ODC अहवाल १ ते ४१ निरंक करून घोषणापत्र ४ करणेबाबत.
विषय – ODC अहवाल १ ते ४१
निरंक करून घोषणापत्र ४ करणेबाबत.
ई-फेरफार प्रणाली मधील संगणकीकृत ७/१२ ची अचूकता
निश्चित करण्यासाठी राज्यभरात विभागाच्या वतीने चावडी वाचनासह एडीट मोडुल, री एडीट
मोडुल द्वारे ७/१२ मधील दुरुस्तीची कार्यवाही केलेली आहे. असे असूनही अजून देखील
७/१२ मध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी महारष्ट्र जमीन महसूल अधिनियामांतर्गत
कलम १५५ अन्वये च्या आदेशाने करण्यात येत आहे. संगणकीकृत ७/१२ च्या डेटाबेस मधील
गाव नमुना नं.१ (आकारबंद), गाव नमुना
नं.७/१२, गाव नमुना नं. ८अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC मोडुल मध्ये अहवाल
१ ते ४१ अहवाल देवून त्यात महत्वाच्या अहवालातील विसंगत ७/१२ ची संख्या MIS
स्वरूपात सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करून दिली आहे. अशा अहवाल १ ते ४१ म्हणजे
काय व त्या दुरुस्ती च्या अद्ययावत सुविधा या बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व
वापरकर्ते यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा निर्गमित करणेत येत आहेत. दि.४.७.२०१९
च्या शासन परिपत्रकान्वये सर्व वापरकर्ते यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या
आहेत. त्या प्रमाणे घोषणापत्र ४ करण्याची जबाबदारी उप विभागीय अधिकारी यांना दिली
आहे त्या बाबत सर्व संबंधित वापरकर्ते यांचे कडून काम करून घेण्यासाठी समन्वय
करण्याची कार्यवाही त्यांनी करणे अपेक्षित आहे.
अहवाल १ - गाव नमुना ७ वरील
एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक यांचा मेळ बसत नाही ते सर्व्हे
क्रमांक. - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने
अहवाल १ ची दुरुस्ती किंवा ई फेरफार मधून अहवाल
ची १ दुरुस्ती (सुनावणी द्वारे झालेला आदेश) फेरफार घेवून करावी. ७/१२ वरील भोगवटादार पूर्णपणे निरंक अथवा कंस झाले असलेस आदेश दस्तावेज फेरफार
ने खातेदार समाविष्ट करावेत.
अहवाल ३ - गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फरक.
दुरुस्ती सुविधा - आकाराबंदा प्रमाणे ७/१२
चे क्षेत्र योग्य असलेस अहवाल ३ च्या दुरुस्तीसाठी ODC मधील दुरुस्ती सुविधा क्रमांक
3 वापरून आकारबंदा प्रमाणे क्षेत्र भरून त्यास DBA यांनी मान्यता द्यावी. परंतु
क्षेत्र चुकीचे असलेस कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्तीचा आदेश हा फेरफार ने क्षेत्र
दुरुस्ती पूर्ण करावी.
अहवाल ५ - आकाराबंदा प्रमाणे ७/१२ चे क्षेत्र योग्य असलेस अहवाल ३ च्या दुरुस्तीसाठी ODC मधील दुरुस्ती सुविधा क्रमांक 3 वापरून आकारबंदा प्रमाणे क्षेत्र भरून त्यास नायब तहसीलदार यांनी मान्यता द्यावी. परंतु क्षेत्र चुकीचे असलेस कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र
दुरुस्तीचा आदेश हा फेरफार ने क्षेत्र दुरुस्ती पूर्ण करावी.
दुरुस्ती सुविधा - दुरुस्ती पर्याय क्रमांक ५ द्वारे ७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे पर्याय वापरावा.
अहवाल ६- चुकीच्या पद्धतीने भरलेली
खातेदारांची नावे.
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्तीची सुविधा वापरून नावे योग्य पद्दतीने दुरुस्त करावीत.
