रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

बाय बाय २०१९ - वेलकम २०२०

नमस्कार मित्रांनो ,

                         बाय  बाय २०१९  -  वेलकम २०२० 

     आज सन २०१९ ला बाय बाय करताना व २०२० ला वेलकम करताना  मनस्वी आनंद होत आहे कारण या एका वर्षात आपण आपला हा " ई फेरफार " प्रकल्प अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे . या एक वर्षात आपल्या सर्वांच्या सहकार्याने ई फेरफार प्रकल्प स्टेट डेटा सेंटर वरून क्लाऊड वर स्थलांतरीत केला त्यामुळे त्यापूर्वी सर्वर स्पेस , सर्वर स्पीड  साठी येणाऱ्या अनंत अडचणी कमी होवून खऱ्या अर्थाने ७/१२ संगणकीकरणा मध्ये गती आली . ४० लाख  फेरफार ऑनलाईन घेण्यात आले , सुमारे २ कोटी  ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले , तलाठी स्थरावरून २ कोटी ५४ लाख ७/१२  फेरफार व खाते उतारे वितरीत करणेत आले , लाखो ७/१२ अचूक करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले त्यामुळेच आज अखेर राज्यात ९३ % ७/१२ अचूक करणेत यश मिळाले असून ९१ % डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत . महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचे https://mahabhumi.gov.in हे पोर्टल सुरु करणेत आले . 
या पोर्टल वर खालील सुविधा उप्लाध होवू शकल्या आहेत .
१. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ 
२. ई अभिलेख - जुने अभिलेख ( ७ जिल्हे ) 
३. ई महाभूनकाशा - गाव नकाशा व ७/१२ चे लिंकेज 
४. ई हक्क - तलाठी कार्यालयाकडे फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली 
५. ई चावडी - तलाठी कार्यालयाचा डिजिटल नोटीस बोर्ड 
६. ई भूलेख - विनास्वक्षरीत ७/१२ व खाते उतारा 

                टाटा ट्रस्ट च्या मदतीने ई पीक पाहणी मोबाईल आप विकाशित करून खाता निहाय अचूक पीक पाहणी च्या नोंदी घेण्यासाठी शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी बारामती , वाडा , दिंडोरी , फुलंब्री , अचलपूर व कामठी या 6 तालुक्यात प्रायोगित तत्वावर ई पीक पाहणी ची अंमलबजावणी सुरु केली . 

         महारष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा परंतु अत्यंत किचकट वाटणारा ७/१२ सुटसुटीत पद्धतीने ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आपण यशस्वी होत असल्याचा मनस्वी आनंद होतो तसेच कामाचे समाधान देखील मिळते हे मात्र खरे . 

              म्हणूनच सन २०१९ हा या प्रकल्पासाठी खरोखर ठरणार मैलाचा दगड . ज्यावेळी डिजिटल ७/१२ चा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सन २०१९ विसरून चालणार नाही . हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार ,  उप जिल्हाधिकारी ,डी डी ई ,  यांचे सह सर्वच महसूल अधिकारी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे , तेथील सर्व शाश्रज्ञ , तंत्रज्ञ , डेव्हलपर , हेल्प डेस्क मधील माझे सर्व सहकारी , टाटा ट्रस्ट चे सर्व सदस्य , esds क्लाऊड टीम चे सदस्य ,  जमाबंदी आयुक्त महोदय , या कार्यालयातील अन्य सहकारी अधिकारी , मंत्रालयातील महसूल विभागातील सर्व अधिकारी , अप्पर मुख्य सचिव ( महसूल) व महसूल मंत्री महोदय यांनी अमूल्य सहकार्य केले त्यामुळेच हे शक्य झाले व हे शक्य करण्यासाठी मला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जावून १६/१८ तास 
काम करण्यासाठी माझे कुटुंबीय यांनी मला प्रसंगी त्यांना वेळ देता आला नाही तरीही नाराज न होता मला साथ दिली म्हणून मी या सर्वांचे आभार मानतो व सन २०१९ ला बाय बाय करून नवीन वर्षा साठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो . 

मनपूर्वक धन्यवाद 

आपला 
रामदास जगताप 
दि ३१.१२.२०१९ 



Comments

Archive

Contact Form

Send