रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दिनांक १८.११.२०१९ पासून मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करताना फिफो (FIFO) लागू करणे बाबत


नमस्कार मित्रांनो ,

विषय - मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करताना फिफो (FIFO) लागू करणे बाबत 


                तलाठी स्थरावर फेरफार नोंदी घेताना ज्या प्रमाणे नोंदणीकृत दस्तांच्या बाबतीत FIFO लागू केला आहे त्या प्रमाणे आज दि १८.११.२०१९ पासून मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करताना फिफो (FIFO) लागू करणेत आला आहे त्यामुळे आज पासून मंडळ अधिकारी स्थरावर निर्गती साठी उपलब्ध असलेल्या फेरफारातील कोणताही फेरफार प्रमाणित करताना तो ज्या अनुक्रमे फेरफार प्रमाणित होण्यास पात्र झाले आहेत ( नोटीस बजावल्यानंतर १८ दिवस ) त्या अनुक्रमे FIRST IN FIRST OUT (FIFO) या तत्वानेच फेरफार  निर्गत (मंजूर / नामंजूर ) करता येतील .
                  फेरफार घेतल्यानंतर  तलाठी यांनी तात्काळ नोटीस काढणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक त्या सर्व संबंधित यांना रीतसर नोटीस बजवून नोटीस रुजू / बजावल्याच्या तारखा तलाठी यांनी भरणे आवश्यक आहे . त्यानंतर अशा फेरफारावर १५ दिवसात लेखी हरकत प्राप्त झाल्यास हरकतीचा तपशील तलाठी यांनी  नोटीस बजावल्याच्या तारखेपासून १८ दिवसाच्या आत भरणे आवश्यक आहे .त्यामूळे कोणतीही फेरफार नोंद नोटीस बजावल्याची तारीख भरले नंतर  १८ दिवसानंतर आपोआप मंडळ अधिकारी यांचे लॉगीन ला निर्गतीसाठी पात्र  फेरफार म्हणून उपलब्ध होईल .  त्यानंतर असे १५ दिवसांच्या कायदेशीर नोटीस च्या  मुदती नंतर हरकत प्राप्त झाली तरी हरकत  ई फेरफार प्रणालीत नोंदण्याची सोय तलाठी यांना नाही . हरकत मुदतीत प्राप्त होवून देखील काही तांत्रिक कारणाने हरकत शेरा तलाठी यांना भरता आला नाही तर असा हरकत अर्ज तलाठी यांनी नायब तहसीलदार ( ई फेरफार ) म्हणजेच DBA  यांचे कडे पाठवून त्याची एक छायाप्रत मंडळ अधिकारी यांना द्यावी. नायब तहसीलदार यांना  अशी नोंद निर्गत झाली नसल्यास हरकतीचा तपशील भरण्याची सोय देण्यात येणार आहे. ( सध्या अशी सोय नाही ) . त्यानंतर अद्याप फेरफार नोंद निर्गत झाली नसल्यास अश्या अर्जाची गुणवत्तेवर दाखल मंडळ अधिकारी यांनी घ्यावी व गुणवत्तेवर निर्णय घ्यावा मात्र  त्यापूर्वीच फेरफार निर्गत झाला असल्यास अर्जदार यांनी जरूर तर उप विभागीय अधिकारी यांचेकडे निर्गत नोंदीवर अपील दाखल करावे असे संबंधित अर्जदार यांना कळवावे  .

 मंडळ  अधिकारी स्थरावरील FIFO ची वैशिष्टे 
१. मंडळ अधिकारी यांना ज्या अनुक्रमे फेरफार प्रमाणित करण्यास पात्र झाले आहेत त्याच क्रमाने फेरफार निर्गत करावे लागतील .

२. FIFO स्किप करण्यासाठी कारण नमूद करून मंडळ अधिकारी नायब तहसीलदार ( ई फेरफार ) / तहसीलदार यांना ऑनलाईन विनंती पाठवू शकतात .

३. कोणत्याही दिवाणी अथवा महसुली न्यायालयाचे स्थगिती आदेश असलेल्या नोंदी अथवा नोंद निर्गत करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र उपलब्ध नसल्यास मंडळ अधिकारी कारण लेखी नमूद करून फिफो स्किप ची विनंती नायब तहसीलदार / तहसीलदार  यांना पाठवू शकतील व अशी विनंती त्यांनी  ऊजर क्रिएशन (UC)  मधील त्यांचे बायो- मेट्रिक  लॉगीन ने मान्य केल्यास असा फेरफार कायम स्वरूपी स्किप होवू शकतो .

४. अशा पद्धतीने स्किप केलेल्या फेरफार यांचा एकत्रित अहवाल त्याचे कारणांसह अहवाल स्वरूपात वरिष्ठ अधिकारी यांना ऑनलाईन उपलब्ध होईल त्याचे आधारे मंडळ अधिकारी यांचे मूल्यमापन करता येईल .

५. तक्रार  नोंदी व आदेशाने होणाऱ्या फेरफार नोंदींना   FIFO लागू होणार नाही .

                 अशा पद्धतीने FIFO लागू केल्याने मंडळ अधिकारी यांचे कामकाजाची कार्यपद्धती मध्ये आणखी गुणवत्ता , पारदर्शकता व गतीमानता येतील तसेच मंडळ अधिकारी यांना देखील कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कामकाज नियमाप्रमाणे पार पाडता येईल असा मला विश्वास आहे .

फेरफार FIFO मधून वगळण्यासाठी विनंती करणे – User Manual

सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती .



आपला 

रामदास जगताप 
दि १९ .११.२०१९ 

Comments

  1. मंडल अधिकारी यानी काही कारणास्तव फेरफार reentry साठी तलाठी यांचेकडे परत पाठवायचा असेल तर त्यासाठी dba परवानगी लागेल का आणी नसेल तर परत पाठवल्यास तो मंजूर होईपर्यंत वाट पहावि लागेल काय

    ReplyDelete
  2. फाळणी 12 चा फेरफार महसूल खात्यास रद करनेचा अधिकार आहे का
    त्यवार stay देणेच अधिकार आहे का

    माजा फेरफार मंजूर जाहले असून प्रांत साहेबांनी stay दिला आहे
    मी काय करावे
    Plsमार्गदर्शन करावे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send