दिनांक 18.11.2019 पासून देणेत आलेल्या नवीन सुविधा
दिनांक 18.11.2019 पासून देणेत आलेल्या नवीन सुविधा | ||
ई फेरफार | ||
1.अविभाज्य हिस्स्याची विक्री ( अंशात ) हा नवीन फेरफार प्रकार अनोंदणीकृत फेरफार मध्ये देण्यात आला आहे | ||
2. अविभाज्य हिस्स्याची विक्री ( पूर्णतः) हा नवीन फेरफार प्रकार अनोंदणीकृत फेरफार मध्ये देण्यात आला आहे | ||
3. अविभाज्य हिस्स्याची विक्री ( अंशात ) हा नवीन फेरफार प्रकार नोंदणीकृत फेरफार( री एन्ट्री SRO) मध्ये देण्यात आला आहे |
||
4. अविभाज्य हिस्स्याची विक्री ( पूर्णतः ) हा नवीन फेरफार प्रकार नोंदणीकृत फेरफार( री एन्ट्री SRO) मध्ये देण्यात आला आहे . |
||
5. ज्या ७/१२ वर भूधारणा वर्ग १ आहे व उप प्रकार चुकून निवडलेला असेल
तर तो काढून टाकण्याची सुविधा तहसीलदार मान्यतेने दिली आहे . ( कलम १५५ प्रमाणे च फ्लो असेल फक्त परिशिष्ट क काढण्याची गरज नाही , फक्त मान्यता आवश्यक आहे ) |
||
6. फेरफाराने खाता विभाजन हा पर्याय वापरून जर काम केले नसेल आणि
एखाद्या खात्यावरील वेगवेगळ्या ७/१२ वर काही नावाना कंस असल्यास तशी सूचना खाते उताऱ्यावर ( गाव न.नं.८ अ ) दर्शविण्यात येत आहे . अश्यावेळी असा खाते उतारा DDM वितरीत करण्यापूर्वी फेरफाराने खाता विभाजन हा पर्याय वापरून खाता विभाजन करून घ्यावे व त्या नंतरच ८ अ वितरण करावे . |
||
7. अनोंदणीकृत फेरफार प्रमाणे नोंदणीकृत फेरफार मधील देखील तपशील
दुरुस्त करण्याची सोय फेरफार तलाठी लोगिन ला DASHBOARD फेरफार रजिस्टर प्रक्रिया हा पर्याय देण्यात आलेला आहे . जसे नवीन खाते ऐवजी खाते नंबर नमूद करणे. |
||
8. जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ किंवा पोट हिस्से तयार करणे चा फेरफार नामंजूर
केल्यास असे ७/१२ वर पुन्हा नवीन फेरफार घेण्यासाठी उपलब्ध राहतील . |
||
9. खाता दुरुस्तीचा फेरफार नामंजूर केल्यास असे ७/१२ वर पुन्हा नवीन फेरफार घेण्यासाठी उपलब्ध राहतील . | ||
सामाईक खरेदी फेरफार ,
आदेशाने फेरफार , हक्कसोड पत्राचे फेरफार इ.
