अहवाल क्र. ३ दुरुस्त करणे- भरणे बाबत मार्गदर्शक सूचना
अहवाल क्र. ३ दुरुस्त करणे/भरणे
बाबत मार्गदर्शक सूचना
·
ODC
अहवाल क्रमांक ३ - गाव नमुना १ म्हणजेच आकारबंद
व ७/१२ मधील तफावत दर्शविणारा अहवाल होय .
Ø अहवाल ३ मध्ये आर.चौ.मी मधील क्षेत्र हे.
आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत करून दाखविले
जाते याची नोंद घ्यावी.
Ø जेथे अहवाल क्रमांक ३ मध्ये माहिती दिसत नाही
याचा अर्थ त्या गावामध्ये आकारबंदाची माहिती भरलेली नाही.
·
ODC
अहवाल क्रमांक ३अ
Ø या अहवाल मध्ये सर्वे/गटाचे एकूण क्षेत्राची
(अहवाल ३) ची माहिती भरलेली आहे परंतु ते दुपटी पेक्षा जास्त किंवा कमी भरलेले
आहे. या अहवाल मधील ७/१२ अथवा आकारबंद दुरुस्ती केल्या शिवाय फेरफार घेता येणार
नाहीत.
·
हा अहवाल
३ निर्माण होण्याची कारणे -
1.
७/१२ चे
एकक हे.आर.चौ.मी. आहे. परंतु आकारबंद भरताना क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये भरले आहे.
2.
७/१२ चे
एकक आर.चौ.मी आहे व आकारबंद भरताना देखील क्षेत्र आर.चौ.मी.मध्ये भरले आहे.
3.
आकारबंद
भरला आहे परंतू ऑनलाईन प्रणाली मध्ये ७/१२ उपलब्ध नाही.
4.
एका
७/१२ चे अनेक पोट हिस्से पडलेले आहेत परंतु केवळ एका किंवा काही पोट हिश्यांची
माहिती भरलेली आहे.
·
आकाराबंद
कसा भरावा.
1.
आकारबंद
भरताना ७/१२ वरील क्षेत्र कोणत्याची एककात
असले तरीही आकारबंद केवळ हेक्टर आर. मध्ये
रुपांतरीत करून भरावा.
2.
एका
सर्वे क्रमांकाचे अनेक पोट हिस्से पडले असल्यास एक सर्वे क्रमांक भरून सर्व
हिश्याचे एकत्रित हे.आर मधील क्षेत्र भरावे (यात बिनशेती प्लॉट व शेती ७/१२ असे
एकत्रित असु शकतात त्यात बिनशेती ७/१२ चे ७/१२ वरील क्षेत्र आर.चौ.मी मध्ये असलेतरी आकारबंद मध्ये असे
क्षेत्र हे.आर मध्ये रुपांतरण करून एकूण
करावी).
3.
एका
सर्वे क्रमांकाचे अनेक पोट हिस्से पडले असल्यास सर्व सर्वे क्रमांकाचे क्षेत्र
देखील भरू शकता केवळ आर.चौ.मी चे क्षेत्र हे.आर मध्ये रुपांतरण करून भरावे.
·
तलाठी
लॉगीन ने ODC मधून अहवाल ३ दुरुस्ती साठवा केल्या नंतर सदर दुरुस्ती ला तहसीलदार /
नायब तहसीलदार (ई–फेरफार) यांच्या UC लॉगीन ने मान्यता देणे आवश्यक आहे.
Ø सदर मान्यता देताना गावाच्या आकारबंदाची प्रत
पाहूनच तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी मान्यता देणे आवश्यक आहे. कृपया ७/१२ वरून
आकारबंद भरू नये .
Ø तलाठी कार्यालयात अद्ययावत आकारबंद उपलब्ध
नसल्यास त्याची छायाप्रत उप अधीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून प्राप्त करून घ्यावी व
त्यावरूनच माहिती भरावी अथवा संबंधित नायब तहसीलदार यांनी त्यावरून खात्री करूनच
आकारबंदला मान्यता द्यावी.
Ø तलाठी यांनी प्रश्तावीत केलेल्या चुकीच्या
दुरुस्ती नायब तहसीलदार ( ई फेरफार) / तहसीलदार यांना अमान्य देखील करता येतील.
Ø मोठ्या तफावतीचे ७/१२ अहवाल ३ च्या दुरुस्ती
सुविधांमधून दुरुस्त केले नंतरच त्यावर फेरफार
घेता येईल .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व
राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
Comments