अहवाल ७ - खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल ७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक
७) खाता प्रकार दुरुस्ती वापरावा
अहवाल ८- फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. .(फेरफार
क्रमांक ०) -( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल ८ च्या दुरुस्तीसाठी
दुरुस्ती पर्याय क्रमांक ८ - शून्य फेरफार क्रमांक दुरुस्ती वापरावाता येईल तसेच कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाचे
दुरुस्ती पर्याय वापरून देखील दुरुस्ती करता
येईल.
अहवाल ९- चुकीच्या पद्धतीने भरलेले
सर्व्हे क्रमांक
दुरुस्ती
सुविधा - ई-फेरफार मोडुल मधून आदेश दस्तावेज फेरफार द्वारे सर्वे क्रमांक बदलणे या पर्यायाचा
वापर करून योग्य दुरुस्ती करता येईल.
अहवाल १० - १६ आणे हून जास्त आणेवारी
असलेले सर्व्हे क्र.
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार मोडुल मधून आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती
अथवा कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती फेरफार द्वारे
खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.
अहवाल ११ - इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
- (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार
आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकारातील नोंदीचा
प्रकार उपप्रकार बदलणे या पर्यायाचा
वापर करावा.
अहवाल १२ - फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.(फेरफार क्रमांक ०)
-( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने
फेरफार क्रमांकाची दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा
अहवाल १३ - भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही. - ( DSD प्रतिबंधित
दुरुस्ती सुविधा – ई--फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज
फेरफार ने योग्य भूधारणा निवडणे
अहवाल १४ - ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
दुरुस्ती सुविधा - पीक पाहणी आज्ञावली - OCU मधून गाव नमुना नं. १२ मध्ये पीकपाहणी ची माहिती भरावी.
अहवाल १५ - निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते. - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - दुरुस्ती पर्याय क्रमांक १५) निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्ती वापरावा.
अहवाल १६ - खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी. - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - जर हा निरंक ७/१२ योग्य (अस्तित्वात असल्यास) असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधील
“अहवाल १ ची दुरुस्ती “ हा पर्याय वापरून नवीन खाते समाविष्ट करावे अथवा
जर हा निरंक सातबारा काढून टाकायचा असल्यास अहवाल क्र. १६ ची दुरुस्ती पर्याय वापरून
हा ७/१२ नष्ट करावा
अहवाल १७ - खाता रजीस्टर मध्ये असलेले
परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
दुरुस्ती सुविधा – ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक १७- खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे साठी वापरावा.
अहवाल १८ - सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी. - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती अहवाल - ई-फेरफार
आज्ञावली मधून आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती फेरफार द्वारे खातेदारांच्या नावासमोरील क्षेत्र सामूहिकरीत्या (फक्त एक नावासमोरील) नमूद करावे अथवा सर्व नावांसमोर (० % अथवा १००% क्षेत्र नमूद करणे) क्षेत्र नमूद करणे
अहवाल १९ - सर्वे निहाय
आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी. - (DSD प्रतिबंधित
दुरुस्ती सुविधा – ई-फेरफार
आज्ञावली मधील आवश्यकते प्रमाणे आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती/आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती फेरफार घेऊन खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे .
अहवाल २० - बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी.
दुरुस्ती सुविधा - हा माहितीस्तव आहे जर या
७/१२ यादीपैकी काही ७/१२ पुन्हा चालू करावयाचे असल्यास ई फेरफार
आज्ञावली मधून आदेशाने बंद ७/१२ चालू करणे हा फेरफार घ्यावा.
अहवाल २१ - ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये
तफावत असलेले सर्व्हे क्र. - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - जर ७/१२ वरील क्षेत्र योग्य असल्यास ई-फेरफार
आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने एकक दुरुस्ती फेरफार घेऊन एकक बदलण्याचा फेरफार घ्यावा अन्यथा जर ७/१२ वरील एकक योग्य असल्यास क्षेत्र दुरुस्ती (शेती) अथवा क्षेत्र दुरुस्ती (एन.ए) ७/१२ साठी या फेरफाराद्वारे योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.
