ई पीक पाहणी मोबाइल आप वरील खरिप हंगाम २०१९ चे कामकाज पूर्ण करणे बाबत .
मार्गदर्शक
सूचना क्रमांक – १२३
क्र. रा.भू.अ.आ.का./कक्ष४ /रा.स./ मा.सु. /१२३ /२०२०
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख
महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे कार्यालय
दि. १०.१.२०२०
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई ,
पुणे , नाशिक , पालघर , औरंगाबाद ,
अमरावती व नागपूर
विषय :- ई पीक पाहणी
मोबाइल ॲप वरील खरिप हंगाम २०१९ चे कामकाज पूर्ण करणे बाबत .
महोदय ,
डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण (DILRMP ) अंतर्गत
ई -फेरफार प्रकल्प अंमलबजावणीत गाव नमुना नं १२ मध्ये पिकांच्या नोंदी अद्यावत
करणेबाबत OCU (Online Crop Updation module ) चा वापर करणेत येत आहे.पीक
पाहणीच्या नोंदी गाव नमुना १२ मध्ये अचूक
अद्यावत होण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी विकसित
केलेल्या ई पीक पाहणी या मोबाईल ॲप चा पथदर्शी प्रकल्प आपल्या जिल्ह्यातील एका
तालुक्यात फेब्रु २०१९ पासून सुरु आहे तथापि त्याचे १०० % अंमलबजावणीसाठी अनेक
वेळा पाठपुरावा केला असून दि. २२.११.२०१९ रोजी संबंधित तहसीलदार व तालुका कृषी
अधिकारी यांची आढावा बैठक देखील जमाबंदी आयुक्त कार्यालयात घेण्यात आली होती. त्या
बैठकीत दिलेल्या सुचना प्रमाणे माहे डिसेंबर २०१९ अखेर पूर्वी खेप हंगामाची पीक
पाहणी पूर्ण करून त्यास तलाठी स्थरावर मान्यता देवून सर्व कामकाज पूर्ण करणेच्या
सूचना दिल्या होत्या तथापि अद्याप देखील आपल्या जिल्ह्यातील निवडलेल्या तालुक्यात
खालील प्रमाणे सद्यस्थिती आहे हे निश्चितच असमाधानकारक आहे.
हंगाम-: खरीप
|
पीक पाहणी २०१९
|
||||
अनु.क्र.
|
District (Taluka)
|
शेतकऱ्यांनी Mobile
App द्वारे माहिती पाठवली (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी
import केलेले (सर्व्हे
निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count) टक्केवारी
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
1
|
पुणे(बारामती)
|
2710
|
2462
|
2074
|
76.53
|
2
|
नाशिक(दिडोरी)
|
3343
|
1509
|
928
|
27.76
|
3
|
पालघर(वाडा)
|
692
|
395
|
127
|
18.35
|
4
|
औरंगाबाद(फुलंब्री)
|
6949
|
4511
|
2449
|
35.24
|
5
|
अमरावती(अचलपूर)
|
131
|
29
|
25
|
19.08
|
6
|
नागपूर(कामठी)
|
252
|
0
|
0
|
0
|
हंगाम-: रब्बी
|
पीक पाहणी २०१९
|
||||
अनु.क्र.
|
District (Taluka)
|
शेतकऱ्यांनी Mobile
App द्वारे माहिती पाठवली (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी
import केलेले (सर्व्हे
निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count) टक्केवारी
|
(3-4)
|
|||||
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
1
|
पुणे(बारामती)
|
686
|
386
|
193
|
28.13
|
2
|
नाशिक(दिडोरी)
|
358
|
73
|
15
|
4.19
|
3
|
पालघर(वाडा)
|
52
|
0
|
0
|
0
|
4
|
औरंगाबाद(फुलंब्री)
|
61
|
0
|
0
|
0
|
5
|
अमरावती(अचलपूर)
|
136
|
0
|
0
|
0
|
6
|
नागपूर(कामठी)
|
6
|
0
|
0
|
0
|
हंगाम-: संपूर्ण
वर्ष
|
पीक पाहणी २०१९
|
||||
अनु.क्र.
