रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दुय्यम निबंधक यांचे साठी सूचना / सुधारणा



नमस्कार मित्रांनो ,

विषय - दुय्यम निबंधक यांचे साठी सूचना / सुधारणा 



    ई फेरफार प्रणाली व आय सरिता प्रणालीची दस्त नोंदणीसाठी सांगड घालणेते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे . दुय्यम निबंधक यांना ऑनलाईन दस्त नोंदणी करण्यासाठी ई फेरफार मधून जमीन धारकांची नावे घेतली जातात व दस्त नोंदणी होताच सूची २ ची माहिती थेट संबंधित तलाठी यांचेकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवली जाते त्याच वेळी पक्षकार यांना फेरफार नोंदी चा क्रमांकचा मेसेज दिला जातो त्यामुळे दुयाम निबंधक यांनी योग्य माहिती भरली
 तरच ई फेरफार योग्य रीत्या तयार होणार असलेने SRO यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे .


१. आत्ता सामाईक किंवा संयुक्त खात्यातून विक्री करताना खात्यावरील सर्व सह्धार्कांची नावे SRO ला घ्यावीच लागतील व त्यासाठी सर्व सह धारक दस्ताला हजार असलेच पाहिजे अन्यथा असा दस्त अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र ( अन्शता ) व अविभाज्य हिस्स्याचे खरेदीपत्र ( पूर्णता ) या आर्टिकल चा वापर करून क्षेत्र नमूद न करता दस्त करावा लागेत ह्याची नोंद घ्यावी .

२. नोंदणीकृत बक्षीस पत्र देखील आत्ता अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र ( अंशात )  व अविभाज्य हिस्स्याचे बक्षीसपत्र ( पूर्णता ) हे आर्टिकल निवडून करता येतील .

३. दुय्यम निबंधक यांनी शकतो स्किप पर्याय वापरू नये . स्किप पर्याय का वापरला आहे ह्याचे कारण योग्य होते का ह्याची खात्री जिल्हा कार्यालयाने ( मुद्रांक जिल्हाधिकारी ) करावी .

दुय्यम निबंधक यांना ऑनलाईन दस्त नोंदणी साठी अडचण आल्यास नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाचे हेल्प डेस्क यांचे शी संपर्क करावा .

आपला

रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send