वेगवेगळ्या भूधारणा असलेल्या जमिनींचे व शेती आणि बिनशेती चे ७/१२ स्वतंत्र करणे बाबत व क्जाप तयार करणे बाबत.
मार्गदर्शक
सुचना क्रं.126
क्र.रा.भू.-4/मार्गदर्शक सुचना क्रं.126/2020
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक
13.1. 2020
प्रति,
डिस्ट्रीक
डोमेन एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी (सर्व)
विषय – वेगवेगळ्या भूधारणा असलेल्या
जमिनींचे व शेती आणि बिनशेती चे ७/१२
स्वतंत्र करणे बाबत व क्जाप तयार करणे बाबत.
संदर्भ – या कार्यालयाचे परिपत्रक
क्रमांक./रा.भू.आ.का.४/ई-चावडी/प्रा.करा.४१/२०१२ दिनांक ३१.१.२०१३
ई महाभूमी तथा डिजिटल इंडिया भूमी
अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रमा अंतर्गत विकसित ई-फेरफार प्रणालीत संगणकीकृत केलेले अधिकार अभिलेख अद्यावत व अचूक करणेसाठी या कार्यालयाकडून
संदर्भीय परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देणेत आलेल्या आहेत तसेच संगणकीकृत ७/१२ चा
अचूक डेटाबेस तयार करण्यासाठी मूळ हस्तलिखित ७/१२ , खाते उतारे यांचे संगणकीकरण
करणेसाठी करावयाच्या आवश्यक दप्तर अद्यावतीकारणाबाबत सविस्तर सूचना महसूल
विभागाच्या शासन परिपत्रक क्र.सीएलार-२००१/प्र.क्र.४/भाग-१/ल-१ सेल दि.१३/११/२००२
मधील सूचनांचे अवलोकन होण्यास विनंती आहे . त्यातील काही महत्वाच्या सूचना खालील
प्रमाणे आहेत
१.
सर्व
महसूल गावांचे अद्यावत गा.न.न.१ (आकारबंद) उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचे कडून
उपलब्ध करून घ्यावेत व त्याची डेटाएन्ट्री करून घ्यावी. आकारबंद मधील क्षेत्र
नेहमी हे.आर. मध्ये भरावे.
२.
भूधारणा
पद्धती भरताना वर्ग १ , वर्ग २, सरकार व सरकारी पट्टेदार असे स्वतंत्र पोटहिस्से
तयार करावेत . एका ७/१२ वर एकच भूधारणा भरता येत असल्याने हिये कार्यवाही आवश्यक
आहे त्यामुळे नियमानुसार स्वतंत्र पोटहिस्से करण्याची कार्यवाही करावी.
३.
शेत
जमिनीचे ७/१२ व बिनशेतीचे ७/१२ स्वतंत्र करणे आवश्यक आहे . सर्व शेतजमिनीचे ७/१२
हे. आर.चौ.मी. मध्ये भरावेत तसेच सर्व बिनशेतीचे ७/१२ आर.चौ.मी. मध्ये क्षेत्र
रुपांतरीत करून भरावेत.
४.
या पुढे
सर्व महसूल अधिकारी यांनी बिनशेती आदेश व अकृषक आकारणीचे आदेश आर.चौ.मी. मधेच काढावेत
तसेच सर्व बिनशेती जमिनीचे क.जा.प. देखील आर.चौ.मी. मधेच उप अधीक्षक भूमी अभिलेख
यांनी तयार करावेत.
५.
कोणतेही
क.जा.प. तयार करताना अथवा नवीन पोटहिस्से तयार करताना बंद करणे आवश्यक असलेले ७/१२
व नवीन तयार होणारे पोटहिस्से स्पष्टपणे नमूद करावेत व त्यामध्ये देखील जेव्हडया
क्षेत्राचे ७/१२ बंद केले तेव्हडयाच क्षेत्राचे पोटहिस्से ई फेरफार मध्ये तयार
होवू शकणार आहेत ही बाब महत्वाची आहे हे सर्व संबंधितांनी लक्षात घ्यावे व त्या प्रमाणे
कार्यवाही करावी ही विनंती.
सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांचे
निदर्शनास आणाव्यात ही विनंती
(रामदास जगताप)
राज्य
समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी
आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना
माहितीसाठी सादर.
प्रत –
अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत- तहसिलदार-(सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
प्रत –
उप अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व) यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
Comments