अहवाल २२ - शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक - (DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - खाते अनावश्यक असलेस ई-फेरफार आज्ञावली मधून
कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती फेरफार घेऊन खाते क्रमांक वगळणे ही सुविधा वापरावी अथवा आदेशाने ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार क्षेत्र दुरुती
करून घ्यावे.
अहवाल २३ - पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
दुरुस्ती सुविधा - ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक
२३ मधे दर्शविलेल्या सुचने नुसार पीक दुरुस्ती आज्ञावली (OCU) मधून पुढील वर्षाचा डाटा
नष्ट करणे ही सुविधा वापरावी.
अहवाल २४ - अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक - ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - स्पेस असलेने तयार झालेले एकसारखे सर्वे क्रमांक
चा हा अहवाल दिला आहे - ई-फेरफार
आज्ञावली मधून आदेश दस्तावेज फेरफार ने सर्वे क्रमांक बदलणे हा पर्याय वापरावा अयोग्य ७/१२ असलेस ७/१२ बंद करावा.
अहवाल २५ - भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक. – ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल मध्ये दाखविलेले सर्वे योग्य असलेस DBA यांचे UC
आज्ञावली मध्ये
१ क चे व्यवस्थापन करावे/ अहवाल मधील भूधारणा चुकीची असल्यास आदेश दस्तावेज
फेरफार ने योग्य भूधारणा व तिचा उपप्रकार निवडून दुरुस्ती करावी
अहवाल २६ - भोगवटदार -२ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले
सर्व्हे क्रमांक. -( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार --> नियंत्रित सत्ता प्रकारची नोंद या पर्यायाचा वापर करून दुरुस्ती करावी अथवा आदेश दस्तावेज फेरफार द्वारे भोगवटदार वर्ग २ चा १ ते १४ मधील योग्य उप प्रकार निवडून दुरुस्ती
करावी.
अहवाल २७ - खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता
- सर्व्हे क्रमांक - ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल २७ च्या दुरुस्तीसाठी ODC दुरुस्ती पर्याय
क्रमांक २७ वापरून खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक
/ नावे काढून टाकणेत यावीत.
अहवाल २८ - समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या
सर्वे क्रमांक - ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून खाते एकत्रीकरण
करावे अथवा खात्यावरील कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती
फेरफार ने खाते निवडक सर्वे वरून वगळणे
पर्याय वापरून दुरुस्त करावे.
अहवाल २९ - इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
दुरुस्ती सुविधा - हस्तलिखित 7/12 प्रमाणे नोंदी आल्या नसल्यास आदेश दस्त ऐवज फेरफारातून अथवा कलम १५५
अन्वये तलाठी चूक दुरुस्ती फेरफार घेऊन इतर हक्कातील माहिती भरून घ्यावी.
अहवाल ३० - ७/१२ वरील क्षेत्र लागवडी योग्य आणि बिनशेती
क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक -( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ७/१२ वरील क्षेत्र लागवडी योग्य आणि बिनशेती
क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
अहवाल ३१ - शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे. आर. पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेले सर्व्हे क्रमांक -( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - सातबारा वर क्षेत्र दुरुस्ती आवश्यक असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून
कलम १५५ आदेशाने क्षेत्र दुरुस्ती हा फेरफार घ्यावा अन्यथा योग्य क्षेत्र असल्यास सदर सातबाराचे क्षेत्र हे २० हेक्टर अथवा ९९ आर पेक्षा जास्त असल्यामुळे
सदर सातबारावर फेरफार घेण्यासाठी एकवेळ तहसीलदार यांची मान्यता घ्यावी.
अहवाल ३२ - अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक .
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून
कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती हा फेरफार घ्यावा व योग्य
ती दुरुस्ती करावी .
