ण गाव नं ७/१२ ऑनलाईन झाले असल्यास खालील नमुन्यात अहवाल दि ३१/०१/२०२०
पूर्वी या कार्यालयाकडे सादर करावा व ते सर्व ७/१२ ऑनलाईन / संगणकीकृत करण्यासाठी
आपले स्तरावर यथोचित कार्यवाही करावी .
ई -फेरफार
प्रणालीत संगणकीकृत न झालेल्या गा.न.नं ७/१२ ची माहिती
अ.नं
|
जिल्हा
|
तालुका
|
गाव
|
संगणीकृत न
झालेले 7/12 चे
गट
न./ स.नं.
|
अश्या 7/12 ची एकूण संख्या
|
संगणीकृत न होण्याची
कारणे
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
७
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सदरची
माहिती पाठवण्यापूर्वी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः सर्व वस्तुस्तिथी
ची खात्री करावी व वरील नमुन्यातील माहिती दि
३१/०१/२०२० पूर्वी उप जिल्हाधिकारी / डी.डी.ई. मार्फत
इकडे पाठवावी. हि विनंती.
आपला
(रामदास
जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी
आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत,
उपयुक्त (महसूल) ( सर्व )
यांस माहिती साठी
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व)
Comments