ई फेरफार प्रणाली मध्ये दिनांक १३.१.२०२० पासून देण्यात आलेल्या सुधारणा
ई फेरफार प्रणाली
मध्ये दिनांक १३.१.२०२० पासून देण्यात आलेल्या सुधारणा
ई-फेरफार
१.
अनोंदणीकृत
फेरफार मध्ये अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र ( अंशत:) हा नवीन टेम्प्लेट फेरफार
प्रकार देण्यात आला आहे.
२.
अनोंदणीकृत
फेरफार मध्ये अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र ( पूर्णत:) हा नवीन टेम्प्लेट फेरफार
प्रकार देण्यात आला आहे.
३.
नोंदणीकृत
फेरफार मध्ये हक्कसोडपत्र ( संपूर्ण खाता परिणाम ) हा नवीन टेम्प्लेट फेरफार
प्रकार देण्यात आला आहे.
४.
अनोंदणीकृत
फेरफार मध्ये हक्कसोडपत्र ची नोटीस तयार करण्यापूर्वी री एन्ट्री करणेची सुविधा
देणेत आली आहे.
५.
नोंदणीकृत
फेरफार मध्ये हक्कसोडपत्र ची नोटीस तयार करण्यापूर्वी री एन्ट्री करणेची सुविधा
देणेत आली आहे.
६.
SRO कडे
फेरफार क्रमांक मिळालेला दस्त अपूर्ण माहिती मुळे नष्ट झाला असला तरी त्याच फेरफार
क्रमांकाने री एन्ट्री होणार .
७.
नोंदणीकृत
फेरफाराची री एन्ट्री केल्यानंतर मंडळ अधिकारी यांना फक्त अनोंदणीकृत री एन्ट्री पर्यायातून फेरफार प्रमाणित करता येईल.
८.
फेरफार
नामंजुरी नंतर फेरफार दाश्बोर्डे वरून मंडळ अधिकारी यांनी शेरा भरले नंतर असा स.न.
दाश्बोर्डे वरून निघून न जाण्याची अडचण दूर करणेत आली आहे.
९.
राजपत्राने
नावात बदल व आदेशाने नावात दुरुस्ती या फेरफारा मधील खाता प्रकार ची अडचण दूर
करणेत आली आहे.
१०.
वारस
नोंद करताना खाते नंबर शोधताना प्रथम गावात नसलेला खाते नंबर टाकून शोधल्या नंतर
पुन्हा योग्य खाता नंबर टाकून देखील खाते शोधले जात नव्हते ही अडचण दूर करणेत आली
आहे.
११.
SKN TKN
दुरुस्ती करताना खरेदी घेनाराचे खाते नंबर ब्ल्यांक असल्यास योग्य मेसेज देण्यात
आला आहे.
१२.
फेरफार
प्रमाणीकरण शेरा भरण्यापूर्वी TKN खाता दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचा मेसेज देयात
आला आहे.
१३.
वारस
नोंद मंजूर केल्या नंतर एकापेक्षा जास्त नावे त्या खात्यात असल्यास त्याचा खाते
प्रकार संयुक्त ऐवजी सामाईक करणेत आला आहे.
१४.
कोणताही
फेरफार मंजूर केल्यानंतर वेगवेगळ्या
स.न.वर वेगवेगळी नावे शिल्लक व वेगवेळी नावे कंस झाली असतील तर “फेरफाराने खाता
विभाजान” या पर्यायातून अशी कंस झालेले नावे कमी करून खाता विभाजन होवू शकेल अशी
सुविधां देण्यात आली आहे.
१५.
आता कोणत्याही
स.न.वरील एका खात्यावर “मयताचे नाव कमी
करणे” हा फेरफार प्रलंबित असताना देखील त्याच सर्वे च्या दुसऱ्या खात्यावर “वारस”
फेरफार घेता येईल.
१६.
बिनशेती आदेशाने फेरफार प्रकारातील विक्री
करणाराचे क्षेत्र खरेदी देणाऱ्याच्या क्षेत्रापेक्षा जास्त आहे असा येणारा मेसेज
आता येणार नाही.
