दिनांक २३.१.२०२० पासून ई फेरफार प्रणाली मध्ये दिलेल्या नवीन सुविधा / सुधारणा
दिनांक २३.१.२०२० पासून ई फेरफार प्रणाली मध्ये दिलेल्या नवीन सुविधा / सुधारणा
१. कलम १५५ च्या आदेशाने इतर हक्कातील प्रकार व उप प्रकार बदलणे आणि कलम १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती मध्ये एक फेरफार घेतल्यानंतर तहसीलदार यांची मान्यता होवून तो फेरफार प्रमाणित होई पर्यात त्याच गटावर अन्य दुरुस्ती करता येणार नाही .
२. फेज २ पूर्ण झालेल्या गावाचे वाडी विभाजन झालेल्या गावात पीक पाहणी न दिसण्याची अडचण दूर करणेत आली आहे
३. आदेशे नावात दुरुस्ती या फेरफार प्रकारामध्ये वैयक्तिक खातेदारांचे नावाशिवाय कंपनी कारखाना , संस्था यांची नावांमध्ये देखील नावे समाविष्ट करता येतील .
४. सर्वे क्रमांक बदलणे या फेरफार चे नाव बदलून आता आदेशाने सर्वे क्रमांक बदलणे असे केले आहे . व त्यासाठी नोटीस कालावधी शून्य करणेत आला आहे .
५. आदला बदली या फेरफार चे नाव बदलून आता खातेदारांची आदला बदली असे केले आहे व ते नोंदणीकृत दस्ता ने होईल .
६. कोणती फेरफार प्रमाणित केल्या नंतर मंडळ अधिकारी यांनी फेरफार योग्यरीत्या प्रमाणित झाला आहे हा शेरा भरताना संबंधित ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत ( DSD ) करणे आवश्यक आहे. जो पर्यंत ७/१२ DSD होत नाही तो पर्यंत तो तेथून निघून जाणार नाही .
७. बिनशेती (NA) या फेरफार प्रकारामध्ये कृषिक क्षेत्राचे अकृषिक क्षेतात रुपांतर करताना येणारी अडचण दूर केली आहे.
८.घोषणापत्र ३ झलेल्या तालुक्यात सामान्य फेरफार किंवा कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्ती फेरफारा साठी एडीट री एडीट व odu मध्ये काम प्रलंबित असल्याचा मेसेज येणार नाही.
सदरच्या सुविधा https://mahaferfarnas.
या टेस्ट लिंकवर वापरून feedback द्यावा
आपला
रामदास जगताप
दि..२३.१.२०२०
सरजी महाभूअभिलेख व इतर कोठूनही काढलेल्या 7/12 वर तलाठी यांनी स्वाक्षरी करू ,या बाबत असलेले पत्र कृपया शेअर करावे
ReplyDeleteD S kale मंडळ अधिकारी जिल्हा अकोला 9604919886