रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

नवीन पिकांची यादी OCU मध्ये वापरणे बाबत


नमस्कार मित्रांनो ,
विषय - नवीन पिकांची यादी OCU मध्ये वापरणे बाबत 

           पीकांच्या नोंदी नमूना 12 मध्ये नोंदविण्यासाठी वापर करणेत येणारी पिकांची यादी राज्यभरात समान 

नव्हती त्यामुळे राज्यस्तरावर पिकांची माहिती संकलित करताना येणार्‍या अडचणी विचारात घेवून सर्वांसाठी

 एकाच पीकांची याची देण्यासाठी सर्व कृषि विद्यापीठांचे सहकार्य घेवून कृषि आयुक्तांचे सल्ल्याने अशी परिपूर्ण यादी

( CROP MASTER) तयार करनेट आली आहे . सदारची यादी आजपासून सर्वत्र उपयोगात आणली

 जाणार आहे . तत्पूर्वी सोबतच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे dba यांनी तालुका निहाय आवश्यक पिकांची निवड करावी . शी DBA ने निवडलेली पीकेच फक्त OCU मध्ये तलाठी यांना उपलब्ध होतील ह्याची नोंद घ्यावी . 


DBA ने एकदाच करावयाचे काम - 

प्रथम  DBA लॉगिन करा
मुख्य पृष्ठ
पीक निवडणे option निवडा करा
प्रथम पिकाचा प्रकार निवडा - पिकांचे वर्ग पाडण्यात आले आहेत उदा.तृणधान्ये,कडधान्ये,गळित धान्ये इ.
प्रथम पिकाचा वर्ग निवडा- उदा.तृणधान्ये पीके
एखाद्या वर्गात एकाहुन जास्त नावाने ओळखली जाणारी पीके असतील त्यावेळी अनेक नावांनी ओळखली जाणारी पीके निवडा करा. उदा. धान/साळ/भात. जे पीक तुम्हाला /१२ उताऱ्यावर छापुन यायला हवे असेल ते नाव निवडाउदा. भात .पिके निवडून झाल्यावर साठवा बटन दाबा .
एखाद्या वर्गात एकाहुन जास्त नावाने ओळखली जाणारी पीके नसतील त्यावेळी अनेक नावांनी ओळखली जाणारी पीके या लिस्ट मध्ये पीके दिसणार नाही. परंतु खालील पीकाच्या यादीमध्ये ती नावे दिसतील
उदा तृणधान्ये वर्गातील उरलेली पिके खाली दिसतील त्यामधुन तुमच्या तालुक्यात घेत असलेली पिके निवडा करून निवडलेल्या पिकाची माहिती साठवा करा
एखाद्या वर्गातील सगळी पिके तुमच्या तालुक्यात घेतली जात असतील तर सर्व पिके निवडा बटनावर क्लिक करून निवडलेल्या पिकाची माहिती साठवा करा
१२ मध्ये दर्शवणाऱ्या शेरा मधील झाडाची निवड करणे option निवडा करा
सर्व झाडे निवडा करून निवडलेल्या पिकाची माहिती साठवा करा

हेल्प फाईल वाचावी




आपला
रामदास जगताप
दि 28.9.2019


Comments

Archive

Contact Form

Send