रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मोठ्या क्षेत्राचे ७/१२ – अहवाल ३१ दुरुस्त करणे बाबत


मार्गदर्शक सुचना क्रं.१२९                                           क्र.रा.भू.- /रा.स./ मा. सु. क्रं.१२९/२०२०
                                                                                      जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
                                                                                      अभिलेख  (.राज्यपुणे यांचे कार्यालय,
                                                                                    पुणेदिनांक - २१.०१.२०२०
प्रति
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
       उपजिल्हाधिकारी    (सर्व)


            विषय   मोठ्या क्षेत्राचे ७/१२ – अहवाल ३१ दुरुस्त करणे बाबत

                            -महाभूमी तथा  डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीतून अचूक   ७/१२ व खाते उतारा मिळण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ मधील ७/१२ मध्ये विसंगती निर्माण करणारे अहवाल निरंक करणे आवश्यक आहे त्या पैकी ODC अहवाल ३१  हा एक प्रमुख अहवाल आहे.

                       अहवाल 31 मध्ये असलेल्या सर्व मोठ्या क्षेत्राचे 7/12 ची यादी सोबत जोडली आहे त्याचे अवलोकन करता त्यामध्ये काही 7/12 खूपच मोठ्या क्षेत्राचे (अवास्तव) तयार झाले आहेत. सदारचे 7/12 प्रथम दुरुस्त करणे आवश्यक आहे ह्याचा आढावा उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी स्वतः घ्यावा.    कित्तेक 7/12 तर लाखो हेक्टर क्षेत्राचे आहेत व ह्याची यादी सर्व उप  जिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट यांना नोव्हेंबर 2018 मध्येच उपलब्ध करून दिली होती . त्याचा आढावा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून सुरू आहे तरीही त्यातील शिल्लक 7/12 ची संख्या दोन लाखापेक्षा जास्त आहे ह्याचा अर्थ या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही हेच स्पष्ट होते. अश्या वाढीव क्षेत्राचे 7/12 चे आधारे क्षेत्र हस्तांतरित झाल्यास होणार्‍या परिणामांना सर्व संबंधित जबाबदार राहतील ह्याची नोंद घ्यावी . अवास्तव क्षेत्राचे चे आवलोकण होवून उचित कार्यवाही तात्काळ  करावी .                                   
            अहवाल ३१ मध्ये मोठ्या क्षेत्राचे ७/१२ स.न. दर्शविले जातात जे शेतीचे ७/१२ मध्ये क्षेत्र २० हे.आर. पेक्षा जास्त आहे किंवा ज्या बिनशेती चे ७/१२ मधील क्षेत्र ९९ आर. पेक्षा जास्त नमून आहे असे ७/१२ दर्शविले जातात. असे अहवाल ३१ मध्ये समाविष्ट असेलेले ७/१२ चे एकक व क्षेत्राबाबत हस्तलिखित ७/१२ वरून खात्री करून त्यापैकी काही ७/१२ चे क्षेत्र व एकक योग्य असल्यास  असे ७/१२ य तलाठी यांनी तहसीलदार यांना  एकदा मान्यता देण्याबाबत ऑनलाईन विनंती करावी. अशी ऑनलाईन विनंती पाहून तहसीलदार यांनी  user creation मधून एकदा मान्यता दिल्यास असे सातबारा कितीही मोठ्या क्षेत्राचे असलेतरी ते योग्य समजून अहवाल ३१ मधून कायमस्वरूपी निघून जातील. तथापी जर या ७/१२ वरिल क्षेत्र व एकक अथवा फक्त क्षेत्र किंवा एकक चुकीचे असल्यास कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती सुविधा पैकी क्षेत्र दुरुस्ती या पर्यायातून तलाठी यांनी ऑनलाईन विनंती करावी त्यानंतर तहसीलदार यांनी user creation मधून मान्यता दिल्यास तलाठी यांना दुरस्ती करून परिशिष्ट क तयार करता येईल व असे परिशिष्ट क तहसीलदार यांनी स्वाक्षरीत करून दिल्यास ते पाहून मंडळ अधिकारी फेरफार मंजूर करून ७/१२ दुरुस्त करतील त्यानंतरच असे ७१२ या अहवाल ३१ मधून कमी होतील . अशा पद्धतीने मोठ्या क्षेत्राचे दुरुस्त होई पर्यंत अशा स.न. वर प्रत्येक फेरफार घेण्यासाठी असे स.न.  तात्पुरते खुले (unblock) करुन घ्यावे लागतील ह्याची नोंद घ्यावी .


