डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२ DSD करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय - डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२ DSD करणे बाबत
शासनाने दृष्टीने अचूक ७/१२ व खाते उतारा खातेदारांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे बरोबरच जनतेला १०० % डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ऑनलाईन उपलब्ध होणे हे या प्रकल्पाचे एक प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले आहे . प्रत्येक खातेदाराला आपला डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डिजिटल पेमेंट भरून केंव्हा काढता येईल ह्याची आस लागली आले .
ई फेरफार प्रकल्पातील अंतिम टप्पा पूर्ण करत असताना आपण आपले कडील सर्व अचूक ७/१२ चा डेटाबेस डिजिटल स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे . १ मे २०१८ रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरु केलेले DSP - डिजिटल स्वाक्षरीत pdf चे कामकाज बंद करून ( जुनी DSP पद्धत ) आपण आत्ता आपण ई फेरफार प्रणाली मध्ये ७/१२ PDF SIGN करत नसल्यामुळे आत्ता त्याला DSP न म्हणता DSD ७/१२ म्हणजेच Digitally Signed Databased 7/12 ( डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२ ) ( नवीन DSD पद्धत ) असे संबोधणे आवश्यक आहे .
या साठी NIC कडून नवीन DSD सुविधा दि.२०८.२०१९ पासून सर्वाना उपलब्ध करून दिली आहे .
कोणताही ७/१२ एकदा तलाठी यांनी DSD करणे आवश्यक आहे . या पुढे थोड्याच दिवसात प्रत्येक फेरफार मंजूर केल्या नंतर गाव नमुना नं. ७ मंडळ अधिकारी यांचे DSC द्वारे DSD होईल तसेच पीक पाहणी अद्यावत केल्यानंतर प्रत्येक गाव नमुना १२ तलाठी यांचे DSC द्वारे DSD होईल अशी सुविधा विकसित केली जात आहे त्याचे यशस्वी टेस्टिंग होताच ही सुविधा सर्वांना वापरता येईल . म्हणजेच या पुढे नमुना ७ व नमुना १२ स्वतंत्र रित्या DSD होईल अशी व्यवस्था विकशित केली आहे . म्हणूनच आज रोजी चा अद्यावत ७/१२ तलाठी स्वाक्षरीने DSD होणे आवशयक आहे . म्हणजेच २८ मे,२०१८ पूर्वी DSP केलेलं सर्व ७/१२ पुन्हा DSD करणे आवश्यक आहे .
राज्यातील त्रुटीयुक्त ७/१२ वगळता इतर सर्व ७/१२ माहे ऑगस्ट २०१९ अखेर DSD होतील या साठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केला पाहिजे अशा सूचना दि २१.८.२०१९ च्या VIDEO CONFERENCE मध्ये मा. अप्पर मुख्य सचिव महोदयांनी दिल्या आहेत .
DSD चा MIS सध्या सर्व वापरकर्ते यांना उपलब्ध करून दिला आहे त्याचे प्रमाणे कामाचे नियोजन करावे .
शासनाने सर्व खातेदारांना व नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ दि १ सप्टे २०१९ पूर्वी ऑनलाईन उपलब्ध करून दिनेचे उद्दिष्ट दिले आहे . लवकरच फेरफार पश्च्यात व पीक पाहणी पश्च्यात DSD करणे चे काय आपोआप /होणार आहे . त्यामुळे DSD हे कायम स्वरूपी करावे लागणारे काम नाही हे मात्र आपण समजून घ्यावे . ही विनंती
त्यासाठी आवश्यक ती सुविधा विकसित करणेचे काम सुरु आहे तसेच पीक पाहणी पश्चात DSD साठी काही टप्पे कमी करता येतील का ? हे देखील केले जाईल .

Comments