रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अविभाज्य हिस्सा खरेदी फेरफार कधी निवडावा?

अविभाज्य हिस्सा खरेदी फेरफार कधी निवडावा?
१) केवळ सामाईक/संयुक्त खाते प्रकार करिता लागू – (ज्यात खातेदाराचे  व्यक्तिगत क्षेत्र नमूद नाही एकत्रित मिळून धारण केलेले क्षेत्र आहे.)
२) सामाईक खात्यातील सर्व खातेदार मिळुन विक्री करत नाहीत तर सामाईक खात्यातील काही खातेदार त्यांचा अविभाजित हिस्सा विकत आहेत.
फेरफार च्या मजकूर मध्ये क्षेत्राचा उल्लेख केवळ अविभाज्य हिस्सा म्हणून नमूद असेल


फेरफार मंजूर केले नंतर ७/१२ वरील परिणाम कसा दिसेल ?
१) खरेदी : अविभाज्य हिस्सा (संपूर्ण)
सामाईक खात्यातील ज्या व्यक्ती त्यांचा संपूर्ण हिस्सा विकत आहेत त्या खातेदारांच्या नावाला कंस होईल व घेनाराचे नाव त्याच सामाईक खात्यात समावेश होईल.
२) खरेदी : अविभाज्य हिस्सा (अंशतः)
खरेदी घेणार यांचे नाव खरेदी देणार यांच्या नावासह सामाईक खात्यात समावेश होईल.


खरेदी : अविभाज्य हिस्सा (संपूर्ण) ऐवजी खरेदी अविभाज्य हिस्सा (अंशतः) असा फेरफार री-एन्ट्री ने दुरुस्ती करता येतो .     
              📌i-sarita – प्रणाली मध्ये सुधारणा – दिनांक १.१२.२०१९ पासून लागू केल्या आहेत.
१) व्यक्तीगत खाते प्रकार करिता आता अविभाज्य हिस्सा खरेदी फेरफार निवडता येणार नाहीत .
२) सामाईक खात्यातील सर्व सहहिस्सेदार विक्री करत असतील तर अविभाज्य हिस्सा खरेदी फेरफार निवडता येणार नाहीत

Comments

  1. छान माहिती

    ReplyDelete
  2. एकाच वेक्ती चा 7/12 असतो गट नंबर सुद्धा सारखाच परंतु ऑनलाईन मधे काही 7/12 वर पीक पेरे नसतात तर काहींवर असतात तसेच डिजिटल 7/12 आणि not ligal parpos 7/12 मधे खूप तफावत आहे यात नेमका कोणता 7/12 ग्राह्य धरण्यात यावा.

    ReplyDelete
  3. एका वेक्तीने हॉटेल व दुकान जागेचे खरेदीखत दस्त नोंदणी केले असून तलाठी यांचे कडे फेरफार व सूची 2 ची नक्कल दिली असून सदर फेरफार तलाठी यांनी e चावडी वर दर्शवली आहे त्यात नोटीस काढल्या नंतर लिहून घेणार व देणार यांची कोणतीही लेखी तक्रार नाही व ऑनलाईन फेरफार वर कोणतेही तक्रार प्राप्त नाही असा सेरा आहे परंतु या जागेतील लिहून देणार यांच्या सूनबाई यांनी लिहून घेणार यांचे नाव लावू नये म्हणून अर्ज केला आहे त्यामुळे मंडळ अधिकारी यांचे कडे फेरफार प्रलंबित आहे असा साधा अर्ज देऊन कोणीही 7/12 वर नाव लावण्यासाठी थांबाऊ शकते का आणि मंडळ अधिकारी थांबू शकतात का त्यांना प्रलंबित ठेवण्याचे अधिकार किती दिवस आहेत.

    ReplyDelete
  4. अविभाज्य हिस्साचे मृत्यू पत्र होते का

    ReplyDelete
  5. आदरणीय सर,
    समजा एखाद्या सामाईक क्षेत्रात चार हिस्सेदार आहेत त्यापैकी एका व्यक्तीने आपला शेतजमिनीचा हिस्सा अविभाज्य खरेदी विक्री नियमांतर्गत विकला व नंतर उरलेल्या तिघांनाही त्यांचा सामाईक हिस्सा विकावयाचा असल्यास त्यांना बाहेरील व्यक्तीस विकायचा आहे तर त्यांनी काय करावे?
    जर या तिघांनी त्यांचा हिस्सा बाहेरील व्यक्तीस विकला तर जो नवीन व्यक्ती हिस्सेदार झालेला आहे तो त्या तिघांना नोंदीस अडचण निर्माण करू शकतो का?
    जर तो नवीन आलेला हिस्सेदार कमी किमतीत या तिघांची जमीन खरेदी करू इच्छित असेल व त्यांना दुसर्‍यास विकण्यास अडचण निर्माण करीत असेल करीत असेल तर काय करावे?

    ReplyDelete
  6. सर सामाईक क्षेत्रात ३ हिस्सेदार आहेत त्या तिघांना त्यांचे ४.५ आर (संपूर्ण ) शेतजमीन सातबारयाच्या बाहेरील व्यक्तीला विकायचे आहे. त्यासाठी मला प्रांत परमिशन ची गरज आहे का ?

    ReplyDelete
  7. मी वैयक्तिक तीन खातेदाराकडून जमिनी खरेदी केलेली आहे सदरील जमिनीचा फेरफार हा लागलेला असून त्यात तिघांपैकी एकाच क्षेत्र आमच्या सातबारावर आमच्या नावाने आलेला आहे दोघांची नाव उडालेले आहेत पण आमच्या नावाने ते क्षेत्र दाखवत नाही त्याबद्दल मार्गदर्शन करावे सादरील जमिनीच्या खरी दस्तावेज अभिजावी संपूर्ण हिस्सा विक्री या नावाने झालेला आहे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send