प्रलंबित फेरफार चा MIS सुधारित करणे बाबत व सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - प्रलंबित फेरफार चा MIS सुधारित करणे बाबत व सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देणे बाबत
ई फेरफार प्रणाली मध्ये गेल्या तीन वर्षात झालेले असंख्य बदल , नव्याने समाविष्ट केलेले फेरफार प्रकार , एडीट , री एडीट मध्ये तसेच कलम १५५ अंतर्गत आदेशाने केलेल्या हजारो दुरुस्त्या त्यांचेमुळे MIS मध्ये दिसून प्रलंबित फेरफार व तलाठी मंडळ अधिकारी यांचे लॉगीन देसून येणारे प्रलंबित फेरफार व MIS मध्ये दिसून येणारे प्रलंबित फेरफार संख्या या मध्ये मोठी तफावत दिसून येत होती तसेच क्षेत्रीय स्थरावरून वापरकर्त्यांकडून देखील तसा फीडब्याक प्राप्त झाल्याने ई फेरफार प्रणाली अंतर्गत प्रलंबित फेरफार चा MIS सुधारित करणेत आला असून त्याचे टेस्टिंग अहमदनगर , सातारा व रायगड या जिल्ह्यात करणेत आले असून सुधारित MIS आज पासून नियमित लिंक वर उपलब्ध करून दिला आहे .
त्याची वैशिष्ट्ये
१. दि २१.११.२०१९ पासून प्राप्त होणारा MIS मध्ये निर्गत फेरफार व प्रलंबित फेरफार असे दोन प्रकारात विभाजन केले असून हा सुधारित MIS मधील प्रलंबित फेरफार व जुन्या MIS मधील प्रलंबित फेरफार यांचा मेळ घेण्याचा प्रयत्न करू नका .
२. दि २१.११.२०१९ पासून प्राप्त होणाऱ्या MIS मध्ये निर्गत फेरफार व प्रलंबित फेरफार असा बदल करणेत आला आहे.
३. या MIS मधील प्रलंबित फेरफार संख्ये प्रमाणे फेरफार अद्याप देखील तलाठी अथवा मंडळ अधिकारी लॉगीन ला प्रलंबित दिसतात का ? या बाबत आपण गाव निहाय प्रलंबित फेरफार संख्या व तपशील पाहता येईल त्यासाठी देण्यात आलेले MIS मध्ये लोगिन करून प्रलंबित फेरफाराची संख्या व प्रत्यक्ष प्रलंबित फेरफार ( सर्व Dashboard ) पडताळणी करून पाहावेत .
आपला
रामदास जगताप
दि २०.११.२. २०१९
Comments