ई फेरफार प्रणालीमधील ऑनलाईन फेरफाराची कार्यपद्धती-खरेदी फेरफार
ई फेरफार प्रणालीमधील ऑनलाईन
फेरफाराची
कार्यपद्धती-खरेदी फेरफार
- · सद्यस्थितीत राज्यात डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम (DILRMP) अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी सन 2015 पासून सुरु करण्यात आली असून, सदर आज्ञावलीमध्ये फेरफार प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. सदरची आज्ञावलीचे नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या i-SARITA आज्ञावलीसोबत जोडणी (Linkage) करण्यात आले आहे.
- · ऑनलाईन दस्त नोंदणीची साठी-गाव नमुना न. ७ वर भोगवटादार सदरी दस्त करून देणाऱ्याची नावे असेल त्यांनाच दस्त नोंदणी करता येईल .
- · ऑनलाईन दस्त नोंदणी करताना दस्त करून देणार व घेणार यांचे पूर्ण पत्ते व मोबाईल नंबर आय सरिता प्रणाली मध्ये नमूद केल्यास दस्त नोंदणी पूर्ण होताच अश्या दस्ताला ई फेरफार प्रणाली मध्ये देण्यात आलेला फेरफार नंबर पक्षकाराचे मोबाईल नंबर वर मेसेज दिला जातो .
- पक्षकार यांना येणारा मेसेज -
- आपण् नोंदविलेल्या दस्त क्र. ----- च्या अनुष्ंगाने फेरफार क्र. ------ ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी संबंधित तलाठी किंवा नगर भूमापन कार्यालय यांचे कडे वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.
- सावळदबारा, GAT NUMBER : 120 ; , क्षेत्र 0.0100 (Hectare Aar) संबंधी अभिहस्तांतरणपत्र दु. नि. ------ यांचे कार्यालयात दि. 06/07/2019 रोजी दस्त क्र. 1242 वर नोंदले आहे.
- · दस्त नोंदणी साठी महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या ( शासनाच्या ) अधिकृत संकेतस्थळावरून (सशुल्क) उपलब्ध होणारे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ अथवा तलाठी स्वाक्षरीने मिळणारे संगणकीकृत ७/१२ ग्राह्य धरले जातात . अशा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर प्रत्येक पानावर खाली डाव्या कोपऱ्यात QR code छापेलेला असतो तसेच प्रत्येक पानावर “ हा ७/१२ अभिलेख (दि ------- रोजी --- वाजता ) डिजिटल स्वाक्षरीत केला असलेने त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही” असे स्पष्ट सूचना दिलेली आहे . डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ च्या प्रत्येक पानावर १६ अंकी पडताळणी क्रमांक ( Verification ID) दिलेला आहे तो क्रमांक वापरून आपल्याला अशा ७/१२ ची सत्यता hhtps://aapleabhilekh.mahabhumi.gov.i/dslr या संकेतस्थळावरून Verify 7/12 हा पर्याय वापरून पडताळणी करता येते.
- · दस्तनोंदणी करताना जमीन प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्याचा मेसेज आल्यास गरजेप्रमाणे परवानगी आदेशाची प्रत तहसिलदार यांना दाखवुन 7/12 दस्तनोंदणीसाठी तात्पुरता खुला (Unblock) करुन घेणे बाबत पक्षकारांना मार्गदर्शन केले जाते . असा तात्पुरता खुला केलेला ७/१२ फक्त एका दस्त नोंदणीसाठी खुला राहतो .
- · दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी विभागाच्या i-SARITA आज्ञावलीकडुन दस्त नोंदणी झाल्यावर नोंदणीकृत दस्ताचा डाटा ( सूची 2 ) ई-फेरफार आज्ञावलीत तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होते
- .
- · तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या माहीतीच्या (हक्क संपादनाचे प्रतिवृत्त) अनुषंगाने संबंधित कार्यक्षेत्रातील तलाठी यांनी तात्काळ फेरफार प्रक्रीया सुरू करावी लागते.
- · ऑनलाईन दस्त नोंदणी झालेल्या व्यक्तींना फेरफार घेण्यासाठी वेगळा अर्ज पुन्हा तलाठ्याकडे करावा लागत नाही . दस्त नोंदणी पूर्ण होताच दस्त नोंदणी ची सूची २ व दस्ताचे स्कॅन प्रत तलाठी लोगीन ला ई फेरफार प्रणाली मध्ये ऑनलाईन दिसते व तात्काळ फेरफार घेण्याची प्रक्रिया तलाठी स्तरावर सुरु केली जाते.
- · ई फेरफार प्रणाली मध्ये तलाठी स्थरावर सुरु केलेल्या फेरफाराची मंजुरी पर्यंत ची स्थिती तलाठी कार्यालयाच्या (चावडी ) डिजिटल नोटीस बोर्डावर म्हणजेच आपली चावडी ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi या संकेतस्थळावर स्थळावर जगात कोठून देखील कोणालाही पाहते येते .
- · तलाठी लोगिन ला ऑनलाईन प्राप्त झालेला दस्ताची फेरफार घेणेबाबतची कारवाई संबंधित तलाठी ई-फेरफार च्या नोंदणीकृत फेरफार या पर्यायातून घेईल तेथे संबंधित दस्ताला SRO लोगिन ला देनेत आलेला फेरफार क्रमांकच तलाठी लोगिन ला मिळतो . तदनंतर सदर फेरफाराची नोटिस तयार करून संबंधित हितसंबंधितांना नमूना ९ ची नोटिस बजावण्यात येईल आणि १५ दिवसात हरकत प्राप्त न झाल्यास तसा हरकतीचा शेरा नमूद करून फेरफार मंडल अधिकारी यांना प्रमाणित करणेसाठी उपलब्ध होईल. मंडळ अधिकारी आवश्यक असल्यास जास्त कागदपत्रे मागविल तसेच सर्व कायदेशीर पूर्तता झाली असल्याची खात्री करून फेरफार मंजूर करील.
- · ई फेरफार प्रणाली मध्ये मंडळ अधिकारी यांनी मंजूर केलेल्या फेरफाराचा ७/१२ वर तात्काळ अंमल होवून अद्ययावत विनास्वाक्षारीत ७/१२ त्याच क्षणाला महाभूमी च्या संकेस्थळावर ( https://bhulekh.mahabhumi.gov.in/ ) कोणालाही कोठूनही पहाता येतो .
- · ई फेरफार प्रणालीमध्ये मंडल अधिकारी यांनी फेरफार मंजूर करताच आपोआप डिजिटल स्वाक्षरीत झालेले ७/१२ तात्काळ खातेदाराला जगभरातून कोठून देखील महाभूमी प्रकल्प संस्थेच्या संकेत स्थळावर ( https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in//DSLR) उपलब्ध होईल.
-----------------------------------------०X०---------------------------------------
Comments