ई-फेरफार प्रणाली मध्ये तालुक्यातील सर्व गावे व सर्व ७/१२ ऑनलाईन झाले असल्याची खात्री करणेबाबत.
मार्गदर्शक सूचना क्रमांक – १२६
क्र. रा.भू.अ.आ.का./कक्ष४ /रा.स./ मा.सु. /१२६/२०२०
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख
महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे कार्यालय
दि. २०.१.२०२०
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी. डी. ई. (सर्व)
विषय :- ई-फेरफार प्रणाली मध्ये तालुक्यातील सर्व गावे व सर्व ७/१२ ऑनलाईन झाले असल्याची खात्री करणेबाबत.
महोदय ,
डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत ई -फेरफार प्रणालीमध्ये २०१५-२०१६ पासून ऑनलाईन ७/१२ व ऑनलाईन फेरफार ठेवण्याची कार्यवाही सुरु केली आहे . आज अखेर आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १००% हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन होणे अपेक्षित आहे तथापि काही तालुक्यातील काही गावे अद्याप ऑनलाईन झाले नाहीत असे दिसून येते. तसेच काही गावातील १००% हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन झालेअसल्याची खात्री सर्व तहसीलदार यांनी करावी तसेच आर्व महसुली गावे दुय्यम निबंधक यांचे आय सरिता प्रणाली मध्ये उपलब्ध असल्याची खाती करणे . सर्व महसूल गावांची यादी उप धीक्षक भूमी अभिलेख यांचे कडू घेण्यात यावी व यानंतर ही सर गावे ई फेरफार प्रणालीसाठी ऑनलाईन झाली असल्याची व आय सरिता प्रणाली मध्ये उपलब्ध असल्याची खाती करण्यासाठी उप विभागीय अधिकारी यांनी समन्वय बैठक घेवून एकत्रित अहवाल खालील नमुन्यात ३१ जानेवारी २०२० पूर्वी डी डी ई मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे सदर कराव .
ई -फेरफार प्रणालीत संगणकीकृत न झालेल्या महसूल गावांची माहिती
अ.नं
|
जिल्हा
|
तालुका
|
DySLR प्रमाणे एकूण महसुली गावांची संख्या
|
दुय्यम निबंधक यांचे कडे आय अरिता मधील महसुली गावांची संख्या
|
ई-फेरफार मध्ये ऑनलाइन झालेल्या महसुली गावांची संख्या
|
तफावत असलेल्या गावांची संख्या व तफावतीचे कारण
|
१
|
२
|
३
|
४
|
५
|
६
|
७
|
ज्या गावांची जमीन महसूल संहिता १९६६ चेकालाम ४ अन्वये नवीन महसुली गावाधीसुचीत झाले नंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी त्याचा आकारबंद ( गाव नमुना न.१ ) तयार केला आहे का व त्याप्रमाणे वाडी विभाजन होवून नवीन महसूल गाव अस्तित्वात आले आहे का ? हे तपासावे . माहिती पाठवण्यापूर्वी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः सर्व वस्तुस्तिथी ची खात्री करावी व वरील नमुन्यातील माहिती दि ३१/०१/२०२० पूर्वी उप जिल्हाधिकारी / डी.डी.ई. मार्फत इकडे पाठवावी. हि विनंती.
आपला
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत,
उपयुक्त (महसूल) ( सर्व ) यांस माहिती साठी
उप संचालक भूमी अभिलेख ( सर्व)
अधीक्षक भूमी अभिलेख ( सर्व )
सह जिल्हा निबंधक (सर्व)
उप विभागीय अधिकारी (सर्व)
तहसीलदार (सर्व)
उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व )
दुय्यम निबंधक / सह दुयाम निबंधक ( सर्व )
Comments