रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि.७.९.२०१९ पासून दिलेल्या नवीन सुधारणा / सुविधा


नमस्कार मित्रांनो ,

विषय – दि.७.९.२०१९ पासून दिलेल्या नवीन सुधारणा / सुविधा

               आपल्याला  काम करताना येत असलेल्या अडचणी असंख्य तलाठी whatsapp च्या माध्यमातून , ई मेल द्वारे , any desk remote session अथवा फोन करून सांगत असतात त्या सोडविण्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नात असतो त्या प्रमाणे दि ७.९.२०१९ पासून खालील सुधारणा प्रणाली मध्ये करून सर्व वापरकर्ते यांना वापरण्यासाठी दिल्या आहेत त्या समजून घ्याव्यात .

१.      DSD मध्ये operation failed असा येत असलेला एरर आता येणार नाही .
२.      पीक पाहणी पश्च्यात DSD करावयाच्या ७/१२ मध्ये आता बंद केलेले ७/१२ दिसणार नाहीत .
३.      DDM मधून ७/१२ वितरण करताना त्या ७/१२ मध्ये काही ODC अहवाल मधील महत्वाच्या त्रुटी असतील तर तसा अलर्ट मेसेज तलाठी यांना दाखविला जाईल तो पासून शक्यतो असा ७/१२ त्रुटी दुरुस्त करूनच वितरीत करावा तथापि अशी दुरुस्ती करण्यास वेळ लागत असेल तर ok करून पेढे जावून तो ७/१२ DDM मधून वितरीत करता येईल मात्र अश्या ७/१२ वर ही त्रुटी तलाठी स्वाक्षरीच्या खाली छापली जाईल .
त्यासाठी कोणते ODC अहवाल विचारात घेतले आहेत ते पहा
१.      अहवाल १ – खातेदारांचे क्षेत्राची बेरीज व ७/१२ वरील एकूण क्षेत्र जुळत नसलेले ७/१२
२.      अहवाल ३अ – ७/१२ वरील क्षेत्र व आकारबंद मधील क्षेत्रात मोठी तफावत असलेले ७/१२
३.      अहवाल १३ – अयोग्य भूधारणा
४.      अहवाल २१ – अयोग्य एकक
५.      अहवाल २६ – वर्ग २ असून देखील गाव नमिना १ क मध्ये नसणे ( इतर हक्कात प्रतिबंधित शेरा नसलेले ७/१२ )
६.      अहवाल ३०  – एकाच ७/१२ मध्ये शेती क्षेत्र व बिनशेती क्षेत्र असलेले ७/१२
७.      अहवाल ४१  - एकाच खाते वेगवेगळ्या खातेदारांचे नावांच्या समूहाने वेगवेगळ्या ७/१२ वर दर्शविलेले असणे


४.       एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात / एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात / एका विभागातून दुसऱ्या विभागात  वर्ग केलेल्या गावांचे जुने ( ऑनलाईन चे ) फेरफार नवीन तालुक्यात उओलब्ध करून देणे . नवीन गावच्या तलाठ्याने विनती केल्यास जुन्या तालुक्यातील DBA याने त्या गाव चे फेरफार रजिस्टर तयार केल्यास नवीन गावच्या तलाठ्याला DDM मध्ये उपलब्ध होईल .
५.       गाव नमुना नं. ८ अ ( खाते उतारा  ) मध्ये देखील काही ७/१२ वर वेगवेगळी खातेदारांची नावे असताना एकाच खाते दिसत असल्यास (  अतिरिक्त अहवाल ५ किंवा odc अहवाल ४१ ) तसी सूचना DDM मधील ८ अ वर दाखवली जाईल . असे खाते उतारे वितरीत करण्यापूर्वी तलाठी यांनी फेरफार ने खाता विभाजन किंवा अहवाल ४१ ची दुरुस्ती सुविधा वापरून कार्यवाही करावी .
६.       ODC मध्ये
१. नवीन अहवाल ४२ – डेटाबेस मध्ये अवतरण चिन्ह ‘    असलेले ७/१२ दाखवून दुरुस्ती सुविधा ४२ ने एकाच बटन वापरून दुरुस्ती सुविधा दिली आहे .
२. अहवाल ४ व त्याची दुरुस्ती सुविधा दिली आहे
३.अहवाल ३८ ( आकारणीतील तफावत ) काढून टाकला आहे व त्याची अट देखील काढली आहे
४.ODC  अहवाल दुरुस्ती प्रमाणे समरी अहवाल देखील दुरुस्त होईल
५. - - असलेल ७/१२ दुरुस्तीची सुविधा ई फेरफार मध्ये ईतर पर्यायात दिली आहे तसा मेसेज ODC अधे दिला आहे .

वरील प्रमाणे सुविधा वापरून feedback द्यावा

आपला
रामदास जगताप
दि ८.९.२०१९

Comments

  1. अहवाल 9 च्या दुरुस्तीसाठी देखील एकच बटन वापरून करता येईल अशी दुरुस्ती मिळाली तर उत्तम होईल

    ReplyDelete
  2. सर अहवाल 29 चा फेरफार तयार करताना फक्त 1ल्या पेज वरील स.नं. दुरुस्ती साठी उपलब्ध होत आहे, एकाच क्लिक ने सर्व स.नं. फेरफार मध्ये येथील अशी सुविधा मिळणेस विनंती

    ReplyDelete
  3. अहवाल क्र 38 फक्त माहितीसाठी ठेवला तर बरे होईल. कोणत्या गटावर दुरुस्ती आहे हे कळेल तरी. काही गावांचा एकूण आकार व सर्व सात बारा यांचा फरक खूप कमी असल्याने अहवाल 38 दुरुस्त करून अचूक बेरीज येऊ शकते.

    ReplyDelete
  4. शक्य असल्यास अहवाल 38 दुरुस्ती ची सुविधा देण्यात यावी.

    ReplyDelete
  5. ५. - - असलेल ७/१२ दुरुस्तीची सुविधा ई फेरफार मध्ये ईतर पर्यायात दिली आहे तसा मेसेज ODC अधे दिला आह.
    सर मौजा सिंदी रे. ता. सेलू जिल्हा वर्धा येथिल एक सर्व्हे क्रमांक 121 मध्ये - - आहे. ती दुरुस्ती करावयाची आहे. परंतू सदर सर्व्हे क्रमांकावर कलम 155 अंतर्गत फेरफार क्रमांक बदलनेचा फेरफार 1123 हा प्रलंबित आहे. त्यामुळे सदर फेरफार क्रमांक मंजुर करण्यास अडचन येत आहे. व सदर सुविधेतुन ही दुरुस्ती करायला गेल्यास सदर फेरफार प्रलंबित असल्याचा मेसेज येतो. कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  6. Sir Nasate
    1 gat ahaval 1 madhe aahe.pan tyavar ek bond Ali ahe ti nond dharali tar tho gat ahaval 1 madhun nigun jail pan ti nond basat nahi sir

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send