|
District (Taluka)
|
शेतकऱ्यांनी Mobile
App द्वारे माहिती पाठवली (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी
import केलेले (सर्व्हे
निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count)
|
तलाठी यांनी मंजूर केलेले (सर्व्हे निहाय count) टक्केवारी
|
(3-4)
|
|||||
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
1
|
पुणे(बारामती)
|
2097
|
784
|
525
|
25.04
|
2
|
नाशिक(दिडोरी)
|
2205
|
1007
|
645
|
29.25
|
3
|
पालघर(वाडा)
|
40
|
11
|
6
|
15
|
4
|
औरंगाबाद(फुलंब्री)
|
118
|
33
|
18
|
15.25
|
5
|
अमरावती(अचलपूर)
|
85
|
0
|
0
|
0
|
6
|
नागपूर(कामठी)
|
25
|
0
|
0
|
0
|
खरीप
हंगामाचे पुर्णत्वा बरोबरच रब्बी हंगामाची पीक पाहणी देखील सुरु झाली असून आपल्या
तालुक्यातील १० निवडक गावातील १०० % खादेरांची व १००% पिकांची नोंदणी ई पीक पाहणी मोबाईल आप मध्ये
करण्याचे उद्दिष्ट निश्चित करणेत आले होते तथापि त्यात देखील फारशी प्रगती झाल्याचे
दिसत नाही. ई पीक पाहणी च्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात सामान्य जनता व शेतकरी
यांना सकारात्माक प्रतिसाद प्राप्त करून घेण्यासाठी सर्वच महसूल व कृषी
अधिकाऱ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनाचा वापर करावा लागेल तरच हा प्रकल्प यशस्वी
होईल असे वाटते. आपण केलेल्या व करत असलेल्या प्रयत्नाचा अहवाल तसेच सक्सेस
स्टोरीज अन्य तालुक्यात देखील फायदेशीर ठरू शकतात म्हणून आपल्याला विनंती आहे कि
निवडक १० गावातील १००% रब्बी पिकांच्या नोंदी ई पीक पाहणी मध्ये घेण्यासाठी आपण
विशेष प्रयत्न करावेत व त्याचा एकत्रित अहवाल इकडे पाठवावा.
या शिवाय नियमित OCU मध्ये देखील केलेले बदल
सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणावेत.
१) गाव नमुना १२ मध्ये
एकदा अंतिम केलेली पिकांची नोंद तलाठी यांना बदलता येणार नाही .
२) OCU मधून
तलाठी यांनी पिकांची नोंद घेऊन काम संपल्याची घोषणा केल्यानंतर तलाठी स्तरावर बदल
करता येणार नाही तर मंडळ अधिकारी लॉगिन ने OCU मध्ये फक्त एकदा
पिकांची नोंद बदलता येईल . त्यासाठी मंडलाधिकारी यांना OCU मध्ये
लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले असून कोणत्याही स. नं / गट नं मध्ये पिकांची नोंद चुकल्याची लेखी विनंती मंडळ अधिकारी यांना प्राप्त
झाल्यास खातेदाराला आगाऊ सूचना देऊन गावातील पंचाचे समक्ष स्थळ पाहणी करून मंडळ अधिकारी यांनी पिकांची नोंद बदलणे साठी आवश्यक असल्याची खात्री केल्यास तसा
पंचनामा करण्यात येईल व त्याप्रमाणे स्थळपाहणीचा दिनांक, पंचांची
नावे , व पिकांची नोंद बदलण्याचे कारण नमूद करून मंडळ अधिकारी
OCU मधून एकदा पिकांची नोंद व क्षेत्र बदलू शकतील अशी सुविधा
OCU मध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात अली आहे . तथापि
मंडळ अधिकारी शेतात पीक उभे असताना अथवा पीक
काढणी /कापणी झाल्यानंतर लगेच पाहणी करून निर्णय घेणे आवश्यक असेल .
३) मंडळ अधिकारी यांनी गाव निहाय व स. नं निहाय बदल केलेल्या पीक पाहणीच्या नोंदीचा एक स्वतंत्र अहवाल नायब
तहसीलदार (ई -फेरफार ) व तहसीलदार यांचे लॉगिन ला उपलब्ध होईल .
४)
पीक पाहणी च्या नोंदी अद्यावत केल्यानंतर तलाठी यांनी पीक पाहणी पूर्ण झाल्याची
घोषणा करून असे सर्व नमुना १२ DSD च्या पीक पाहणी पश्च्यात पर्यायातून नमुना १२
डिजिटल स्वाक्षरीत करणेत यावेत त्यानंतरच असे ७/१२ अद्यावत पीक पाहणी सह खातेदारांना
ऑनलाईन उपलब्ध होतील.
सदरच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात
ही विनंती
आपला
(रामदास जगताप)
राज्य
समन्वयक, ई फेरफार
प्रकल्प
जमाबंदी आयुक्त
कार्यालय , पुणे
प्रत,
उपयुक्त (महसूल) ( सर्व ) यांस माहिती साठी
उप
विभागीय अधिकारी बारामती, वाडा, फुलंब्री, दिंडोरी, अचलपूर व कामठी.
तहसीलदार,
बारामती, वाडा, फुलंब्री, दिंडोरी, अचलपूर व कामठी.
Comments