शेती  ७/१२ - २० हेक्टर पेक्ष्या मोठे असलेले सर्व्हे क्रमांक व 
बिनशेती ७/१२ ९९ आर पेक्ष्या मोठे असलेले सर्व्हे क्रमांक (अहवाल-31)
Date 24.01.2020
विभाग 
जिल्हा
एकूण सर्व्हे क्रमांक
एकूण विसंगती  सर्व्हे  क्रमांक
%
 पुणे
 पुणे
1489033
18322
1.23
 सोलापूर
1183365
42778
3.61
 सातारा
1431247
17395
1.22
 कोल्हापूर
1076024
4253
0.40
 सांगली
841655

0.00
 पुणे
6021324
82748
1.37
 नागपूर
 नागपूर
805131
620
0.08
 भंडारा
575038
5172
0.90
 गोंदिया
578554
3768
0.65
 गडचिरोली
348430
4788
1.37
 चंद्रपूर
692292
7721
1.12
 वर्धा
484019
3274
0.68
 नागपूर
3483464
25343
0.73
 नाशिक
 नाशिक
1244221
5954
0.48
 नंदुरबार
390351
1485
0.38
 धुळे
593980
12178
2.05
 अहमदनगर
1273104
14488
1.14
 जळगाव
1201157
3109
0.26
 नाशिक
4702813
37214
0.79
 औरंगाबाद
 औरंगाबाद
294295
2014
0.68
 नांदेड
458622
1480
0.32
 हिंगोली
180858
730
0.40
 परभणी
221944
398
0.18
 जालना
243817
949
0.39
 बीड
454791
1250
0.27
 लातूर
281558
349
0.12
 उस्मानाबाद
291966
892
0.31
 औरंगाबाद
2427851
8062
0.33
 कोकण (मुंबई)
 ठाणे
644092
3984
0.62
 मंबई उपनगर
47989
162
0.34
 रायगड
1150570
4528
0.39
 रत्नागिरी
2089263
862
0.04
सिंधुदुर्ग
1625882
1951
0.12
 पालघर
495311
3540
0.71
कोकण (मुंबई)
6053107
15027
0.25
 अमरावती
 अमरावती
708443
22367
3.16
 यवतमाळ
646900
7183
1.11
 बुलडाणा
564313
3769
0.67
 अकोला
359671
1562
0.43
 वाशिम
258359
1679
0.65
 अमरावती
2537686
36560
1.44
एकूण
25226245
204954
0.81

                                 वरील प्रमाणे एकूण  40645 मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ( अहवाल ३१) ची गाव निहाय जिल्हा निहाय यादी सोबत जोडली आहे त्यात ज्या स.न. चे क्षेत्र २० हे.( शेती )  किंवा ९९ आर. (बिनशेती) पेक्षा जास्त आहे असे ७/१२ दिले आहेत ते सर्व ७/१२ प्रत्यक्ष हस्तलिखित ७/१२ वरून तपासून कायम/ मान्य  करावेत अथवा दुरुस्त करावेत. हे सर्व ७/१२  दुरुस्त करणेत आले असल्याची खात्री तहसिलदार व उप विभागीय अधिकारी यांनी करावी.
सोबत एका शीट मध्ये  जिल्हा निहाय व गाव निहाय मोठ्या क्षेत्राचे  स.न. ची यादी जोडली आहे व एका शिट मध्ये मोठ्या क्षेत्राचे 7/12 उतरत्या क्रमाने लावून दिले आहेत . आपले जिल्ह्याचे हेल्प डेस्क यापल्याला आपल्या जिल्ह्याची यादी पाठवतील.
             
                   सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
                                                                           

                                                                                               (रामदास जगताप)
                                                               राज्य समन्वयकई फेरफार प्रकल्प  
                                                                 जमाबंदी आयुक्त कार्यालयपुणे

प्रतमा.उपआयुक्त (महसूल) (सर्वयांना माहितीसाठी सादर.
प्रत - अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रतउपविभागीय अधिकारी-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रततहसिलदार-(सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

प्रत - उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्वयांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.

Comments

Archive

Contact Form

Send