७/१२ संगणकीकरणाच्या वेळेस नोंदविलेल्या काल्पनिक फेरफार क्रमांकाची पडताळणी करणे बाबत .
प्रति,
उपविभागीय अधिकारी (सर्व )
विषय - ७/१२ संगणकीकरणाच्या वेळेस नोंदविलेल्या काल्पनिक फेरफार
क्रमांकाची पडताळणी करणे बाबत .
विदर्भ व मराठवाड्यासह काही
जिल्ह्यात ७/१२ संगणकीकरण करतांना काही खातेदारांच्या नावासाठी हस्तलिखीत ७/१२
सदरी फेरफार क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले होते. काही तालुक्यामध्ये विविध कारणांमुळे फेरफार
उपलब्ध न झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी तत्कालीन तलाठी यांनी फेरफार न नोंदविता
काही खातेदारांची बेकायदेशीर नाव दाखल केल्यामुळे ७/१२ संगणकीकरणाच्या वेळेस
फेरफार उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे काही तालुक्यांमध्ये ७/१२ संगणकीकरणाच्या
वेळेस काल्पनिक फेरफार क्रमांक (१) किंवा (९३९४) असे फेरफार ७/१२ संगणकीकरणासाठी
नोंदविण्यात आल्याचे दिसून येते.
फेरफार क्रमांक (१) हा एकत्रिकरण
कायदयाचा फेरफार असल्यामुळे या फेरफार क्रमांकाने खातेदाराचे नाव नोंदविणे उचित
नाही. तसेच फेरफार क्रमांक (९३९४) हा मुंबई
शेतजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रिकरण करण्या बाबत नियम, १९५९मधील नियम ९ च्या धर्तीवर नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र जमीन
महसूल अधिनियम, १९६६, कलम १४८,कलम १४८-अ आणि कलम १४९ यांचे एकत्रित अवलोकन केले असता असे दिसून येते की, ७/१२ सदरी खातेदाराचे नाव दाखल करण्यासाठी नोंदणीकृत दस्त, सक्षम न्यायालयाचा आदेश किंवा वारसाधिकार या बाबी व त्यामुळे होणारा
फेरफार अत्यावश्यक आहे.
७/१२ संगणीकरणाच्या वेळी डेटा
एन्ट्री करताना दाखल करण्यात आलेले काल्पनिक फेरफार क्रमांक (१) किंवा (९३९४)
यांच्या नक्कला कोणी माहितीच्या अधिकारामध्ये मागितल्यास अडचणीचे ठरू शकते त्यामुळे
या प्रकारच्या काल्पनिक फेरफारामुळे दाखल असलेल्या खातेदारांच्या कायदेशीर दस्तावेजाची
तपासणी करून त्यांचे नाव नेमके कोणत्या कायदेशीर दस्तानुसार ७/१२ सदरी दाखल
झाले आहे याची खात्री करून घेणे व त्यासाठीचा योग्य तो फेरफार क्रमांक त्या नोंदी समोर
नमूद करणे आवश्यक आहे.
वरील प्रमाणे खात्री करण्यासाठी
उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या उपविभागातील ज्या-ज्या ७/१२ सदरी फेरफार
क्र.(१) किंवा (९३९४) किंवा अन्य काल्पनिक फेरफारान्वये खातेदाराच्या नावे
दाखल आहेत त्या सर्व खातेदारांची सुनावणी घेण्यासाठी जरूर तितक्या विशेष कॅम्पचे
आयोजन करावे आणि अशा खातेदारांना त्यांच्याकडील मालकी हक्काचे कायदेशीर दस्त
घेऊन हजर राहण्याची नोटीस दयावी. ज्या खातेदारांकडे कायदेशीर दस्त उपलब्ध
असतील त्या खातेदारांच्या नावे, त्या दस्तानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या स्वतंत्र आदेशान्वये नव्याने
फेरफार नोंदवून त्या आधारे त्यांची नावे ७/१२ सदरी कायम करावीत आणि ज्या खातेदारांची
नावे ७/१२ सदरील दाखल आहेत आणि त्यांचे नावे काल्पनिक फेरफार नोंदविण्यात आलेला
आहे परंतु खातेदाराकडे त्याच्या दाखल नावा बाबत कोणताही कायदेशीर पुरावा उपलब्ध
नाही अशा खातेदारांची सखोल चौकशी करून त्यांचेकडे कायदेशीर पुरावे न आढळल्यास त्यांची
नावे ७/१२ वरून कमी करून त्यांचे नावे असलेल्या
क्षेत्रावर महाराष्ट्र शासनाचे नाव दाखल करणे बाबत स्वय्स्पष्ट आदेश
निर्गमित करावेत व त्या प्रमाणे असे
क्षेत्र शासनजमा करावे. संपूर्ण राज्यातील उपरोक्त कारवाई ही फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण करणेत यावी आणि त्या बाबतचा अहवाल खालील नमुन्यात या
कार्यालयाकडे सादर करण्यात यावा.
गाव- साझा
- उपविभाग - जिल्हा -
|
||||||
अ.
क्र.
|
खातेदाराचे
नाव
|
दिलेला
काल्पनिक फेरफार क्रमांक
|
चौकशीच्या
वेळी खातेदाराने सादर केलेल्या कायदेशीर कागदपत्राचा तपशील
|
घेण्यात
आलेला निर्णय
|
कायदेशीर
कागदपत्राच्या आधारे देण्यात आलेला नविन फेरफार क्रमांक
|
कायदेशीर
कागदपत्र उपलब्ध नसल्यास शासन जमा करण्यात आलेले क्षेत्र
|
|
|
|
|
|
|
|
वरील
प्रमाणे सुनावणी घेतांना खातेदाराचा शेतकरी पुराव आर्वजून तपासावा तसेच तुकडेजोड
तुकडेबंदी कायदयासह अन्य कुठल्याही कायदयाचा भंग होत नसल्याची खात्री करावी व
त्याप्रमाणे स्वयंस्पष्ट आदेश निर्गमित करावेत . या कामाचा जिल्हास्थरावर
जिल्हाधिकारी यांनी आढावा घ्यावा .
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
दि १.१.२०२०
प्रत – डी डी ई ( सर्व ) यांना माहितीसाठी व
योग्य त्या कार्यवाही साठी
Comments