अहवाल ३३ - खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक. - ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार
आज्ञावली मधील खाते विभागणी हा पर्याय वापरून सदर सर्वे क्रमांकावर खाताविभागणी ही प्रक्रिया पूर्ण करावी.
अहवाल ३४ - गावनिहाय साजा आणि मंडळ
नोंदणीचा अहवाल.
दुरुस्ती सुविधा - सदर अहवाल माहितीवजा देण्यात
आला आहे - युजर
क्रीएशन ( UC ) मधून प्रत्येक गाव योग्य त्या साजा व मंडळामध्ये
सामाविष्ट करणेत यावे. त्यानंतरच DDM मधील चलन तयार होईल तसेच सर्व नक्कलावर साजा
व मंडळाचे नाव दर्शविण्यात येईल.
अहवाल ३५ - इतर अधिकारांमध्ये -- (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक.-( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल ३५ च्या दुरुस्तीसाठी
ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ३५ वापरुन
इतर हक्कातील - - ( डबल डयाश ) निरंक करणेत यावेत.
अहवाल ३६ - प्रमाणित फेरफारांचे तपशील
किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
दुरुस्ती सुविधा - अहवाल ३६ च्या दुरुस्तीसाठी
दुरुस्ती १) ई-फेरफार आज्ञावली मधून
१५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती
फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी. २)केवळ निरंक प्रमाणीकरण शेरा दुरुस्त करणे करिता ई-फेरफार मध्ये मंडळ अधिकारी यांनी
निरंक प्रमाणिकरण शेरा दुरुस्त करणे पर्याय वापरून दुरुस्ती करावी.
अहवाल ३७ - खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार
झालेले डूप्लीकेट - ( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती अहवाल - अहवाल ३७ च्या दुरुस्तीसाठी ODC दुरुस्ती पर्याय
क्रमांक ३७ खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणेह
पर्याय वापरण दुरुस्ती करावी.
अहवाल ३८ - गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या
एकुण आकारणीचा फ़रक.
दुरुस्ती सुविधा - अहवाल ३८ च्या दुरुस्तीसाठी - ७/१२ च्या एकूण आकारणी
च्या प्रमाणात भोगवटदार यांच्या क्षेत्राच्या प्रमाणे विभागून देणे बाबत सुविधा देनेत येईल, सदय स्थितीत ई-फेरफार आज्ञावली मधून ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार मधील आकारणी दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.
अहवाल ३९ - चुकीच्या पद्धतीने भरलेली
अपाक,ए.कु.मॅ. नावांची खाती.
दुरुस्ती सुविधा - अहवाल ३९ च्या दुरुस्तीसाठी
ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ३९ - चुकीच्या पध्दतीने भरलेली अपाक/ ए.कु.मॅ.
ची नावे ही टोपण नावात भरावीत. जर अशी नवे दुसऱ्या ओळीत भरलेली असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाते दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी.
अहवाल ४० - खातामास्टर मध्ये अतिरिक्त
नावे असलेल्या खात्यांची सर्व्हे
क्रमांकनिहाय यादी
दुरुस्ती सुविधा - अहवाल ४० च्या दुरुस्तीसाठी
ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक ४०- खातामास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे हा पर्याय वापरून अहवाल निरंक करावा.
अहवाल ४१ - अहवाल ५- अतिरिक्त -( DSD प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा - अहवाल निरंक करणेसाठी दुरुस्ती अहवाल ४१
वापरून खाता विभागणी करावी व कलम १५५ अन्वये खाता दुरुस्ती मधून योग्य ती
खात्यातील दुरुस्ती करावी.
अहवाल ४२ - अहवाल ५ – खातेदाराच्या नावा मधील स्पेस बाबत
दुरुस्ती सुविधा - ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने
खाता दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा .
अहवाल क्रमांक २,३,४,१४,२३,२९,३१,३२,३८ हे एकूण विसंगती सर्व्हे क्रमांक मध्ये घेतलेले नाहीत याची
नोंद घ्यावी.
Comments