फेरफार मंजूर होताच आवश्यकते प्रमाणे खाता विभागणी आपोआप होईल अशी सुविधा विकसित केली आहे . |
||
10. फेरफार निर्गतीसाठी फेरफार नोटीस बजावल्याची तारीख विचारात घेवून मंडळ अधिकारी स्थरावर फिफो (FIFO) लागू करणेत आला असून कोणत्याही फेरफार कोणत्याही कारणाने अनुक्रमे निर्गत करता येत नसल्यास ( कोणत्याही अधिकारी / न्यायालयाचे स्थगिती आदेश अथवा काही कागदपत्र अप्राप्त असल्यास ) -फेरफार FIFO मधून वगळण्यासाठी विनंती करणे या पर्यायातून फिफो स्किप करण्याची विनंती मंडळ अधिकारी तहसीलदार / नायब तहसीलदार यांना ऑनलाईन पाठवू शकतात तसेच तहसीलदार / नायब तहसीलदार UC मधून अशी विनंती विना विलंब मान्य करतील . त्यानंतरच मंडळ अधिकारी यांना पुढील फेरफार निर्गत करू शकतील . |
||
11. दुय्यम निबंधक यांचेकडून प्राप्त दस्तांचे फेरफार मध्ये रुपांतरीत
करण्यासाठी अनुक्रम (FIFO-First-In-First-Out ) लागू करणेत आला आहे . |
||
12. अहवाल १ मध्ये असलेले ७/१२ देखील आत्ता खाता दुरुस्ती च्या (कलम
१५५ ) सुविधे मधून दुरुस्ती करता येईल. |
||
13. ज्या ७/१२ चा भूधारणा वर १ असून उप प्रकार निवडण्यात आला आहे (
खऱ्याखुऱ्या औदोगिक कारणासाठी कुळकायदा कलम ६३ अ प्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी / आदिवशीच्या मुळच्या वर्ग १ च्या जमिनी पैकी एक उप प्रकार ) त्या ७/१२ वर दस्त नोंदणीसाठी , खरेदीचे फेरफार घेण्यासाठी डी.डी.ई./ तहसीलदार यांचे कडून असे ७/१२ अन्ब्लोक ( UNBLOCK) करून घ्यावे लागतील . तथापि अश्या ७/१२ वर आदेशाने फेरफार घेता येईल तसेच बोजा इकरार असेही फेरफार इतर हक्कात घेता येईल . |
||
14. तहसीलदार आदेशाने जुने हस्तलिखित ७/१२ संगणकीकृत करण्यासाठी
घेतलेला फेरफार रद्द केला असेल तर पुन्हा नवीन फेरफार घेवून असे ७/१२ संगणकीकृत करता येतील . |
||
15. कलम १५५ च्या आदेशाने घेतलेले फेरफार रद्द केले असतील तर अश्या
७/१२ वर दुरुस्ती साठी पुन्हा १५५ च्या आदेशाने फेरफार घेवून दुरुस्ती करता येईल . |
||
16. सामान्य बोजा या फेरफारामध्ये दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक नमूद करणे आवश्यक असणार नाही . | ||
तहसीलदार यांचे आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे या साठी नवीन सुविधा
देनेत आली आहे तथापि त्या साठी तहसीलदार यांनी लेखी आदेह काढून तो ऑनलाइन अपलोड केला असावा व अंगठा लागून तहसीलदार यांनी मान्यता देखील द्यावी लागेल. |
||
17. ज्या ७/१२ वर भूधारणा वर १ असून इतर हक्कात एका पेक्षा जास्त शेरे
नमूद झाले असतील तर ते नष्ट करण्याची सोय इतर हक्कातील नोंदी नष्ट करावयाच्या सोयी मधी दिली आहे . |
||
18. हरकत नोंदविली असलेल्या / तक्रार नोंदी चे फेरफार मंजूर करताना मंडळ अधिकारी यांना येणारी अडचण दूर करणेत आली आहे . |
||
USER CREATION | ||
19. मंडळ अधिकारी यांनीं - फेरफार FIFO मधून वगळण्यासाठी विनंती करणे -
या पर्यायातून तहसीलदार / नायब तहसीलदार यांन ऑनलाईन विनंती केल्यास तहसीलदार / नायब तहसीलदार यांना USER CREATION मधून मान्यता देता येईल . |
||
20. जर कोणत्याही गावात
एकसारखे स.नं / गट नं. असतील व ७/१२ वरील माहितीत मात्र बदल असेल तर असे ७/१२ दाखवणारा एक अहवाल ODC देण्यात आला असून तो पासून त्यापैकी कोणता ७/१२ ठेवायचा व कोणता नष्ट करयाचा त्याचा निर्णय तलाठी यांना घावा लागेल . |
||