१७.
सामान्य
फेरफारातील क्षेत्र दुरुस्ती हा फेरफार मधील क्षेत्राचे रकाने त्या ७/१२ च्या एकका
प्रमानेच वापरता येतील.
१८.
कलम १५५
च्या आदेशाने इतर हक्कातील प्रकार व उप प्रकार दुरुस्ती हा फेरफार प्रकार मधील
दुरुस्ती ची घोषणा केल्यानंतर त्याच स.न. मधील या फेरफार प्रकारासाठी दुरुस्ती
करतां येणार नाही.
१९.
२० हे. / ९९ आर. पेक्षा मोठ्यां क्षेत्राचे
अहवाल १ मधील ७/१२ तहसीलदार यांनी तात्पुरते खुले केल्या नंतर (unblock) अशा ७/१२
वर आता SRO कडे दस्त नोंदणी होवू शकते.
२०.
नोंदणीकृत
खरेदी चा फेरफार रद्द केल्या नंतर त्यांच दस्त नंबर ने पुन्हा फेरफार नोंद घेता येत नव्हती ही अडचण आता दूर
करणेत आली आहे.
२१.
कलम १५५
च्या आदेशाने फेरफार क्रमांक बदलणे या फेरफार प्रकारातील फेरफार मंजूर केले असतान
देखल नविन फेरफार घेताना हा फेरफार प्रलंबित आहे असा येणारा मेसेज आता येणार नाही.
२२.
तहसीलदार
लॉगीन ने UC मधील पेजिंग ची अडचण दूर करणेत आली आहे.
२३.
सरकार व
सरकार पट्टेदार या भूधारणा प्रकारातील ७/१२ वर आदेशाचे फेरफार घेण्यासाठी तहसीलदा
यांनी आदेशाची प्रत अपलोड करण्यातील अडचण दूर करणेत आली आहे.
DSD प्रणाली –
पीक पाहणी अद्यावत
करून काम संपल्याची घोषणा केल्या नंतर असे ७/१२ DSD मध्ये पीक पाहणी पश्च्यात
डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी च्या दाश्बोर्द मध्ये दिसतील व ते डिजिटल स्वाक्षरीत
करता येतील.
DDM प्रणाली :-
1)
DDM – प्रणालीतून जानेवारी २०२० चे चलन प्रिंट करताना
येणारी अडचण दूर करणेत आली आहे.
2)
DDM मध्ये आता अक्षरी ७/१२ देखील सर्च करता
येतील.
ODC प्रणाली (
released for all users on 5/1/2020 ) :-
1) ODC –अहवाल ५ दुरुस्ती सुविधेत सुधारणा केली आहे.
2) ODC - अहवाल ७ दुरुस्ती सुविधेत
सुधारणा केली आहे.
3) ODC ahwal-31 मधून मोठ्या
क्षेत्राचे स.न. चे क्षेत्र व एकक योग्य असल्याची खात्री करून तहसीलदार यांनी एकदा
मान्यता दिल्यास असे स.अ. या अहवालातून निघून जातील. मात्र मोठ्या क्षेत्राचे व
अहवाल १ चे स.न. या अहवालातून निघून जाणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी. तहसीलदार
यांची मान्यता फक्त एका फेरफारासाठी असते हे लक्षात घ्यावे.
4) DBA लोगिन ने ODC अहवाल साय. ६
ऐवजी ५ वाजले पासून सकाळी ८ वाजे पर्यंत अद्यावत करता येतील .
5) ODC अहवाल ४२ – एकेरी अवतरण चीन्हातील स.न. दुरुस्ती ची अडचण दूर
करणेत आली आहे .
7) बंद ७/१२ ODC अहवाल १ च्या
यादीत आता दिसणार नाहीत .
सदरच्या सुधारणा वापरून feedback द्यावा .
आपला
रामदास जगताप
दि १३.१.२०२०
Comments