रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून टेस्टिंग साठी दिलेल्या नवीन सुधारणा दि ३०.१२.२०१९


नमस्कार मित्रांनो , 


विषय - नवीन सुधारणा दि ३०. १२.२०१९ 


  १.  कोणत्याही सरकार भूधारणा असलेल्या ७/१२ वर यापुढे फक्त आदेश व दस्त ऐवज या फेरफार प्रकारातून तहसीलदार यांनी आदेशाची प्रत अपलोड केल्या नंतर व सदरचा ७/१२ UC मधून अन्ब्लोक (unblock) करून दिल्यास फक्त एक आदेशाचा फेरफार घेता येईल त्यासाठी खालील लिंक वापराव्यात.

https://mahaferfarnas.enlightcloud.com/testsite4/

https://mahaferfarnas.enlightcloud.com/Usercreation/
 आपल्या uat नंतर सर्वांसाठी उपलब्ध करून दिले जाईल . 
सध्या अशा ७/१२ वर कलम १५५ च्या आदेशाने फेरफार घेता येणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी. 

खालील नवीन  सुविधा https://mahaferfarnas.enlightcloud.com/testsite4/ टेस्टिंग साठी दिल्या आहेत 
२. वारस फेरफार घेतल्या नंतर तयार होणारा संयुक्त खाता प्रकार या पुढे आपोआप समाईक खाताप्रकार तयार होईल .
३. एखाद्या खात्यात एकाच चालू नाव असताना एक किंवा अनेक नावे कंस झालेली असली तरी असे  खाते वैयक्तिक खाते करता येत नव्हते आता असे खाते फेरफाराने खाता विभाजन या सुविधे मध्ये खाता विभाजना साठी उपलब्ध असेल तेथून खाते विभाजन करून एका नावाचे वैयक्तिक खाते तयार करता येईल . 
४. मयताचे नाव कमी करणे हा फेरफार घेतल्याने त्या पूर्ण सर्वे वर वारस नोंद घेता येत नव्हती ही अडचण दूर केली असून आत्ता मयताचे नाव कमी करणे हा फेरफार प्रलंबित असला तरी त्याच सर्वे च्या दुसऱ्या खात्यावर वारस नोंद घेता येईल .
५. SRO कडून प्राप्त हक्कसोड पत्राची नोंद नष्ट केली असल्यास त्याच दस्त क्रमांकाची निवड करून नोंदणीकृत मधूनच री एन्ट्री ची सुविधा देनेत आली आहे 
६. अनोंदणीकृत फेरफार प्रकारामध्ये अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र हा नवीन फेरफार प्रकार विकाशित करणेत आला आहे . 
७. हक्कसोड पत्राचे नोंदीतून सर्वे न. निवडण्याची सुविधा विकसीत  केली आहे 
८. फेरफार ने होणारे खाता विभाजन ही सुविधा आता सर्व फेरफार प्रकारासाठी ( मंजुरी नंतर )  वापरता येईल .
९. खातेदार यांनी ई हक्क प्रणाली मध्ये (PDE) भरलेली खातेदाराची वैयक्तिक माहिती तलाठी यांनी मान्य (APPROVE) करणेची सुविधा ई फेरफार मध्ये PDE DASHBOARD  मध्ये विकसित करणेत आली आहे .
१० . ODC अहवाल MIS मधील डी डी ई लोगिन व DBAलोगिन मध्ये दिसून येणारी विसंगत संखेतील तफावत दूर करणेत आली आहे .  

महत्वाची सूचना - 
खाता दुरुस्ती सुविधेमधून तलाठी यांनी तहसीलदार यांचे कडे मंजुरी साठी पाठवलेल्या सर्व स.न. ला तहसीलदार यांची मान्यता मिळाली नसल्यास तलाठी यांनी मान्यता मिळालेल्या स.न. चा फेरफार तयार करून परिशिष्ट क तयार केल्या नंतर व सदरचा फेरफार प्रमाणित झाले नंतरच उर्वरित स. न.  ( तहसीलदार यांनी मान्यता न दिलेले ) खाता दुरुस्ती साठी अथवा अन्य दुरुस्ती साठी उपलब्ध होतील ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी .

 



आपला 
रामदास जगताप
दि ३०.१२.२०१९ 




Comments

  1. खातेदार यांनी ई हक्क प्रणाली मध्ये (PDE) भरलेली खातेदाराची वैयक्तिक माहिती तलाठी यांनी मान्य (APPROVE) करणेची सुविधा ई फेरफार मध्ये PDE DASHBOARD मध्ये विकसित करणेत आली आहे हि सुविधा Eferfar मध्ये Aprove होत नाही ह्याबद्दल बघावे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send