21. ODC मध्ये अपूर्णांकात असलेले खाता क्रमाक दुरुस्ती ची सुविधा दिली आहे . | ||
22. ODC मध्ये सरकार खाते प्रकारात एका पेक्षा जास्त नावे असलेल्या
खात्यांचा अहवाल देण्यात आला आहे तो पाहून आवश्यकते प्रमाणे दुरुस्ती करणेत यावी . |
||
23. ODC मध्ये सरकार व अन्य खाते एकाच ७/१२ मध्ये असलेल्या ७/१२ ची
यादी दर्शविणारा हवाल देण्यात आला आहे तो तपासून तलाठी यांनी योग्य ती दुरुस्ती करावी . |
||
24. भूधारणा वर्ग १ असलेल्या व उप प्रकार निवडलेल्या ७/१२ साठी
अन्ब्लोक ( UNBLOCK) करण्याची सुविधा UC मध्ये तहसीलदार यांना देनेत आली आहे . |
||
25. कलम १५५ च्या आदेशाने
मान्यतेसाठी तहसीलदार यांना तलाठी यांनी पाठवलेल्या ऑनलाईन विनंती एकत्र दिसण्यासाठी तहसीलदार लोगिन ला UC मध्ये DASHBOARD देण्यात आला आहे . |
||
26. कलम १५५ च्या दुरुस्ती
विन्तीला मान्यता देताच तहसीलदार यांना एका स्वतान्ते TAB मध्ये परिशिष्ट क दिसेल तो या पूर्वी दिसत नव्हता . |
||
27 तहसीलदार लोगिन ला UC मधील
मेनू मध्ये फेरफार तयार झालेले सर्व परिशिष्ट क दिसतील त्याची प्रिंट काढून तहसीलदार यांनी स्वाक्षरीत करून मंडळ अधिकारी व तलाठी यांना प्रत्येकी एक प्रत देवून एक प्रत कार्यालयीन प्रत म्हणून तहसील कार्यालयात जतन करून ठेवणे अपेक्षित आहे . असे स्वाक्षरीत कलम १५५ चे आदेश ( परिशिष्ट क ) पाहूनच हे फारफार मंडळ अधिकारी यांनी मंजूर करणे अपेक्षित आहे . आदेश न पाहता फेरफार मंजूर केल्यास त्याच्या परिणामांसाठी मंडळ अधिकारी वैयक्तिक जबाबदार राहील . |
||
28. तहसीलदार आदेशाने जुने हस्तलिखित ७/१२ संगणकीकृत करण्यासाठी फेरफार
घेण्यासाठी तहसिलार यांनी अंगठा लावून द्यावयाची मान्यता देण्यासाठी ची सोय UC मध्ये देण्यात आली आहे . |
||
29. भूधारणा वर्ग १ मधील
चुकीने निवडलेले उप प्रकार नष्ट करण्यासाठी आलेली विनंती मान्य करण्याची सोय तहसीलदार लोगिन ला UC मध्ये देण्यात आली आहे . |
||
आय सरिता मधील दस्त नोंदणी व ई फेरफार जोडणी . | ||
30. ऑनलाईन दस्त नोंदणी साठी
ODC मधील १ ते ४१ पैकी १९ अहवाल निरंक असणे आवश्यक करणेत आले आहे त्यामुळे या पैकी कोणताही अहवाल पेंडिंग असल्यास तो तत्काळ दुरुस्त करणेत यावा व दस्त नोंदणी वेळेत होईल या साठी प्रयत्न करावा . दुय्यम निबंधक व तहसीलदार यांची एकत्र बैठक उप विभागीय अधिकारी यांनी घ्यावी . |
||
३१. भूधारणा वर्ग १ असलेल्या व उप प्रकार निवडलेल्या ७/१२ वर इतर
हक्कात हस्तांतरास प्रतिबंध असा शेरा येणारे ७/१२ वर दस्त नोंदणी करणे पूर्वी तहसीलदार यांनी खात्री करून असे ७/१२ अन्ब्लोक ( UNBLOCK) केल्या नंतरच दस्त नोंदणी करता येईल .
|
Thank you Sir...
ReplyDeleteअशा प्रकारचे 7/12 चे खाते विभागणी करीता कोणतीही सुविधा सध्या उपलब्ध नाही. मुळ 7/12 वर 3 नाव आहेत त्यापैकी 2 नावा समोर 0.13 आणि 1 नावासमोर 0.14 अशी आराजी आहे. अशा 7/12 वरील खाते विभागणी ची सुविधा edit module मध्ये होती, ती उपलब्ध करून देण्यात यावी .
ReplyDeleteमा. सर कलम 155 अन्वये तलाठी यांचे कडुन दुरुस्ती करुन मान्यतेसाठी तहसिलदार यांचे लॉगील ला पाठविले जाते, पण नवीन सुविधेनुसार काही प्रकारातील फेर हे तहसिलदार यांचे युजर क्रियेशन लॉगीनला देण्यात आलेल्या डॅशबोर्ड मध्ये दिसत नाही, व त्या गावात मान्यता प्रलंबित आहे त्या गावाची निवडपण करता येत नसत्यामुळे मान्यता देता येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDelete